नमस्कार मित्रानो
मित्रानो घरात गरिबी येण्याची सात कारणे आज आपण पाहणार आहोत. कित्येक लोक दररोज देवपूजा करतात ,व्रत वैकल्य उपवास करतात मात्र तरीसुद्धा घरातून गरिबी , दरिद्रता काही जात नाही.
लक्ष्मी प्रसन्न होत नाही. अशावेळी हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. जर आपल्या सुद्धा हातून या ७ चुका वारंवार होत असतील तर लक्ष्मी घरात कधीच येणार नाही हे लक्षात ठेवा.
मित्रानो हिंदू धर्मशास्त्रात भविष्य पुराण असं मानत कि कोणत्याही मंदिरात देव दर्शन घेण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आपल्या चपला किंवा बूट त्या मंदिराच्या प्रवेश द्वारासमोर , उंबरठ्यासमोर सोडू नका.
अशा ठिकाणी सोडू नका ज्या ठिकाणी इतर लोक जेव्हा मंदिरात प्रवेश करतात तेव्हा ते तुमचे चपला आणि बूट ओलांडतील. भविष्य पुराण असं मानत कि जेव्हा तुमच्या चपला आणि बुट हे इतर व्यक्तींकडून ओलांडले जातात तेव्हा त्या सर्व व्यक्तींचे दोष , त्यांच्या आयुष्यातील दुःख , समस्या हे तुमच्या भाग्यात येतात.
मित्रानो हि चूक तुम्ही करू नका. जी गोष्ट मंदिराची आहे तीच गोष्ट घराच्या बाबतीत सुद्धा आहे. आपल्या घराचा जो मुख्य प्रवेश द्वार आहे तिथे त्या चौकटीसमोर , उंबरठ्यासमोर आपण चपला आणि बुट सोडू नका.
माता लक्ष्मी दररोज सात वेळा प्रत्येक व्यक्तीच्या घरात प्रवेश करत असते. मात्र ज्या व्यक्तीच्या घरा समोर चपला आणि बूट अशा प्रकारे सोडलेले असतील माता लक्ष्मी त्या घरात कधीच प्रवेश करत नाही. ती आल्या पावली माघारी फिरते.
मित्रानो लिंग पुराण असं मानत कि जेव्हा आपण एखाद्या मंदिरात देव दर्शनासाठी जातो देवापुढे नतमस्तक होऊन हात जोडतो तेव्हा जर आपल्या पाठीमागे काही भक्त दर्शन घेण्यासाठी वाट बघत असतील तर त्यांना जास्त वेळ वाट बघायला लावू नका.
आपलं दर्शन आपण ताबडतोब घ्या आणि बाजूला व्हा. तसेच जेव्हा आपण अभिषेक घालतो किंवा ओटी भरतो तेव्हा आपले कार्य चालू असताना इतर भाविक जर रांगेत ताटकळत उभे असतील तर हा सुद्धा ईश्वर आणि भक्त यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न मानला जातो. हा एक मोठा दोष आहे. त्यामुळे जे काही भक्ती भावाने कराल ते त्वरित करून बाजूला व्हा.
मित्रानो जेव्हा आपण घरामध्ये दूध आणि दही या दोन गोष्टी सोबत घेऊन येतो तेव्हा तेव्हा आपल्या घरात दरिद्रता सुद्धा पाठोपाठ येते. ज्या प्रकारे लक्ष्मी आहे , लक्ष्मी म्हणजे धन , पैसे , वैभव सर्व प्रकारच्या सकारात्मक गोष्टी , मंगल गोष्टी त्याच्या उलट लक्ष्मीची बहीण आहे. दरिद्रता देवी , अलक्ष्मी.
हि अलक्ष्मी म्हणजे गरिबी , कंगाली , दरिद्रता , सर्व प्रकारच्या अमंगल , अशुभ गोष्टी. जेव्हा दूध आणि दही सोबतच आपण आपल्या घरात आणतो तेव्हा आपल्या सोबत दरिद्रता देवी सुद्धा येते.
अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. हिंदू धर्मशास्त्र असं मानत कि गणपती बापांची मूर्ती किंवा फोटो हा आपल्या संपूर्ण जीवन काळात कधीही कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ नये. आपल्या घरातील संपत्ती मध्ये , सुख शांती मध्ये कमतरता येते.
आपल्या घरात जी काही संपन्नता आहे , जे काही तुम्ही कमावलेले आहे त्यात हळू हळू घट होऊ लागते. गणेश मूर्ती प्रमाणेच लाफिंग बुद्धा ज्याला आपण कुबेर स्टॅच्यू असेही म्हणतात हि मूर्ती सुद्धा कोणाला भेट म्हणून देऊ नका.
सोबतच आवळ्याचं रोपटं देखील कोणाला देऊ नये कारण यात प्रत्यक्ष भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास असतो. म्हणून कोणाला दान , गिफ्ट स्वरूपात हे रोपटं देऊ नका. घरातील संपन्नता कमी होऊ लागते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.