नमस्कार मित्रांनो,
रामभक्त श्री हनुमान आपल्या बलशाली व्यक्तित्वामुळे प्रसिद्ध आहेत. ते चिरंजीवी आहेत म्हणजेच सूक्ष्म रीतीने ते अजूनही भूतलावर वास करत आहेत. त्यामुळे ते आपल्या साधनेला लवकर प्रसन्न होऊ शकतात जर आपण शुद्ध मनाने त्याचे स्मरण केले तर.
मित्रांनो मंगळवार हा मारुतीचा मानला जातो, त्यामुळे घरातील कोणतीही समस्या जर तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही काही उपाय मंगळवारी करू शकता. कारण बजरंगबली हनुमान यांची ऊर्जाशक्ती या दिवशी अधिक कार्यशील असल्याने केलेला उपाय हा अधिक फलीभूत ठरतो. यामुळे तुमचं जीवन संपूर्ण आनंदी बनेल.
तुम्ही जर शुद्ध मनाने, हनुमानजी यांना शरण गेलात तर पवनपुत्र हनुमान प्रसन्न होतील. घरातील सर्व समस्या यामुळे दूर होतील. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना करावी, लाल रंगाचे कपडे वापरावेत. महाबली, बजरंगबली हनुमान यांना संकटमोचन म्हटले जाते.
मंगळवारी हनुमानच्या मंदिरात किंवा घरी त्यांची प्रतिमा स्थापून त्यासमोर हा उपाय करू शकता. यामध्ये तुम्ही चार कापसाच्या वाती घेऊन त्याचा चार वातींचा दिवा या प्रतिमेसमोर एक छोटा विधी करून प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे तुमचं संकट नक्की दूर होईल व घरात सुख शांती नांदेल.
मित्रांनो हनुमंताला लाल रंग अतिशय प्रिय आहे. हा उपाय करण्यापूर्वी स्नान करा किंवा स्वच्छ हात पाय धुवून शक्यतो लाल रंगाचे कपडे घाला. हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे. हे करताना तुम्हाला एक दिवा ज्याचा रंग लाल असेल, मोहरीचे तेल जे जास्त प्रभावी असते, कापसाच्या चार वाती ज्या लाल रंगाचा रंगवायच्या आहेत, एक पूर्ण लवंग जी तुटलेली नसेल, प्रसादासाठी फुटाणे आणि गूळ घेऊ शकता.
हनुमानसमोर काहीही मनात शंका न ठेवता तो दिवा चार दिशांना चार वाती प्रज्वलित करा. नंतर प्रतिमेसमोर बसून हनुमानजीना फुटाणे गूळ अर्पण करा. खाली बसून उजव्या किंवा डाव्या हातात ती लवंग घट्ट पकडून बसायची आहे. ही मूठ घट्ट पकडून हनुमान जींना तुमची कोणतीही एक समस्या सांगायची आहे.
घरातील आजारपण, धनसंपदा यापैकी एक गोष्टीचा प्रार्थना मनापासून करा. ही प्रार्थना करून एक मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तो मंत्र म्हणजे, 11 , 21, 108 यापैकी की जमेल तितक्या वेळा हा जप तिथे करा. हा जप झाल्यावर ती लवंग त्या दिव्यात टाका.
मित्रांनो यानंतर हनुमान चालीसेचा पाठ करा. 1, 2, 11 जितक्या वेळ जमेल तितका करा. त्यामुळे हा उपाय प्रभावी बनतो. हा उपाय केल्यावर जय श्री राम या नामाचा काहीवेळा घोष करून मनात रामाची मूर्ती पाहून दर्शन घ्या. हा उपाय अत्यंत प्रभावी, प्रबळ मानला जातो त्यामुळे तुमची अडचण नक्कीच दूर होईल, जे कोणते संकट असेल ते दूर होईल. त्यामुळे तुमच जीवन सुखी होईल.
हा उपाय जर तुम्ही बाहेर हनुमान च्या मंदिरात केला तर तिथून पटकन घरी यायचे आहे तेही न बोलता. हा एक अतिशय परिणामकारक उपाय मानला जातो. मंगळवारी सायंकाळी हे नक्की करून पहा. मंत्र खालीलप्रमाणे आहे.
ओम नमो हनुमते भय भंजनाय
सुखम कुरु करू फट स्वाहा
जय श्री राम, जय श्री हनुमान
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.