नमस्कार मित्रानो,
मित्रानो प्रत्येक राशीमध्ये प्रेमाचे काही विशिष्ट गुण असतात. पण तेच गुण बऱ्याचदा त्यांच्यासाठी दोष ठरतात. या मागे कारण असे कि या राशीचे लोक पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे एक वेगळे महत्व आहे. प्रत्येक राशीला स्वताचे वेगळे गुण आहेत.
प्रत्येक राशीचा एक स्वामी असतो आणि त्या स्वामींच्या प्रभावानेच त्या व्यक्तीचे भाग्य ठरत असते. राशी कोणतीही असो आयुष्यात चढ उतार हे ठरलेलेच आहेत. ग्रहांची दिशा बदलली कि आयुष्याची दिशा बदलायला फार वेळ लागत नाही.
जर राशींमध्ये गुण आहेत तर उलटपक्षी अवगुण देखील आहेत. राशी कोणतीही असो एकही राशी परिपूर्ण अशी नाही. मित्रानो काही राशींमध्ये असणारा प्रेमाचा गुण त्यांच्यासाठीच दोष ठरतो. कारण या राशीच्या व्यक्ती पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.
मिथुन रास : मिथून राशीचे लोक त्याच्या आयुष्यात प्रेमाला खूप महत्व देतात. प्रेम भावनेबद्दल या व्यक्ती खूपच संवेदनशील असतात. सौंदर्याला भाळून बऱ्याचदा या व्यक्ती प्रेमात पडत असतात. यांचं मन चंचल असते. एकाच ठिकाणी न टिकणारे. एखादे रिलेशन खराब झाले तरी पटकन मूव्ह ऑन होतात.
सिंह रास : सिंह राशीचे लोक व्यवहारी स्वरूपाचे मानले जातात. यांच्या ओळखी खूप वर पर्यंत असतात. राजकारणी लोकांसारखे बोलणे यांना खूप उत्तम जमते. त्यामुळे यांच्याकडे लोक आकर्षिले जातात आणि हे लोक सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे लवकर आकर्षित होतात.
परिणामी यांना वारंवार प्रेम होत राहते. असलेले नाते काही कारणास्तव बिघडले तरी दुसऱ्या रिलेशनशिपसाठी नेहमी तयार असतात. हा त्यांचा दोष नसून राशीचा दोष आहे.
तूळ रास : या राशीचे लोक आपल्या जोडीदाराप्रती अगदी प्रामाणिक आणि इमानदार मानले जातात. अगदी प्रामाणिकपणे प्रेमाचे नाते निभावतात. आपल्या प्रेमासाठी जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत.
मात्र नात्यात काही खटके उडाले कि दुसरं नातं नव्याने सुरु करायला मागे पुढे बघत नाहीत. अगदी व्यावहारिकपणे दुसऱ्या नात्याला सुरु करण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे यांना जास्त वेळा प्रेम होत राहत.
धनु रास : धनु राशीच्या लोकांना अतिशय रोमँटिक मानले जाते. यांच्या अंगी रोमँटिकपण इतका असतो कि यांना मनी प्रेम भावना उफाळून यांना प्रेम होते. हे लोक प्रेमाचे नाते एकनिष्ठतेने निभावतात.
नात्यामध्ये काही कारणांमुळे दुरावा आला कि नवीन नाते सुरु करण्याकडे यांचा कल राहतो. जुने नाते एकदा संपले कि पुन्हा त्या व्यक्तींशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवत नाहीत.
राशिभविष्य विषयक पोस्ट, राशींच्या स्वभावा बद्दल माहिती, आणि इतर उपाय वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.