आज मंगळवारी रात्री करा हा तोडगा, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण…

0
1121

नमस्कार मित्रांनो,

मंगळवार हा पवनपुत्र हनुमानांचा वार मानला जातो. आणि या मंगळवारच्या दिवशी हनुमानांना प्रसन्न करणारे अनेक उपाय सुद्धा केले जातात.

मित्रांनो मानवी जीवनातील कोणतीही समस्या असुद्या. जर घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडतेय, कोणत्याही प्रकारची बाधा तुमच्या घरातील व्यक्तीला झाली असेल तर मित्रांनो हा उपाय करता येतो.

घरामध्ये पैसा येत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असतील, भयंकर गरिबी असेल किंवा मित्रांनो तुमचा उद्योग धंदा चालत नसेल, घरामध्ये अशांती असेल कोणत्याही प्रकारची समस्या दूर कारण्यासाठी मंगळवारच्या रात्री तुम्ही हा उपाय करू शकता.

मित्रांनो तुम्हाला केवळ चार वातींचा दिवा प्रजवलीत करायचा आहे. हा उपाय आपण सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर अगदी कधीही करू शकता. हा उपाय आपण मारुती मंदिरात जाऊन केलात तर अतिउत्तम आहे.

असं केल्यास त्याच फळ आपल्याला अगदी शीघ्र रित्या जलदगतीने आपल्याला प्राप्त होत. आपल्या समस्या खूप लवकर सुटतात. जर तुमच्या जवळपास मारुती मंदिर नसेल तर तुम्ही घरातच हनुमानांच्या फोटो किंवा मूर्ती समोर हा चार वातीचा दिवा लावू शकता.

मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी आपण दिवसभरात मांस किंवा दा रू, म दिरा यांचं सेवन करू नये. हा उपाय करण्यापूर्वी स्नान अवश्य करावे जर स्नान करणे शक्य नसेल तर स्वच्छ हात पाय तोंड धुवावे किंवा थोडस गंगाजल स्वतःवर शिंपडून हा उपाय केला तरी चालू शकत.

मित्रांनो हनुमानांना लाल रंग अतिप्रिय मानला जातो आणि म्हणून हा उपाय करताना तुम्ही लाल रंगाचे कपडे घातले तर अतिउत्तम. जो दिवा तुम्ही प्रजवलीत करणार आहोत तो चार वातींचा असणार आहे.

मित्रांनो दिव्यात जे तेल आपण वापरणार आहोत ते मोहरीचं असावं.मित्रांनो अनेक प्रकारची तंत्र मंत्र करताना मोहरीच्या तेलाचा सर्रास वापर केला जातो. या तेलाचं वापर करून केलेले तोडगे हे शीघ्र फलदायी असतात. सोबतच मित्रांनो आपल्याला एक न तुटलेली अख्खी लवंग सुद्धा लागणार आहे.

सर्वात आधी आपल्याला चारही वाती प्रजवलीत करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हनुमानांसमोर बसायचं आहे आणि आपण जी लवंग घेतली आहे ती उजव्या किंवा डाव्या हातात घट्ट पकडायची आहे.

मूठ घट्ट आवळून धरायची आहे आणि आपल्या जीवनात जी काही समस्या आहे बाधा, पैशाची समस्या, करणी केली असेल, उद्योग धंद्या बाबतीत समस्या अशा समस्येतून मुक्त करा अशी प्रार्थना हनुमंता चरणी करायची आहे.

अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर एका मंत्राचा जप आपल्याला 11 वेळा करायचा आहे. ॐ नमो हनुमते भय भंजनाय सुखम् कुरु फट् स्वाहा. कोणत्याही गोष्टीची मनामध्ये भीती बसलेली असेल हा उपाय केल्याने मनातील भीती सुद्धा दूर करता येते.

मित्रांनो जप करून झाल्यानंतर जी लवंग आहे ती त्या दिव्यात टाकायची आहे. टाकल्यानंतर आपल्याला हनुमान चालिसाचा एकदा पाठ करायचा आहे. शक्य असेल तर जास्त वेळा सुद्धा पाठ करू शकता.

मित्रांनो तुम्ही जर हा उपाय या नियमांनुसार विधीनुसार हा उपाय केलात अगदी 100 टक्के तुम्हाला तुमच्या समस्येतून मुक्ती मिळेल. हनुमान चालिसाचा पाठ करून झाल्यानंतर फक्त आठ वेळा जय श्रीराम बोलायचं आहे.

आणि मनातल्या मनात प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचं मनातल्या मनात दर्शन घ्यायचं आहे. मित्रांनो कोणत्याही मंगळवारी रात्री हा उपाय केल्यानंतर आपण पुन्हा घरी परत यायचं आहे फक्त लक्षात घ्या घरी येताना सरळ सरळ घरी या कुठेही थांबू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here