नमस्कार मित्रानो
मित्रानो आजची पिढी खूप सक्षम आणि बुद्धिमान आहे. हल्लीच्या जमान्यात असे होते कि आई वडिलांना मुलगा किंवा मुलगी बघायची गरज भासतच नाही. या तरुणाईला स्वतःचे जीवन साथीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य बऱ्याच घरातील मंडळी देतात. प्रेमविवाह करणे आजच्या पिढीला खूप आनंददायी वाटते आणि प्रेम विवाह करणे देखील योग्य आहे.
प्रत्येकाला असे वाटते की त्यांचा विवाह अशा व्यक्तीशी व्हावा ज्यांना ते चांगले ओळखतात, जे त्यांना समजतात आणि त्यांच्याबद्दल सर्व काही समजून घेतात. जे एकमेकांवर प्रेम करतात त्यांना प्रेम विवाह करण्याआधी एकमेकांना जाणून घेण्यास त्यांना खूप वेळ मिळतो.
आजच्या तरुण मंडळींना त्यांच्या जीवन साथीदाराने प्रेम द्यावे, आदर करावा असे वाटते. पण पूर्वीच्या काळात असे नव्हते. पूर्वीच्या काळात फक्त आई वडीलच नातं पक्के करायचे. पूर्वीच्या काळातील बऱ्याच जणांनी तर एकमेकांचा चेहरा न पाहताच लग्न केले आहे.
जर दोन्ही कुटुंब प्रेमाशी , त्यांच्या नात्याशी सहमत असतील तर हे लग्न यशस्वी होते. ज्योतिषशास्त्र अशा राशींबद्दल सांगते कि त्यांचे नशीब त्यांना प्रेम विवाहात यशस्वी करण्यासाठी खूप मदत करते. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचा अभ्यास केला गेला आहे. राशीनुसार व्यक्तीचे गुण, स्वभाव, भविष्य जाणून घेता येते.
सप्तम स्थान विवाहासाठी पात्र असल्याचे ज्योतिषी सांगतात. हिंदू धर्मात दोन प्रकारचे विवाह आहेत – ब्रह्मा विवाह, प्रेम विवाह. जेव्हा सातव्या घराचा संबंध 3, 5, 9, 11, 12 घरांशी होतो, तेव्हा प्रेमविवाह जुळून येतात. चला तर मग जाणून घेऊया अशा तीन राशींबद्दल जे प्रेमविवाहात भाग्यवान ठरतात.
मेष रास
मेष राशीच्या लोकांच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय अनुकूल असतो. या राशीचे लोक नवीन लोकांमध्ये खूप लवकर मिसळतात आणि लवकरच ते स्वतःचे महत्वाचे स्थान प्राप्त करतात. मेष राशीचे लोक आकर्षक, उत्साही असतात आणि प्रत्येकजण त्यांच्यावर खूप लवकर प्रभावित होतो.
हे लोक त्यांच्या नातेसंबंधाचा आदर ठेवतात आणि हुशारीने समस्यांचे निराकरण देखील करतात. हे लोक मोकळ्या विचारांमुळे असल्यामुळे लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांच्या आयुष्यात काही दुरावा राहतो पण नंतर सर्व काही सुरळीत होते.
मकर रास
मकर राशीचा अधिपती ग्रह शनि आहे. या राशीचे लोक त्यांच्या लग्नासाठी खूप प्रामाणिक असतात आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून त्याच प्रकारच्या प्रामाणिकपणाची अपेक्षा असते.हे लोक परिवारातील सदस्यांना नेहमी आनंदी ठेवतात. या राशीच्या लोकांना भविष्यात जीवन साथीदाराकडून खूप सहकार्य मिळते आणि या राशीच्या लोकांचे प्रेमविवाह नेहमीच यशस्वी होतात. या राशीचे लोक प्रेमविवाहाच्या बाबतीत खूप भाग्यवान समजले जातात.
कुंभ रास
कुंभ राशीचे लोक खूप हुशार असतात. या राशीचे लोक त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतात. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. या राशीचे लोक मुख्यतः प्रेम विवाह करतात. कुंभ राशीच्या लोकांचे घरगुती जीवनही खूप आनंदी असते.
या राशीचे लोक त्यांच्या जीवनसाथीदाराला भरपूर वेळ देतात आणि संपूर्ण कुटुंबाला त्यांचा अभिमान वाटतो. कुंभ राशीच्या लोकांचा त्यांच्या जोडीदाराशी सखोल संबंध असला तरी, काहीवेळा परस्पर मतभेदांमुळे हळूहळू दुरावा निर्माण होऊ शकतो. या राशीच्या लोकांसाठी अनावश्यक भांडणे दुर्लक्षित करणे हा एक चांगला पर्याय असतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.