नमस्कार मित्रांनो
मित्रानो जर का तुम्ही कुंभ राशीच्या व्यक्तीच्या प्रेमात असाल तर त्याचा स्वभाव कसा आहे? त्या व्यक्तीसोबत कस वागायचं आहे ? कोणत्या गोष्टी त्यांच्यासोबत टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. असं बरच काही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मित्रांनो कुंभ रास हि राशीचक्रातली 11 वी रास आहे. कुंभ रास हि शनीची रास असून स्थिर स्वरूपाची मानली जाते. सर्व 12 राशींमध्ये सर्वात बुद्धिमान अशी हि रास आहे. थोडक्यात काय तर एकदम शिस्तप्रिय रास आहे पण मित्रांनो तितकीच हि रास हट्टी देखील आहे.
या राशीच्या लोकांच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात एकप्रकारची शिस्त असते. यांची आर्थिक परिस्थिती जरी चांगली असली तरी साधे राहणे यांना पसंद असते. हे लोक जास्त बोलणे पसंद करत नाहीत. जे बोलतील ते मुद्देसूद बोलतील फालतूची बडबड करत नाहीत.
या राशीचे लोक थोडे हट्टी देखील असतात. आपल्या निर्णयावर ठाम राहणे यांना पसंद असते. जे काही काम करतात ते अगदी शिस्तीत करणे पसंद करतात. नियम तोडून कोणतेही काम करणे यांना पसंद नसते.
मित्रांनो या राशीचे लोक सर्वगुण संपन्न असतात तरीही व्यवसाय किंवा बिजनेस करण्याच्या बाबतीत या मागे असतात. याच कारण म्हणजे नियमबाह्य वर्तन यांना आवडत नाही. मित्रांनो धंदा करायचा म्हणजे बरेच नियम मोडत करावा लागतो. पण नियम मोडणे यांच्या तत्वात बसत नाही.
बऱ्याचदा तुम्हाला या राशीचे लोक भावनाशून्य वाटतील. पण असं काही नसत. यांना खुलेआम भावना व्यक्त करण जमत नाही. या राशीच्या व्यक्तींवर तुम्ही सहज विश्वास ठेवू शकता. कोणत्याही बाबतीत या राशीचे लोक तुमचा विश्वास घात करणार नाही.
प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी जसा चांगला वागतो तसाच समोरचा व्यक्ती चांगला वागला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. तुम्ही जर कुंभ राशीच्या व्यक्तीच्या प्रेमात असाल तर त्यांचा जो रोजचा दिनक्रम आहे त्याला डिवचायचा प्रयत्न तुम्ही करू नका.
प्रेमा खातीर तुम्ही जे बोलताय ते या राशीचे लोक करतील सुद्धा पण त्यांची चिडचिड वाढू शकते. वर सांगितल्या प्रमाणे हट्टीपणा समोर येऊ शकतो. यासाठी त्यांच्या सोयीनुसार तुम्हाला वागावं लागेल.
मित्रांनो यांच्याकडून तुम्हाला मिळणारे सल्ले अगदी अचूक असतील. तुमच्या आयुष्याला सुद्धा या व्यक्ती शिस्त लावून जातील. मित्रांनो जर या राशीच्या व्यक्तींसोबत तुमचं भांडण झालं तर तुमचं काय चुकलं हे त्या व्यक्तीला सांगून त्या बद्दल माफी मागितली तरी यांचा राग निघून जातो.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.