फक्त 1 मंगळवार हनुमान मंदिरात जाऊन करा हा उपाय. जे मागाल ते मिळेल. पैशाचा ढीग लागेल

0
301

नमस्कार मित्रानो

मित्रानो अनेकवेळा एखाद महत्वाचं कार्य पूर्ण करण्यासाठी आपण जिवाच्या आकांताने मेहनत करत असतो. असे असले तरी त्या कार्यात बऱ्याचदा आपल्याला सफलता मिळत नाही. त्यासाठी आपण अनेक व्रत , उपवास , अनुष्ठान करतो. तरी सुद्धा त्या कार्यात सफलता मिळत नाही.

मात्र तेच काम अगदी साधा उपाय किंवा एखादा तोडगा केल्याने त्वरित पूर्ण होत. मित्रानो आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने , विश्वासाने केला तर तुमच्या कार्यात तुम्हाला सफलता निश्चित मिळेल.

मित्रानो या कलियुगामध्ये साक्षात सूक्ष्म रूपाने वास करणारे देवता म्हणजे श्री हनुमान. श्री रामांनी हनुमानांना अमरत्व प्रदान केलं होत. प्रभू श्री राम यांनी हनुमांना सांगितलं होत कि धरती वर अशी एक वेळ येईल जेव्हा या धरती वर पापी लोकांची संख्या जास्त असेल यावेळी कोणतीही देवी देवता इथे कोणताच अवतार घेणार नाही.

अशा वेळेस श्री हनुमांना राम भक्तांची रक्षा करायची आहे आणि त्या सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत जे सज्जन आहेत , जे माझ्या नावाचा जप करतात. मित्रानो आपल्या सर्वांनाच माहित आहे कि श्री हनुमान हे श्री रामाचे परम भक्त आहेत.

ते राम दूत आहेत. प्रभू श्री रामाच्या आज्ञेचं उल्लंघन ते कधीच करत नाहीत. त्यामुळे कलीयुगात सर्वात जास्त फळ देणारी कोणती देवता असेल तर ती आहे श्री हनुमान.

मित्रानो जर कोर्ट कचेरी मध्ये तुमची एखादी केस चालू आहे त्या केसचा निर्णय लागत नसेल किंवा तुमच्या घरावर , तुमच्या जमिनीवर एखाद्याने कब्जा केला असेल किंवा तुमच्या नोकरी धंद्यात काही समस्या आहेत , घरामध्ये गृहक्लेश आहे.

मित्रानो अशा अनेक समस्यांचा नाश करण्यासाठी या समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. मित्रानो आपण ज्या समस्येसाठी हा उपाय करत आहोत ती समस्या आपल्या जीवनातून निश्चितच दूर होईल असा दृढ विश्वास मनात ठेवायचा आहे.

मित्रानो जर श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचा फायदा तुम्हाला निश्चित होईल. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय नक्की कसा करायचा आहे.

मित्रानो हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारचा दिवस निवडायचा आहे. कारण मंगळवार हा श्री हनुमानांचा दिवस आहे. तर मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रातःविधी उरकून स्नान वगैरे करून आपल्या घराच्या जवळील हनुमानाच्या मंदिरात जायच आहे.

मित्रानो मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला ९ लवंग घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा लवंग अखंड हव्यात. तुटलेल्या फुटलेल्या नसतील याची काळजी घ्या. ज्यांना पुढे फुल आहे अशा अखंड ९ लवंगा घ्यायच्या आहेत. या ९ लवंगांची एक माळ तयार करायची आहे.

धाग्यामध्ये या लवंग बांधायच्या आहेत जेणेकरून यांची माळ आपण श्री हनुमानांना अर्पित करू शकू. सोबतच नैवैद्यासाठी गुळाचा छोटा तुकडा आणि थोडस गाईचं तूप घ्यायच आहे.

आता हे सर्व घेऊन आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. शक्य असेल तर मंदिरात जाताना लाल रंगाचं वस्त्र परिधान करा. मंदिरात गेल्यावर तेल आणि थोडस शेंदूर मारुतीरायांच्या मूर्तीला अर्पित करायचा आहे.

लक्षात ठेवा मूर्तीवर म्हणजे श्री हनुमानरायांच्या डोक्यावर हे अर्पण करायचं आहे. जेव्हा तेल आणि शेंदूर यांचा ओघोळ मारुतीरायांच्या पायाजवळ येईल तेथील थोडं तेल आणि शेंदूर घेऊन आपल्या मस्तकावर तिलक करायचं आहे.

मित्रानो हा उपाय करताना जय श्री राम या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. आता गूळ आणि तुपाचा नैवैद्य श्री हनुमानांना अर्पित करायचा आहे. आता ती लवंगांची माळ आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि संपूर्ण हनुमान चालीसेचा पाठ आपल्याला करायचा आहे.

संपूर्ण हनुमान चालिसा बोलेपर्यंत हि माळ उजव्या हातातच ठेवायची आहे. हे पठण झाल्यानंतर हि माळ श्री हनुमानांच्या मूर्तीला अर्पित करायची आहे. आता मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्याच निवारण व्हावं याची प्रार्थना करायची आहे.

आपल्या घरात सुख शांती , सुख समृद्धी , धन , वैभव यावं. तसेच आपल्या जीवनातील तमाम समस्यांचा नाश होण्यासाठी श्री मारुतीरायांकडे प्रार्थना करायची आहे. जेवढ्या श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही प्रार्थना करून हा उपाय कराल तेवढ्या लवकर तुम्हाला या उपायाचा लाभ होईल.

आता हे सर्व झाल्यानंतर सरळ घरी निघून यायचं आहे. हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार टोकणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर उठून हा उपाय करण्याचा प्रयत्न करा.

मित्रानो हा ऊपाय तुम्ही फक्त एक मंगळवार केला तर तेवढ्यातच तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल. मित्रानो जर एकाच मंगळवार करून तुम्हाला फरक जाणवला नाही तर तुम्ही पुढच्या मंगळवारी हा उपाय पुन्हा करू शकता.मित्रानो काही दिवसातच तुमच्या जीवनातील तमाम समस्यांचा नाश नक्कीच होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here