एक मनाला भावणारी आणि विचार करायला लावणारी प्रेम कथा…
मित्रांनो एकदा प्रियाच्या घरचे कोणत्यातरी कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा तिने राजेशला अचानक फोन केला आणि खूप खुश होऊन, म्हणाली की, अरे राजेश कुठे आहेस, अरे पप्पा-मम्मी दोघेही बाहेर गेले आहेत, एकटीच आहे घरी खुप आठवण येते.
तिचे हे शब्द ऐकून राजेश पण खुश झाला आणि पाच मिनिटात येतो असे त्याने सांगितले. तीही नटून तयार होते.
तेव्हा राजेश प्रियाच्या घराकडे येतो, पण अचानक त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजते आणि राजेशने तिच्यासाठी राधा-कृष्णाची सुंदर मूर्ती गिफ्ट म्हणून आणलेली होती. तो त्या मूर्तीकडे बघतो, त्याला जाणीव होते कि, आज काहीतरी अभद्र, अशुभ घडणार असेल. तरी पण तो दुर्लक्ष करतो पण तिच्या घरापाशी येतो.प्रिया त्याचीच वाट बघत असेत.
राजेश आणि प्रियाच एकमेकांवर खूप प्रेम असतं. हे दोघे अगदी चार वर्षे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात. राजेश मुंबईला इंजिनीअरिंगचं तर प्रिया पुण्यात मेडि कलचे शिक्षक घेत असते. पण मध्ये सुट्टीत ते दोघेही गावी येतात. तसे ते रोज फोनवर बोलतात.
दोघही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. खरं प्रेम म्हणजे काय ना हे राजेश-प्रियाकडे बघितल्यावरच समजते. काही वेळ या दोघांच्या मस्त गप्पा रंगल्या. राजेशने तिला राधा-कृष्णाची मूर्ती भेट दिली. तीने देखील अगदी आनंदाने ती मूर्ती स्वीकारली.
मग काही वेळाने तिने फ्री जम धील डे री मि ल्क आणली आणि दोघांनी एकमेकांना भरवली अगदी छान प्रकारे भरवली. या वातावरणा मध्ये दोघेही खूप खुश होते. अचानक प्रियाने राजेशला विचारले की, पुढे काय विचार केला आहेस की नाही. माझ्या घरातून परवानगी आहे तुझ्या घरचे काय? किती दिवस अस मनात रंगवत ठेवणार आहेस, प्रियाने अगदी काळजीपूर्वक राजेशला प्रश्न विचारला.
त्यावर तो म्हणाला, अग मी तरी काय करू, माझ्या घरच्यांना काय विचारू, माझं वय काय, माझ अजून शिक्षण अपूर्ण आहे. यात जॉ ब नसल्याने, घरात लग्नाचा विषय कसा काढू.
त्यावर प्रिया म्हणाली, राजेश तसं काही नाही रे, मी मुलगी असल्याने मला पुढे हे नाते टिकले नाही तर प्रॉ ब्ले म होऊ शकतात.
त्यावर राजेश शांत होऊन म्हणाला की, हे बघ आपली जात वेगळी आहे, यात खूप फरक आहे. कारण माझ्या घरचे जात खूप मानतात. त्याच तुला काही सांगू शकत नाही आणि पळून जाऊन तुला लग्न करायचं नाही. त्यात आपले व्यवसाय वेगवेगळे आहेत.
राजेश मग मला या रिलेशनशिपमध्ये नाही राहायचे, कारण यानंतर तुला सोडन मला जमणार नाही रे, त्यापेक्षा आत्ताच थांबलेलं बरं, तुझं शिक्षण होईपर्यंत किंवा घरातून परवानगी मिळवण्यापर्यंत चांगले मित्र म्हणून आपण राहू.
प्रिया बोलताच राजेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काहीच नाही बोलला, तो तिथून उठला आणि त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला ठीक आहे प्रॉ मिस दे, तू नेहमी खुश राहशील. ती म्हणाली हो.
त्यावर प्रिया म्हणाली की, तु प्रॉ मिस दे की, दोन वर्षांनी मला न्यायला पुन्हा येशील आणि मी तुझी वाट पाहीन, त्यानंतर बराच वेळ ते तसेच उभे होते, एकमेकांकडे बघत पाणावलेल्या डोळ्यांनी पुढे त्या दोघांचं काय झालं हे कोणालाच माहिती नाही.
पण या गोष्टीवरून समजते की, खरच प्रेमामध्ये जात महत्त्वाची ठरते का? लग्न हे जातींशी निगडित असतं की माणसांशी? लग्न जर आपल्याला करायचं असतं मग आपले पालक का शोधतात? आपल्या समाजात प्रेम विवाहाला विरोध का आहे? याशिवाय मनाविरुद्ध लग्न करून सुखी संसार होऊ शकतो का?
प्रेम की आई-वडील असा प्रश्न उभा असेल तर काय निर्णय घ्यावा? असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात. तुमचाही अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवा.
मित्रांनो तुम्हाला कथा आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच सुंदर पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.