नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज 11 मार्च, गुरुवारच्या दिवशी वर्षातील सर्वात मोठा दिवस, म्हणजेच महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री म्हणजे भगवान महादेवांचा खूप मोठा आणि अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो.
महाशिवरात्री ला बरेच लोक उपवास करतात, व्रत करतात. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो.
मित्रांनो महाशिवरात्री हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याने या दिवशी भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय, तोडगे, मंत्र जप, पूजा केल्या जातात.
या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतलं जातं, पूजा केली जाते, त्यांच्या शिवलिंगावर अभिषेक केला जातो. हा अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो.
हा दिवस महादेवांसाठी अत्यंत प्रिय आहे. या दिवशी महादेवांना प्रसन्न करणे खूप सोपे असते. आजच्या दिवशी केलेल्या पूजा, पाठ, यांच्यामुळे भगवान आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात.
भगवान महादेव जर अपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, आपल्या घरी श्रीमंती नांदू लागेल. आपल्या आयुष्यात असलेले संकटं निघून जातील.
मित्रांनो महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतातच, आपल्याला फक्त गरज आहे ती पूर्ण विश्वास ठेवून भक्ती ने, मनापासून त्यांची पूजा करण्याची.
आज आपण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी असाच एक मंत्र पाहणार आहोत, या मंत्राचा जप आपल्याला फक्त 11 वेळेस करायचा आहे. हा अत्यंत चमत्कारी असा मंत्र आहे.
मित्रांनो 11 मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेस, जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण या मंत्राचा जप 11 वेळेस करावा.
सकाळी किंवा संध्याकाळी स्नान वगैरे करून, स्वच्छ कपडे घालून देवा समोर बसून दिवा लावावा. आणि अगरबत्ती लावावी. देवासमोर बसून आपण या मंत्राचा जप करू शकता.
मित्रांनो जर तुम्ही महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात असाल तर तिथे महादेवाच्या शिवलिंगा समोर बसून सुद्धा या मंत्राचा 11 वेळा जाप करू शकता. चला तर जाणून घेऊया कोणता मंत्र आहे.
हा मंत्र आहे ओम नमो महादेवाय नमः
मित्रांनो भगवान महादेवांचा अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि चमत्कारी असा हा मंत्र आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी या पवित्र मंत्राचा जप 11 वेळेस करायला अजिबात विसरू नका.
या मंत्राच्या प्रभावाने भगवान महादेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी, संकटं, समस्या दूर होऊन जीवनात धन, धान्य, पैसा यांची कमी कधीच पडणार नाही.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.