नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके आबा, हजरजबाबी, कुशल नेतृत्व आणि उत्कृष्ट वक्ते, स्वच्छ आणि निष्कलंक चारित्र्य, तळागाळातुन वर आलेले आर आर पाटील एक स्वच्छ राजकारणी म्हणून महाराष्ट्राला लाभले होते.
रावसाहेब रामराव पाटील हे त्यांचे मुळ नाव असले तरी देखील त्यांना सर्वजण आर.आर. पाटील आणि आर आर आबा या नावाने ओळखतात.
मित्रांनो आर आर पाटील म्हणजेच रावसाहेब रामराव पाटील हे महान नेते होते. ते 1991 ते 2015 या काळात तब्बल सहा वेळा तासगाव विधानसभातून आमदार म्हणून निवडून आले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे असे सांगितले जाते.
तसेच 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या विजयानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे गृहमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. याशिवाय त्यांनी माजी उपमुख्यमंत्री म्हणूनही महाराष्ट्र राज्याची सेवा केली आहे.
आर आर पाटील म्हणजेच महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख झाली. लोक त्यांना आबा म्हणायचे. त्यांची राजकीय प्रतिमा शेवटपर्यंत स्वच्छ राहिली होती हीच त्यांची खासियत होती. आबांचा जन्म 1957 साली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असणारे अंजनी या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील सामान्य शेतकरी होते. तसेच त्यांची परिस्थिती बिकट असली तरी आबा हे शिक्षणामध्ये फारच हुशार होते.
इयत्ता चौथीमध्ये आणि आठवी मध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला होता. याशिवाय बोर्डाच्या परीक्षेत त्यांचा पहिला नंबर आला होता. आबांना समजले होते की जर आपली आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही. ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं.
पुढे आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आर्टस या शाखेतून पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याशिवाय आपण शिक्षण घेतच ते काही काम करून घराला थोडा हातभार लावावा म्हणून ते जवळच्या एका कारखान्यात वॉचमनची नोकरी मिळवण्यासाठी तेथे गेले त्यावेळी त्यांना कमी उंची असल्याने तिथे काम दिले नाही.
यामुळे त्यांनी दुसरीकडे नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला मग त्यानंतर त्यांना कमवा आणि शिका0 या सरकारी योजनेविषयी कळलं. या योजनेची मदत घेऊन शिक्षण पूर्ण केले. शांतिनिकेतन महाविद्यालयात एल एल बी चे शिक्षण ही पूर्ण केले त्यांचा तेथेच राजकारणाशी संबंध आला असे सांगितले जाते.
मित्रांनो एका गरीब शेतकरी कुटुंबातील एका तरुणाचे नेतृत्व गुण ओळखूण तसेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मनाला भिडणारे भाषण आणि स्वच्छ प्रतिमा यांच्या जोरावर आबांची राजकारणात वाटचाल सुरू झाली. त्यांचे यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील हे देखील राजकीय प्रेरणास्थान होते, असे आबा सांगत.
पाटील हे सावळज मतदारसंघातून 1980 ते 1990 पर्यंत सांगली जिल्हा परिषद सदस्य होते. तासगाव तालुक्यात त्यांचा वाढता प्रभाव हळूहळू सर्वांच्या नजरेत येऊ लागला. त्यांची लोकप्रियता आणि हुशारी पाहून काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकीच्या निवडणुकीत भरघोस मत मिळवत त्यांनी आमदारकी पटकावली.
तासगाव तालुक्यातील एका गरीब घरातील हुशार मुलगा त्याच्याच तालुक्यात आमदार झाला होता. ही गोष्ट तासगावसाठी खूपच अभिमानास्पद होती. त्यानंतर ते तासगाव येथूनच सलग 1995, 1999, 2004, 2009, 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आले.
मग त्यानंतर ते विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य श्रोते झाले. आमदारकी बरोबर त्यांनी मंत्रीपदाचीही राजकीय कारकीर्द गाजवली. पुढे 25 डिसेंबर 2003 रोजी ते महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले. यासह आर आर पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात त्यानी गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आपली नवीन ओळख निर्माण केली.
पुढे राज्याचे गृहमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद त्यांनी जबाबदारीने सांभाळले. पुढे मुंबईत दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द कोसळली, असे सांगितले जाते. तेव्हाच त्यांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. पण आबांची स्वच्छ प्रतिमा कायम राहिली.
गृहमंत्री असताना डा न्स बा र बंद करण्याचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले. डा न्स बा र बंद करण्याच्या निर्णयाला खूप विरोध झाला तरीही आबा आपल्या निर्णयावर अत्यंत ठाम राहिले होते. डा न्सबार बंदी आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त भागातील पालकत्व स्वीकारणे यांसारख्या अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकालात घेतले.
जिल्हा परिषद सदस्यपासून ते पुढे तब्बल सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृह मंत्री, उपमुख्यमंत्री ते पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता. गरीब शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे राजकारणात नेहमी साधे राहणीमान होते. तसेच त्यांनी कधीही पदाचा गर्व केला नाही.
गडचिरोली जिल्ह्यातील पालक मंत्री पदाची जबाबदारी त्यांनी स्वतःहूनच मागून घेतली होती असे सांगितले जाते. कारण त्यांना या जिल्ह्याचा कायापालट करायचा होता. पुढे 1 फेब्रुवारी 2015 रोजी एका कर्करोगाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आबांचे लीलावती रुग्णालयात नि धन झाले.
त्यांचे अं त्य सं स्कार महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील अंजनी यां त्यांच्या ज न्म भूमीत केले गेले. त्यावेळी तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे, शरद पवार आणि विविध मोठं मोठ्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा.
अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.