नमस्कार मित्रानो,
मित्रानो भाग्याचे कारक सुख समृद्धी आणि वैभवाचे दाता शुक्र देव राशी परिवर्तन करणार आहेत. सुंदरतेचे प्रतीक असणारे शुक्र देव वृषभ आणि तूळ राशीचे स्वामी आहेत. धन संपत्तीची देवी माता लक्ष्मीचे कारक आहेत.
ज्योतिषशास्त्रात शुक्राला अतिशय शुभ ग्रह मानण्यात आले आहे. शुक्राच्या शुभप्रभावाने मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येते. शुक्राच्या कृपेने कुंडलीमध्ये विवाह आणि संतान योग बनत असतो.
शुक्र हे शनीचे परम मित्र मानले जातात. ज्यांच्यावर शुक्राची कृपा बरसते त्यांना आपोआप शनी देवाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. शुक्र जेव्हा शुभ फल देतात तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही.
ज्या राशींवर शुक्राची कृपा बरसते त्या राशींच्या जातकांच्या जीवनात सुख समृद्धीची बहार यायला वेळ लागत नाही. फाल्गुन शुक्ल पक्ष दिनांक 16 मार्च रोज मंगळवारच्या उत्तर रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी शुक्र देव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत.
10 एप्रिल पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. ज्योतिषशास्त्रनुसार शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन कुंभ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी मानण्यात आले आहे.
शुक्र आपल्या राशीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करत असून शुक्राचा शुभ प्रभाव आपल्या धन आणि वाणीवर पडणार आहे. या काळात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
आपण करत असणाऱ्या कामांना गती प्राप्त होणार असून कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. याकाळात वडिलोपार्जित संपत्तीची प्राप्ती होऊ शकते. अचानक धन लाभाचे योग बनत आहेत. वाणी मध्ये मधुरतानिर्माण होणार असून लोक आपल्या शब्दाने प्रभावित होतील.
कार्यक्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार असून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. या काळात उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण करार जमून येण्याचे संकेत आहेत. परिवारात असणारा ताणतणाव आणि कलह मिटणार असून सुख शांतीची प्राप्ती होणार आहे.
परिवारातील सदस्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. नाते संबंधांमध्ये अनेक दिवसांपासून चालू असलेली कटुता दूर होऊन आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. तरुण तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जमून येतील.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. या काळात आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त व्हायला सुरवात होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठी भेटी मुळे जुन्या आठवणीना उजाळा प्राप्त होणार आहे.
करियर मध्ये आपण घेतलेलं निर्णय सफल ठरणार असून मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.