या ३ राशींच्या व्यक्ती प्रेमापासून दूर राहणेच पसंद करतात. यांना प्रेमाचे महत्व समजत नाही.

0
353

नमस्कार मित्रानो

मित्रानो प्रत्येकाला प्रेमाच्या बाबतीत नवल असतेच. अनेकांना वाटत असते कि आपल्यावर पण जीवापाड कोणीतरी प्रेम करावे. जीवनात प्रेम मिळाले कि प्रत्येकजण ते प्रेम सफल कसे होईल याचा प्रयन्त करत असतो. परंतु मित्रानो असेही काही लोक आहेत ज्यांना प्रेमाचे महत्व समजत नाही.

प्रेम म्हणजे त्यांच्यासाठी एक विनोदाचा भाग असतो. या व्यक्तींना प्रेमाचा जणू फोबियाच आहे असे म्हणायला हरकत नाही. या व्यक्ती नेहमीच प्रेमापासून दूर पळत राहतात. या सर्वात यांचेच नुकसान होते.

या राशीच्या लोकांना एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले तरी ते मान्य करत नाहीत. सतत प्रेमापासून दूर जाण्याचा प्रयन्त करतात. आपण स्वतःहून समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे यांना अवघड वाटते आणि प्रेम टिकवून ठेवणे देखील तितकेच अवघड वाटते.

मित्रानो काही लोक असे असतात कि आपल्या प्रिय व्यक्तीच्या एका भेटीसाठी जगाच्या एका कोपर्या पासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रवास करतात. भेट अविस्मरणीय व्हावी म्हणून नाना तर्हेच्या गोष्टी करतात. आपले संपूर्ण आयुष्य त्याच व्यक्ती सोबत घालवायची स्वप्न रंगवतात.

याउलट काही लोक मात्र मला प्रेम होतंय कि काय ? याच कल्पनेने घाबरून प्रेमापासून दूर पळू लागतात. प्रेमात नेहमी धोकाच भेटतो असे यांचे ठाम मत असते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींचे लोक प्रेमापासून दूर राहणे पसंद करतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.

सिंह रास

मित्रानो या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची काहीच कमतरता नसते. परंतु प्रेमाच्या बाबतीत मात्र यांचा आत्मविश्वास पूर्ण शून्यावर येऊन पोहोचतो. या राशीच्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाहीत. स्वतःला पूर्णतः दुसऱ्याच्या स्वाधीन करत नाहीत. प्रेमात आपल्याला धोकाच भेटेल याच कल्पनेत जगतात.

कन्या रास

या राशीच्या लोकांना प्रेमात पडण्याची भीती वाटते. यांना सतत असे वाटत असते कि दुसरी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळेल , विश्वासघात करेल , फसवणूक करेल. जेव्हा या राशीच्या व्यक्तींना असे वाटते कि आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करू लागलोय तेव्हा पुढाकार न घेता या व्यक्ती एक पाऊल मागे येणे पसंद करतात.

धनु रास

धनु राशीच्या व्यक्ती उत्स्फूर्त आणि धैर्यवान म्हणून ओळखले जातात. परंतु जेव्हा प्रेमाची गोष्ट येते तेव्हा ते घाबरतात, भित्रे बनतात आणि माघार घेतात. ते सहजासहजी लोकांच्या जाळ्यात अडकत नाहीत आणि सुरक्षीत राहणे पसंत करतात.

मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here