नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपले भाग्य घेऊन जन्माला येतो. काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात जास्त यश मिळत. मात्र काही जणांना कितीही प्रयत्न केले तरी यश हुलकावणी देत राहत.
ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशींपैकी चार राशींच्या मुली अशा ज्यांना भाग्यवान म्हणायला हवं. कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना भाग्यवान का म्हणायचं ? हेच आज आपण या लेखाद्वारे माहित करून घेणार आहोत.
धनु रास
धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. गुरु हा अतिशय शुभ मानला जातो. या ग्रहाच्या प्रभावामुळे धन आणि संपत्तीची प्राप्ती होते. धनु राशीवर ग्रहांची विशेष कृपा असल्यामुळे या राशीचे लोक भाग्यवान मानले जातात. हे लोक जे काम हातात घेतात त्यात त्यांना यश हमखास मिळत.
या राशीच्या मुली अत्यंत नशीबवान असतात. कारण धनु राशीच्या मुलींचा स्वभाव शांत , करारी आणि शिस्तप्रिय असतो. तसेच या मुली गरिबांवर प्रेम करणाऱ्या , अडल्या नडलेल्यांना मदत करणाऱ्या आणि जशी समोरची व्यक्ती असेल तशीच वागणूक देणाऱ्या असतात.
म्हणजेच लहान बालकांच्या सहवासात त्यांचा वात्सल्य भाग जागृत होतो. तर वडीलधाऱ्या व्यक्तींसमोर त्या नम्र होतात. त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात त्यांच्या प्रेम भावना उफाळून येतात. परमेश्वरा समोर त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. तर दुष्ट आणि नालायक व्यक्तींवर त्या तुटून पडतात. मित्रानो या मुलींना सासरी कशाची म्हणून कमतरता भासत नाही.
मीन रास
या राशीच्या मुली मनाने अतिशय प्रेमळ आणि गुणवान असतात. त्या स्वतः बरोबरच इतरांसाठी देखील भाग्यशाली मानल्या जातात. ज्यांच्या घरात या मुली लग्न करून जातात त्यांच्या घरात सुख शांती नांदते. या राशीच्या मुली आपल्या करियर मध्ये देखील उच्च स्थान प्राप्त करतात. असं जरी असलं तरी मीन राशीच्या स्त्रिया या सात्विक असतात.
वृषभ रास
वृषभ राशीच्या मुली अतिशय बुद्धिमान , मेहनती आणि भाग्यवान असतात. त्या आपल्या मेहनतीने करियर मध्ये यशस्वी होतात. त्यांच्या सोबत जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भाग्याचा लाभ मिळतो.
वृषभ राशीच्या मुलींना सर्वच गोष्टीत टापटीपपणा लागतो. यांना सौंदर्य दृष्टी देखील उत्तम लाभलेली असते. तर अशा या वृषभ राशीच्या मुली देखील भाग्यवान म्हणाव्या लागतील.
कर्क रास
कर्क राशीचे लोक भाग्यवान मानली जातात कारण ती ज्या कामात हात घालतात त्या कामात सफलता मिळवतात. या राशीच्या मुलींचं नशीब फार बळकट असत. त्यामुळे त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते.
कर्क राशीच्या स्त्रिया या प्रेम पण काही बाबतीत निश्चयी , गृहकृत्य दक्ष , धार्मिक वृत्तीच्या , घरगुती कलांमध्ये निपुण असणाऱ्या , स्वयंपाक घरावर प्रेम करणाऱ्या आणि सतत स्वतःला कुठल्यातरी कामात गुंतवून ठेवणाऱ्या असतात.
कर्क राशीच्या मुलींना स्वच्छतेची आवड असते. स्वतः पेक्षा जास्त ते नवर्याकडे आणि मुलांकडे लक्ष देतात. घराचं बजेट उत्तम रित्या सांभाळतात. म्हणूनच कर्क राशीच्या मुली ज्या घरात जातात त्या घराचं कल्याण करतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.