खऱ्या प्रेमाची व्याख्या सांगणारी महेश आणि सुष्मा ची प्रेम कहाणी…

0
658

सुषमा कला शाखेत महाविद्यालयात शिकत होती. रंगाने गोरी, काळेभोर लांब केस, गालावर हसताना उमटणारी खळी. तीच्या ओठांवर असणारी लाली, सर्वांना भुरळ पडेल असे खूप सुंदर रूप होतं तिचं.

तिच्याच वर्गात शिकत असलेला महेश. हा देखील उंच गोरा असा, एखाद्या राजपुत्राला शोभेल असाच होता. हे दोघेजण रोज एकमेकांना बघत असत. हे दोघे एकाच उपनगरात वाढलेले. सुषमा पुरातन संस्कृतीमध्ये वाढलेली त्यामुळे पुरातन पध्दतीचा सुषमाचा पेहराव असायचा. जितकी रूपवान तितकी कडक स्वभावाची असल्याने तिच्या कॉलेज मधील मुले फक्त तिला बघत होती. ती कॉलेजला चालत येत असे.

महेशचा बेलबॉटम शर्ट आणि पँट, पायात बुट असा पेहराव असायचा. तो रोज सायकल वरून कॉलेजला येत असे. त्या दिवशी शनिवारी कॉलेजचा शेवटचा दिवस होता. पुढील आठवड्यात परीक्षा सुरू होणार होती.
तेव्हा महेशने सुषमाला ग्रंथालयात गाठले. भीतभितच इंग्रजीच्या नोट्सची मागणी केली. तो तिचा शेजारी असल्याने त्याला तिने नोट्स दिल्या.

महेशच्या मनात ती चांगलीच भरली होती आणि तिला ही त्याचा स्वभाव आवडत होता. सुषमा ही आपल्या जीवनाची साथी असावी असा त्याने विचार करून ठेवला होता. त्या दिवशी त्याने नोट्स परत केल्या. त्यातून मला तू खूप आवडतेस अशी चिठी त्याने दिली. मग तिने ती चिठ्ठी वाचून त्याच्याकडे बघत स्मित हास्य केले. मग काही दिवसात त्यांची पुन्हा भेट झाली.

एके दिवशी दोघांनी ठाम विश्वास दाखवून घरच्या लोकांच्या कानावर ही गोष्ट घातली. दरम्यान दोघेही एकाच कॉलेजवर लेक्चरर च्या नोकरीला लागले. त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. मोठया थाटामातात त्यांचे लग्न झाले. त्यांनी एक फ्लॅट खरेदी केला. त्यामध्ये त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला.

सुषमा एवढी रूपवान होती की सर्व जर तिच्या रूपावर फिदा झाले होते. असेच काही दिवस गेले. एक दिवस सुषमा जेवण करत असताना गॅ सचा एकदम स्फो ट झाला. त्यामध्ये ती खूप जखमी झाली त्यामध्ये तिचा चेहरा खूप भाजला असल्याने खूप विद्रुप दिसत होता. ही बातमी कळताच महेश लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

त्याला पाहताच तिला रडू आले आणि मनात एक विचार आला की आपल्या सुंदरतेवर फिदा झालेला महेश आपला विद्रुप चेहरा पाहून काय करेल? तिचा हा बदलाव पाहून महेश खचून गेला होता एक दिवस असाच रस्त्यावर जाताना त्याला एक वाहनाने ठोकरले. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तो कदाचित त्याची दृष्टी गमावेल असे सांगितले. त्याला खूप अंधुक दिसू लागले.

सुषमाचा विद्रुम चेहरा त्याला दिसत नव्हता. या घटनेनंतर सुषमा ही खूप कमजोर झाली होती. एक दिवस अचानक तिची प्राणज्योत मावळली. याचे महेशला खूप दुःख झाले. तिचे अंत्यसंस्कार झाल्यावर महेश ने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तो असा दृष्टीहीन असल्याने त्याच्या मित्रांनी त्याला खुप समजावून सांगितले. तू एकटा कुठे गेला तर तुझी सेवा कोण करणार असे विचारताच महेशच्या उत्तराने सर्व जण हादरून गेले.

तो म्हणाला की मी मुळात दृष्टीहीन नाही तर सुष्माला तिच्या विद्रूप चेहऱ्यामुळे सतत वाईट वाटू नये म्हणून मी तिला मला अंधुक दिसत असल्याचे सांगितले. मला तिची काळजी होती. सुंदरता ही खूप क्षणिक असते याची मला पूर्ण जाण होती. जिने माझ्यावर प्रेम केले तिला वाईट वाटू नये म्हणून मी तिच्याशी हे खोट बोललो.

त्याच्या या उत्तराने सर्वांचे डोळे पाणावले आणि सर्वजण म्हणू लागले की प्रेम असावे तर सुषमा आणि महेश सारखे.

मित्रांनो कथा आवडली असेल तर आपले मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.

अशाच सुंदर प्रेम कथा रोज वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here