नमस्कार मित्रानो
मित्रानो आपल्या हिंदू धर्मात कुंकू भांगात भरण्याचे फार महत्व आहे. लग्न झाल्यावर सर्व सवाशीण स्त्रिया भांगात कुंकू भरून आपला शृंगार पूर्ण करतात. भांगात कुंकू भरणे हे सौभाग्यवती असल्याचे चिन्ह आहे. हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
विवाहाच्या वेळी देखील वर वधूच्या भांगेत कुंकू भरतो असा एक विधी दिलेला आहे. त्यानंतरच विवाह विधी संपन्न झाला असे समजले जाते. म्हणून विवाहानंतर प्रत्येक स्त्रीने भांगेत कुंकू जरूर भरावा.
परंतु आजकाल आधुनिकता , फॅशनच्या नावाखाली जुन्या परंपरा लोप पावत चालल्या आहेत. आजकालच्या मुलींना कपाळावर टिकली आवडत नाही तर त्या कुंकू काय लावणार ? भांगात कुंकू भरणे यात फक्त जुन्या रीती भाती किंवा धार्मिक आस्था नसून त्यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रियांनी भांगात कुंकू भरण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. आपण जर या नियमांचे पालन केले नाहीत तर पतीला धनसंबंधित व आरोग्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया त्या नियमांबद्दल.
मित्रानो कुंकू नेहमी स्वतःच्याच पैशाने विकत घेऊन तेच कुंकू आपल्या भांगात भरावे. इतरांनी विकत घेतलेले कुंकू कधीही आपल्या कपाळी लावू नये. कितीही अडचण असली तरी इतर स्त्रियांचे कुंकू आपल्या भांगेत भरू नये. असं करणाऱ्या स्त्रियांचे पती नेहमी आर्थिक अडचणीने घेरलेले असतात.
दुसऱ्या स्त्रीचे कुंकू आपल्या भांगात भरणे हे खूपच अशुभ मानले जाते. तसेच कोणी जर भेट म्हणून कुंकूची डबी दिली असेल तर ते कुंकू देखील कधी भांगात भरू नये. असे करणे देखील खूप अशुभ मानले जाते.
स्नान केल्याशिवाय कधीही भांगात कुंकू भरू नये. सर्वात आधी स्नान करून भगवंताचे पूजन करावे व त्यानंतरच भांगात कुंकू भरावा. भांगात कुंकू भरताना नेहमी आपल्या पतीचे दीर्घायुष्य व त्याचे सुखी संपन्न जीवन मागावे. यामुळे पतीचे जीवन बहरून निघेल.
तसेच कुंकू लावताना जगतजननी देवी पार्वतीचे ध्यान जरूर करावे. कारण देवी पार्वती सौभाग्य प्रदान करते. जर घरात सुतक असेल तर त्या दरम्यान स्त्रियांनी कुंकू लावू नये. तसेच मासिक पाळी दरम्यान देखील कुंकू लावू नये. कारण यामुळे कुंकवाचा अनादर होतो.
कुंकू खाली सांडणे खूप अशुभ मानले जाते. म्हणून कुंकू कधीही लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशाच जागी ठेवावे. कुंकू खाली पडणे म्हणजे अपशकुन घडणे होय. तसेच स्त्रियांनी भांगात कुंकू लावताना त्यांना कोणी पाहणार नाही अशा प्रकारे लावावे.
कोणासमोर जर आपण भांगेत कुंकू लावला तर पती पत्नीच्या नात्याला नजर लागते आणि त्यामुळे पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून जर कोणी समोर असेल तर डोक्यावर पदर घेऊन मग कुंकू लावावे. भांगात कुंकू भरताना शक्यतो कोरड्या कुंकवाचा वापर करावा.
मित्रानो आपल्या कुंकवाच्या डबीत एक रुपयांचे एक नाणे जरूर ठेवावे. यामुळे देवी पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या भांगात कुंकू आपण स्वतः भरावे किंवा पतीला भरायला सांगावे. कधीही तिसऱ्या व्यक्तीकडून भांगात कुंकू भरून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.