नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो घर म्हणलं की भांड्याला भांड लागणार, घरातील व्यक्ती एकमेकांना रागे भरतात, एकमेकांचा तिरस्कार करतात आशा घरी नकारात्मक ऊर्जा भरपूर असते.
घरी जर रोज वाद होत असतील, सतत चिडचिड, रागराग होत असेल, आपल्या माणसांबरोबर भांडण होत असेल तर हा उपाय नक्की तुम्हाला लाभदायी ठरेल.
हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी नांदते व घर समाधानी राहते. सर्वजण चांगले व शांतीने एकमेकांशी वागतात. आपल्या घरात वाद होऊ नयेत असे सर्वांना वाटत असते त्यामुळे जर वाद होत असतील, क्लेश वाढला असेल तर फक्त एक दिवा तुमच्या घरात या ठिकाणी लावा.
मित्रांनो आपल्या घरी माता लक्ष्मी सुखाने नांदावी, घरातील समृद्धी कायम रहावी, शांतता, प्रेम, सौख्य, ऐश्वर्य नेहमी असावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो त्यासाठी माता लक्ष्मी ची पूजा, प्रार्थना केली जाते.
आजकाल प्रत्येकजण स्वतःच मत सिद्ध करण्यासाठी धडपड करतोय त्यामुळे घराघरात क्लेश, द्वेष वाढला आहे. हिंदू पुराणानुसार काही उपाय जर आपण केले तर घरातील वातावरण प्रसन्न राहते व परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते.
मित्रांनो आपण जसा आपल्या देवघरात दिवा प्रज्वलित करतो तसेच एक दिवा आपल्याला लावायचा आहे. ज्याठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे.
हा दिवा कोणत्याही तेलाने लावला तरी चालतो. शक्यतो मोहरीच्या तेलाचा वापर केला तर उत्तम होईल.
दिव्यामध्ये जी वात ठेवाल ती दिव्याला लागून खालच्या बाजूने ठेवायची आहे, असा उपाय केल्याने तुमच्या घरातील भांडण दूर होईल, कटकटी बंद होतील.
मित्रांनो जर तुम्ही ही वात वरच्या दिशेने लावली तर भांडणे अधिकच तीव्र होतील, जर मध्ये वरती वात करून लावाल तर वाद अजून चिघळतील व विकोपाला जातील.
घरातील देवपूजा मुख्य व्यक्तीने केल्यास अधिक लाभ होतो, त्यांनी पूजा करून बाकीच्या सदस्यांनी देवदर्शन घेतल्याने घरातील प्रेम वाढते, नाती टिकून राहण्यास मदत होते.
तसेच घरातील लोक जर देवाच्या पाया पडत नसतील तर त्यांना समजून सांगा, संस्कार करा ज्यामुळे त्यांची प्रगती कायम राहील. असे केल्याने देवाचे आशीर्वाद कायम राहतील.
मित्रांनो हिंदू शास्त्र मानवी जीवन सुखकर बनवते, आपल्याला दुःखी, वेदनादायक जीवनापासून सुखाच्या मार्गावर घेऊन जाते. त्यामुळे ईश्वराचे सतत चिंतन, मनन करून जे उपाय असतात ते संपूर्ण श्रद्धा मनात ठेवून करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.