नमस्कार मित्रांनो
सध्याच्या काळात चुकीचा आहार, आधुनिक जीवनशैली आणि जंक फूडचा जास्त अशा अनेक कारणांमुळे वयोवृद्धच नाही तर तरुण देखील आजारांच्या विळख्यात सापडत आहेत.
वयोवृद्धांना सर्रास होणारा आजार म्हणजे डायबेटिज ज्याला आपण मराठीत मधुमेह म्हणतो. स्वादुपिंड इंसुलिन संप्रेरकाचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते तेव्हा मधुमेहा सारखे आजार डोके वर काढतात. त्यानंतर रुग्णाच्या रक्ताची पातळी अनियंत्रितपणे चढ -उतार करत राहते.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अयोग्य आहारामुळे सुद्धा मधुमेहा सारखे आजार होऊ शकतात , अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहाराची खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
कारण रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने किडनी फेल्युअर, हार्ट फेल्युअर आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या जीवघेण्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. मधुमेहावर कोणताही इलाज नसला तरी अश्वगंधाच्या मदतीने यावर नियंत्रण मिळवता येते असे आरोग्य तज्ञांचे मत आहे.
अश्वगंधा हि वनस्पती आयुर्वेदिक औषधांमध्ये हजारो वर्षांपासून वापरली जात आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की अश्वगंधा शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन प्रभावित करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. एवढेच नाही तर अश्वगंधा रक्तात इन्सुलिनचा स्राव उत्तेजित करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील कमी होऊ शकते.
अशा प्रकारे करा अश्वगंधाचे सेवन
मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज एक ते दोन चमचे म्हणजेच 3-6 ग्रॅम अश्वगंधाचे सेवन करावे. तुम्ही अश्वगंधा पावडर पाण्याबरोबर किंवा तुपात मिसळून खाऊ शकता. टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अश्वगंधा खूप फायदेशीर आहे.
या व्यतिरिक्त, आपण काढा करून देखील सेवन करू शकता. यासाठी ३-४ चमचे अश्वगंधा पावडर ३ कप पाण्यात मिसळा. नंतर हे पाणी सुमारे 15 मिनिटे उकळवा.
जेव्हा या पाण्याचा एक चतुर्थांश भाग शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करून ते गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. कोमट झाल्यावर याचे सेवन करा. जर तुमची इच्छा असेल तर आपण अश्वगंधा कॅप्सूल देखील घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती इंटरनेटच्या आधारावर असून आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आवश्यक.