कॉलेजला जाताना पहिल्यांदा पाहिलं तिला. दिसायला खूपच सुंदर होती ती , जणू स्वर्गातील अप्सराच. तिच्या सौंदर्याचे कौतूक करायला शब्द अपुरे पडतील एवढी सुंदर देवाने तिची निर्मिती केली होती. तिचे सौंदर्य पाहून कुठलाही मुलगा तिच्या प्रेमात पडेल.
आज पहिल्यांदा तिला पाहिलं आणि बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडलो. स्वर्गलोकातून माझ्यासाठीच देवाने हिला पाठवली असेल असे मला वाटायला लागले. आज ४ दिवस झाले तिला रोज बघतोय. कदाचित तिला सुद्धा संशय आला असेल कि मी तिच्यावर नजर ठेवून आहे.
बऱ्याचदा तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तिच्या समोर जाताच मी सगळं विसरून जायचो. कशी बशी हिंमत करून एक दिवस तिला विचारायचं ठरवलं , पण मनात वाटायचं की नाही बोली तर ? मग विचार आला कि आधी मैत्री करू मग पुढे काय करायचं ते ठरवू.
मग रोज तिच्याशी बोलायला काहीतरी बहाणा शोधू लागलो. कधी पेन , कधी पुस्तक असे बहाणे बनवत तिच्याशी बोलायला लागलो. ती सुद्धा मला प्रतिसाद देऊ लागली. हळू हळू आमच्यात मैत्री वाढत गेली. बरेच महिने असेच उलटून गेले. दरम्यानच्या काळात तिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर माझा खूप जास्तच जीव जडू लागला होता.
मी उठता बसता तिचाच विचार करू लागलो होतो. एक दिवशी मन घट्ट करून विचारायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे कॉलेज सुटल्यावर तिला विचारायला गेलो. बघतो तर काय ती एका मुला सोबत होती. तेवढ्यात तिच्या मैत्रिणीचा आवाज आला कि तुझा बॉयफ्रेंड तर खूपच हँडसम आहे ग. हे शब्द ऐकताच माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं.
तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. असं वाटत होत कि सांगून टाकावं मनात काय आहे ते. किती दिवस प्रेमाचं हे वादळ मनातच रोखून ठेवणार ? पण ती दुसऱ्या मुलावर प्रेम करायची , त्यांच्या नात्याला ३ वर्ष झालेली. शेवटी ठरवलं कि कधीतरी तिचा ब्रेकअप होईल आणि तेव्हा मी तिला माझ्या मनातील भावना सांगेन.
काही दिवसांनी तिने तिच्या बॉयफ्रेंडशी ओळख करून दिली. मनातल्या मनात म्हटलं याच्यापेक्षा तर मी भारी दिसतो पण तोंडावर बोलायची हिमंत होत नव्हती. कारण प्रेम करायचो ना तिच्यावर. तिला वाईट वाटलं असत , कदाचित बोलणे बंद केले असते म्हणून गप्प राहणे पसंद केले.
कुठे फिरायचं ठरलं कि ती मला बोलवायची. काही दिवस मी दोघात तिसरा या नात्याने त्यांच्या सोबत फिरलो. काही दिवस त्याच्या सोबत फिरल्या नंतर मला कळले कि तो माणूस म्हणून वाईट नाही. पण मी तरी कुठे वाईट होतो ? माझा सुद्धा जीव आहेच कि तिच्यावर.
असेच दोन महिने उलटून गेले. शेवटी निर्लज्ज व्हायचं ठरवलं आणि तिला विचारले. माझे शब्द ऐकताच तिला जणू झटकाच बसला. थोडा वेळ स्मशान शांतता पसरली. नजरेला नजर देण्याची कोणातच हिंमत होत नव्हती. बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. शेवटी तिने पुढाकार घेतला आणि बोलली तुला माहीत आहे ना मी ऑलरेडी एका मुलावर प्रेम करते मग मी तुला होकार कसा देऊ तूच सांग ?
तिने मला नकार दिला. तेव्हा पासून माझं आयुष्य जणू वाळवंट झालं होत. काहीच कळत नव्हतं काय करायचं. अभ्यासात पण लक्ष लागत नव्हतं. नकार दिल्यामुळे मी कॉलेजला जाणे सोडून दिले होते. कित्येकदा तर आत्महत्येचा विचार मनात यायचा. मरत नाहीये म्हणून जगतोय असं आयुष्य जगत होतो.
मला नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले होते. एक दिवस अचानक मला कळले कि तिला कॅन्सर होता आणि त्यात तिने जीव गमावला. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
वर आभाळाकडे बघत तोंडातून एवढेच शब्द बाहेर आले कि देवा तिच्या आधी मला का नाही बोलावलेस ? निदान तिच्या स्वागताची तयारी मी केली असती. एवढ्यात भानावर आलो आणि डोक्यात विचार आला की तिचा बॉयफ्रेंड कुठे गेला ?
एक दिवस भेटलो त्याला. कान पकडून त्याला बोललो काय रे तू सांगितले का नाहीस मला कि कॅन्सर आहे तिला ? तो बोलला तिनेच सांगितले होते तुला सांगू नकोस म्हणून…कारण ती माझ्यावर नाही तुझ्यावर प्रेम करायची.
त्याच्या तोंडून हे शब्द ऐकले आणि मेल्याहून मेल्यासारखं झालं. मी त्याला विचारलं मग तुमचं प्रेम ? तो बोलाला आमच्यात प्रेम कधीच नव्हत. मी तर तिचा चुलत भाऊ आहे. तुला जेव्हा तिने पहिल्यांदा एका गरीब बाईला मदत करताना पहिला त्याच वेळी ती तुझ्या प्रेमात पडली.
तिने तुला हि गोष्ट कधी सांगितली नाही कारण तिला माहिती होत कि तू तिच्यावर प्रेम करायचा , म्हणून तिने हे सर्व नाटक केल. पण आज ती या जगात नाही राहिली . गेली कायमची सगळ्यांना सोडून , पण जाताना तिने मला एक चिट्ठी दिली आहे. ती चिट्ठी तुला दयायला सांगितली होती.
मी घाई घाईने हावऱ्या सारखी ती चिट्ठी त्याच्या हातातून हिसकावून घेतली आणि वाचू लागलो. त्यात लिहल होत की मी तुझ्यावर प्रेम करते पण कधी सांगू शकली नाही. मला कॅन्सर असल्यामुळे माझ्या मनात असताना सुद्धा पुढाकार घेतला नाही. शक्य झालच तर मला माफ कर.
ती चिट्ठी वाचता वाचता तो तिथेच मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागला. त्याला अश्रू अनावर झाले. आज खऱ्या अर्थाने त्याच आयुष्य संपलं होत. पण तो पुन्हा नव्याने उभा राहिला आणि त्या दिवसापासून ठरवलं कि कॅन्सर झालेल्या लोकांसाठी काही तरी करायच.
आज 60 वर्ष झाली या गोष्टीला. मी आज सुद्धा कॅन्सर झालेल्या व्यक्तींना शक्य तेवढी मदत करतो. मला विश्वास आहे ती जिथून कुठून मला बघत असेल नक्कीच खुश होत असेल. आज ती माझ्या सोबत नाही पण तिच्या आठवणी , तिचा सहवास नेहमीच माझ्या सोबत आहे… समाप्त…
लेखन – समृद्धी शिरोडकर
मित्रानो स्टोरी आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच स्टोरी वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.