नमस्कार मित्रानो
मित्रानो सिंह हि राशिचक्रातली पाचवी रास असून या राशीचे बोध चिन्ह सिंह म्हणजे जंगलाचा राजा आहे. सर्व जंगलावर जशी याची सत्ता असते , आपला रुबाब , आत्मविश्वास पूर्ण वावर यामुळे जंगलातील सर्व प्राण्यांवर त्याची अघोषित आणि अमर्याद सत्ता असते. किंबहुना ती सत्ता पूर्ण जंगलाने मान्य सुद्धा केलेली असते.
अगदी असाच रुबाबदार व्यक्तिमत्व असत ते म्हणेज सिंह राशीच्या मंडळींच. आपल्या वागण्याने , बोलण्याने हि मंडळी समोरच्या व्यक्तीची मने जिंकून घेतातच पण त्यांच्यावर आपली सत्ता सुद्धा गाजवतांना दिसतात. हि राशी अग्नितत्वाची आणि क्षत्रिय वर्णाची राशी असल्यामुळे स्वभावात प्रचंड तेजस्विता , लढवय्यापणा असतो. सूर्य हा या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ पदावर काम करायला यांना फार फार आवडत असत.
सामाजिक आणि राजकीय जीवनाची आवड यांना अगदी लहानपणापासूनच असते. लोकांना मार्गदर्शन करण , त्यांना योग्य दिशा दाखवणं , त्यांना मदत करणे , त्यांचे संरक्षण करणे , समाजाचं प्रतिनिधित्व करणे , एखादी जबाबदारी आपल्या अंगावर घेणे या प्रकारची कामे यांना विशेष आवडीची असतात.
मित्रानो सप्टेंबर महिना सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याबद्दलही उत्सुक असाल आणि तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. तुम्हाला तुमचा व्यवसाय, शिक्षण, नोकरी, कुटुंब, प्रेम, आरोग्य इत्यादींची चिंता असेल. हा महिना तुमच्यासाठी कोणते शुभ आणि अशुभ संकेत घेऊन आला आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या काळात वाईट किंवा चुकीच्या संगतीत फसणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा तुमच्याबद्दल कुटुंबातील सदस्यांमध्ये चुकीची धारणा निर्माण होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तुमच्याबद्दल शत्रुत्वाची भावना देखील डोके वर काढू शकते. म्हणून, स्वतः एकदम स्वच्छ आणि निर्मळ मानाने वागा आणि कुटुंबातील प्रत्येकाशी मोकळेपणाने बोला.
या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासह दुसऱ्या शहरात प्रवास करण्याचे योग जुळून येत आहेत. महिन्याच्या शेवटी घरातील एखाद्या सदस्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात चुकीची गुंतवणूक तुम्हाला कोंडीत टाकू शकते ज्यामुळे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अशा स्थितीत कोणाशी शत्रुत्व ठेवू नका आणि हिशोब बरोबर ठेवा. जर तुम्ही फायद्यासाठी कुठे पैसे अडकवून ठेवले असतील तर तिथून शुभ परिणाम येतील ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल. म्हणून त्याकडे आपले लक्ष ठेवा.सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्यात पगारामध्ये अडचणी येऊ शकतात, यामुळे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. खाजगी कर्मचारी त्यांच्या कामाबद्दल जागरूक असतील आणि त्यांचे लक्ष त्यांचे दिनक्रम सुरळीत करण्यासाठी असेल.
जर तुम्ही शाळेत अभ्यासाबरोबरच कोणत्या अन्य परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला वडिलांचे मार्गदर्शनही मिळेल. अशा परिस्थितीत त्यांचा योग्य आदर करा आणि त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी या महिन्यात संगीत किंवा कला क्षेत्रात रस घेतील.
तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीबद्दल जुने वाद असतील तर या महिन्यात ते वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या दोघांमध्ये मत्सर वाढेल. जोडीदाराची एखादी गोष्ट पटली नाही तर त्यावर वाद घालू नका , वाद घातले तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. संयम ठेवून काम केले तर परिस्थिती चांगली होऊ शकते.
अविवाहित तरुण तरुणींना एखाद्या बद्दल आकर्षण होऊन प्रेम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे नात्यात पुढे जाण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या सुधारणेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.ज्यांना आधीच आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांना या महिन्यात आराम मिळेल.
मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त लोकांनाही या महिन्यात आराम मिळेल. महिन्याच्या मध्यात शरीराच्या कोणत्याही भागाला दुखापत होऊ शकते, ज्याचे दुखणे काही दिवस टिकेल.तुमचे मन नियंत्रणात ठेवा आणि तुमच्या मनात कोणतीही कटु भावना येऊ देऊ नका. सोबतच इतरांशी बोलताना शब्द योग्यरित्या निवडा.
जर तुम्ही घरून ऑनलाईन काम करत असाल, तर या महिन्यात थोडे सावधगिरीने काम करा. कारण तुमची कोणाकडून ऑनलाइन फसवणूक केली जाऊ शकते, ती फसवणूक तुम्हाला नंतर कळेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.