नमस्कार मित्रानो
मित्रानो मकर हि राशीचक्रातली दहावी राशी असून तिचे बोध चिन्ह आहे शिंगवाला बोकड. मित्रानो हिंदू पुराणांमध्ये मकर हा समुद्री प्राणी असल्याचाही उल्लेख आहे. या प्राण्याचा पुढचा भाग बकऱ्यासारखा आणि उरलेला भाग एखादा मासा, मगरीसारख्या आकाराचा आहे. मगर हा अगदी सुस्तूपणे पडून राहणारा प्राणी परंतु तितक्याच ताकदीने आपल्या शिकारीवर तुटून पडणारा.
शिकारीची वाट बघत अगदी कितीही वेळ सुस्तपणे पडून राहणारा हा स्वभाव मकर राशीचा मंडळींमध्ये दिसून येतो. या राशीचे लोक पूर्ण यश जोवर मिळत नाही तोवर प्रयत्न आणि चिकाटी कधीही सोडत नाहीत. एकदा का यश शेवटच्या मार्गावर आलं कि त्यावर हल्ला करून ते यश आपल्या पदरात पाडून घेणं यांना चांगलंच जमत.
त्यामुळे बऱ्याचदा नियतीसुद्धा त्यांच्या याच संयमाची परीक्षा घेते कि काय त्यांच्या आयुष्यातले प्रसंग पाहिले कि वाटायला लागत. मित्रानो यांना यांच्या मेहनतीचं फळ पुरेपूर मिळत. या राशीचा स्वामी ग्रह आहे शनी , वर्ण वैश्य आणि तत्व पृथ्वी असल्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम हा सर्व वेदबंध असतो. वेळेचं आणि पैशांचं व्यवस्थापन करण्यात हि मंडळी अतिशय हुशार असतात. कष्ट करण्यात यांचा हात कोणीही धरू शकत नाही.
अत्यंत कष्टाळू आणि मेहनती लोकांची हि राशी मानली जाते. यश मिळवण्यासाठी सतत धडपडत राहणारी हीच ती मंडळी असतात. राशीचा स्वामी ग्रह शनी असल्यामुळे मेहनतीला यश हे बर्यापैकी उशिरा मिळताना दिसत. कारण शनी म्हणजे उशिरा मिळणार यश. परंतु यांच्या उत्तर वयात यांना बऱ्यापैकी सुखाचे दिवस येताना दिसतात. नियोजनात तरबेज असतातच शिवाय चांगला सल्लागार म्हणून देखील यांची ओळख आहे.
नोकरी करून एखादा छोटा व्यवसाय सुद्धा करायची यांची तयारी असते. किंबहुना नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याकडे यांचा जास्त कल असतो. तसेच एकापेक्षा अनेक व्यवसाय करण्याची क्षमता यांच्यामध्ये सर्वात जास्त असते.मकर राशीच्या व्यक्तींची तूळ, मिथुन, कन्या, वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींशी मैत्री होते. कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीशी यांच फारस पटत नाही.
सप्टेंबर महिन्यात कुटुंबातील प्रत्येकाशी तुमचे वर्तन मैत्रीपूर्ण असेल आणि घरातील प्रत्येकाचे तुमच्यावरील प्रेम वाढेल. घरात काही शुभ कार्य घडून येण्याचे संकेत आहेत , ज्यामुळे प्रत्येकाचे मन प्रसन्न राहील. अशा शुभ वातावरणामुळे तुमच्या शत्रूंच्या मनात तुमच्या बद्दल द्वेष वाढू शकतो आणि ते तुमच्या कुटुंबात कटुता आणण्याचा प्रयत्न करू शकतात.
सप्टेंबर महिन्यात तुम्हाला अनेक नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थतीत वाढ होईल. या काळात तुमची कल्पनाशक्तीही वाढेल, ज्यामुळे तुम्हाला नवीन क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. निर्णय घेताना बुद्धीचा वापर करून निर्णय घ्या आणि तुमचे बोलणे गोड ठेवा. तुम्ही व्यवसायात नवीन करार करू शकता जे तुम्हाला भविष्यात यश मिळवून देईल.
जर तुम्ही स्वतः नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्यात तुमचा विचार बदलू शकतो. तुमचे लक्ष स्वतःचा व्यवसाय करण्यावर असेल, ज्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांशी चर्चा करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात प्रवासाला जावे लागू शकते, त्यामुळे पूर्ण काळजी घ्या.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष कमी लागेल आणि त्यांची आवड कला क्षेत्रात अधिक वाढेल. संगीत क्षेत्रात तुम्ही नवीन वाद्ये शिकण्यावर भर द्याल. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागेल आणि यामध्ये त्यांना त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल.
प्रामुख्याने अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि बी.कॉम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा महिना अगदी अनुकूल आहे. अशा परिस्थितीत कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका कारण ती भविष्यात फायदेशीर ठरू शकते.
विवाहित जोडप्यांचे संबंध आधीपेक्षा अधिक गोड बनतील. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडूनही एखादी चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तरुण जोडप्यांचा प्रेमभंग होऊ शकतो आणि ते इतर कोणाकडे आकर्षित होऊ शकतात ज्यामुळे नात्यात अंतर येईल.लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांची चर्चा पुढे जाऊ शकते, ज्यामुळे मन प्रसन्न होईल.
महिन्याच्या मध्यात, तुम्हाला शारीरिकदृष्ट्या काही किरकोळ समस्या जाणवू शकतात.अशा परिस्थितीत स्वतःची पूर्ण काळजी घ्या आणि योग्य वेळी अन्न खा. जर तुम्ही गरोदर असाल तर महिन्याच्या मध्यात अचानक तुमचे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच वेळोवेळी तुमची तपासणी करत राहा.
मानसिकदृष्ट्या तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांबद्दल चिंता जाणवेल परंतु ती चिंता देखील कोणीतरी सोडवेल.जर तुम्ही लग्नासाठी मुलगी पाहत असाल तर या महिन्यात चांगल्या मागण्या येऊ शकतात. परंतु घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका आणि त्या नात्याला थोडा वेळ द्या , अन्यथा नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.