लॉकची चावी गुपचूप फेका इथे… समोरची व्यक्ती प्रेमात पागल झालीच म्हणून समजा…

0
720

नमस्कार मित्रांनो,

एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल, आणि त्या व्यक्तीला प्राप्त करण्याची तुमची जर इच्छा असेल, तर कुलूप आणि चावीचा हा छोटासा उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो आजपर्यंत अनेक लोकांनी कुलूप आणि चावीचा हा उपाय यशस्वीपणे केला आहे. ज्या व्यक्तीने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय केला आहे त्या व्यक्तींना त्याचं खरं प्रेम हे मिळालेलंच आहे.

हा उपाय करताना एकच विनंती आहे की कोणत्याही निष्पाप व्यक्तीला त्रास देण्यासाठी, किंवा ज्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे हे माहीत आहे अशा व्यक्तीला मिळवण्यासाठी आजचा हा उपाय करू नका.

या उपायाचा दुरुपयोग केल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक कुलूप आणि एक चावी लागेल. हा उपाय अत्यंत साधा सोपा आहे पण खूपच प्रभावशाली आहे.

मित्रांनो कुलूप आणि चावीचा हा उपाय समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचे दरवाजे उघडतो. समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू लागते. तुमच्या प्रेमात अक्षरशः वेडी होते. आयुष्यभर फक्त तुमचंच ऐकू लागेल.

मित्रांनो एक चावी आणि कुलूप घ्या. या सोबतच एक लाल रंगाचा पेन घ्यावा. म्हणजे लाल शाईचा पेन. मित्रांनो मंगळवारी सकाळी आपण हा उपाय करायचा आहे.

लक्षात घ्या मित्रांनो हा उपाय आपल्याला मंगळवारी सकाळी करायचा आहे. मित्रांनो मंगळवारी सकाळी उठून स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून हे कुलुप आहे ते लॉक करायचं आहे.

कुलूप लॉक केल्यानंतर ज्या व्यक्तीवर तुमचं खरं प्रेम आहे त्या व्यक्तीचे नाव लाल रंगाच्या शाईने या कुलुपावर लिहायचं आहे. त्यानंतर जी चावी असेल त्या चावी वर आपण स्वतःच नाव लिहायचं आहे.

कुलुपावर समोरच्या व्यक्तीचं नाव आणि चावी वर आपलं स्वतःच नाव लिहावं. त्यानंतर या चावीने हे कुलूप उघडायचे आहे.

हे कुलूप उघडताना आपण लिहलेले नाव पुसले जाणार नाही याची काळजी घ्या. हे लॉक उघडल्या नंतर आपण आपल्या घराजवळ असलेल्या कोणत्याही विहिरीजवळ जायचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा ही विहीर कोरडी पडलेली असावी. ज्या विहिरीत पाणी नाही अशा विहिरीजवळ आपल्याला जायचं आहे.

अशा कोरड्या विहिरीत अनेक शक्तींचा वास असतो असं तंत्र मंत्र शास्त्र मानते. या शक्तींना जागृत करण्यासाठी आपण हा एक छोटासा तोटका करत आहोत.

मित्रांनो अशा विहिरीजवळ जाऊन आपण हे कुलूप आणि ही चावी दोन्ही फेकून द्यायचं आहे. या दोन्ही वस्तू फेकल्यानंतर आपण मनोभावे या विहिरीला 7 प्रदक्षिणा घालाव्यात.

मित्रांनो प्रदक्षिणा घालताना पुढे दिलेल्या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो तो मंत्र आहे

कुंभ कुंभ नार हृदय मन कामना
पुर्य पुर्य ओम वरुनाय नमः

सात वेळा प्रदक्षिणा घालताना या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर काहीही न बोलता, पाठीमागे वळून न पाहता आपण सरळ घरी यायचं आहे.

मित्रांनो काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की आपण ज्या व्यक्ती साठी उपाय केला ती व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होत आहे. मित्रांनो या उपाया बद्दल आपण कोणाकडेही वाच्यता करू नका.

हे उपाय अत्यंत गुप्त असतात, त्यांची वाच्यता केल्याने त्यांचा प्रभाव तात्काळ कमी होतो. मित्रांनो याचा दुरुपयोग कधीही करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here