नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो घरात सर्व लोक महादेवाची पूजा करतात. महादेवांची मूर्ती, प्रतिमा किंवा शिवलिंग ठेवून मनोभावे पूजा केली जाते. परंतु कधीही आपल्या घराच्या देवघरात महादेवाचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये.
देवघरात नेहमी फक्त महादेवाची पिंड ठेवावी. कारण महादेवाचा फोटो आणि मूर्ती हे फक्त स्मशानामध्ये असते आणि मानवाला फक्त महादेवाच्या पिंडीची पूजा करण्याबद्दल सांगितले गेले आहे.
घरात पिंड ठेवताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. जसे कि महादेवाची पिंड हि 3 इंच पेक्षा मोठी नसावी.
3 इंच कशी घ्यावी हे कळत नसेल तर तुम्ही जेव्हा कधी महादेवाची पिंड घ्याल तेव्हा पिंड हि तुमच्या हाताच्या अंगठ्या एवढी असेल अशी घ्यावी.
अंगठ्यापेक्षा मोठी पिंड घेऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे पिंडीवर नाग नसावा. आणि पिंडीवर नंदी सुद्धा नसावा.
महादेवाची पिंड साधी असेल तरी चालते. दगडाची असेल तरी काही हरकत नाही. पण जमलेच तर पिंड पितळेची ठेवावी.
महादेवाच्या पिंडीची रोज सकाळी पूजा करताना जल अभिषेक करावा. मित्रांनो कुंकू, सिंदूर आणि हळदी महादेवाच्या पिंडीवर अर्पित करू नये.
देवघरात महादेवाची पिंड ठेवताना आधी आपल्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवावी.
घरात गणपतीची मूर्ती असेल तर सर्वात आधी उजव्या हाताला ती मूर्ती ठेवावी त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला महादेवाची पिंड ठेवावी आणि नंतरच सर्व देव ठेवावे.
जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर सर्वात आधी महादेवाची पिंड ठेवावी. या प्रकारे तुम्ही घराच्या देव्हाऱ्यात महादेवाची पिंड स्थापित करू शकता.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.