नमस्कार मित्रांनो
मित्रानो आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत ती १८, १९, २० जानेवारीच्या कुंभ राशीच्या महा राशिफला विषयी. हे तीन दिवस कुंभ राशीसाठी कसे असतील? कोणत्या गोष्टींपासून यांनी वाचले पाहिजे. कोणत्या गोष्टीपासून सावधगिरी बाळगली पाहिजे.
यांची लव लाइफ, करियर, उद्योग व व्यापार आणि आरोग्य विषयीची माहिती आम्ही देऊ. तर तुमची देखील रास कुंभ असेल किंवा घरातील कोणीही कुंभ राशीचे असल्यास हि माहिती पूर्ण वाचा.
हा धावपळीचा काळ असेल. तुम्ही तुमच्या लक्षा प्रति एकाग्रचित्त रहा. तुम्हाला मिळणारी सफलता थकवा दूर करेल. यादरम्यान अनुभवी लोकांच्या सोबत वेळ घालवल्याने काही नव्या गोष्टी शिकायला मिळतील.
धन संबंधित कोणतेही कार्य यादरम्यान स्थगित ठेवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. वादविवादात पडू नका. या काळात जुने भांडण उकरून निघू शकतात. विद्यार्थी वर्ग आपल्या अभ्यासाबाबत चिंताग्रस्त राहील.
मालमत्तेसंबंधी करार होतील. परंतु यात फायद्याची अपेक्षा करू नका. कार्यस्थळी कोणाच्या मदतीने कार्य सहज पार पडेल. पती-पत्नीच्या संबंधात या दरम्यान मधुरता राहील. प्रेमी युगुलांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे तसेच यादरम्यान सोबत काळ व्यतीत करा.
जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तुमची चिंता मिटेल. आपल्या स्वतःच्या स्वास्थ संबंधी काळजी घेणे देखील जरुरी आहे. तुम्हाला जमेल तसे कार्य तुम्ही करतच आहात परंतु स्वतःवर विश्वास ठेवा. टीकाकारांच्या टिकांना महत्त्व देऊ नका.
कठीण काळामध्ये तुमची साथ सोडणाऱ्या लोकांपासून दूर राहा. सरकारी नोकरदारांनी आपले काम व्यवस्थित करा नाही तर वरिष्ठांच्या नाराजीचा सामना करावा लागेल. या दरम्यान तुमचा जोडीदार तुमच्यावर बंधने टाकण्याचा प्रयत्न करू शकतो तुम्हाला पटत नसल्यास मनाई करा.
डोळ्या संबंधीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही या काळात आकर्षणाचे केंद्रबिंदू राहाल. अनेक लोकं जळतील. वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. गोड अन्नपदार्थ टाळा. नोकरी करियरच्या मागे इतके दिवस तुम्ही धावत होता त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करत होतात. परंतु आता असे करू नका. नाहीतर भविष्यात समस्या उद्भवतील.
शिक्षण, लेखन, पत्रकारिता आणि साहित्य संबंधित लोक आपल्या करिअरमध्ये उत्तम कामगिरी करतील. भूतकाळातील तणाव जाऊन शांत वेळ मिळेल. नवीन काम सुरु करण्यासाठी हे दिवस खूप चांगले आहेत.
आपल्या जोडीदाराप्रती इमानदारी राखा. धन स्थितीत अचानक बदलाव होऊ शकतो. घरात पाहुणे येत जात राहतील. जवळच्या मित्राने मदत केल्याने तुम्हाला आत्मिक आनंद होईल. विवाहइच्छूकांसाठी विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील.
आजचे चाणक्य ज्ञान : कधी कोणाच्या समोर आपली सफाई देत बसू नका. कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला सफाईची आवश्यकता नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही त्याला सफाई देऊन उपयोगही नाही.
मैदानात हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु पण आतून हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही म्हणून आत्मविश्वासच तुमची सर्वश्रेष्ठ शक्ती आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.