आपली कुलदेवता कशी ओळखावी?

0
239

नमस्कार मित्रानो

अनेक लोकांना आपली कुलदेवता माहित नसते. परिणामी कुलाचार पाळले जात नाहीत आणि मग घरात अनेक प्रकारचे त्रास सुरु होतात. घरावर अनेक प्रकारच्या अडचणी आणि संकटे येतात. आज आपण कुलदेवता कशी माहित करून घ्यावी यावर माहीती घेणार आहोत.

जे तुमच्या घरातील वयस्कर मंडळी , जुनी जाणती माणसं आहेत अशांची मदत घेऊन तुम्ही तुमची कुलदेवता माहितं करून घेऊ शकता. मात्र जर हे करणं शक्य नसेल तर प्रभावशाली असा मार्ग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या मार्गाने जाल तर तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती होईल तिच्या कुलाचारांचं पालन तुम्हाला करता येईल आणि घरातील अनेक त्रास संपुष्टात येतील. मित्रानो हा उपाय आपण कोणत्याही तीन शुक्रवारी करायचा आहे. सलग येणारे तीन शुक्रवार.

उपाय अगदी साधा सोपा आहे. आपल्याला ११ पाने घ्यायची आहेत जी पाने पूजेमध्ये वापरतात. ज्यांना नागिणीची , विड्याची किंवा खाऊची पाने देखील म्हटलं जात अशी ११ पाने घ्यायची आहेत.

या प्रत्येक पानावर आपण एक एक सुपारी मांडायची आहे. त्या सुपारी खाली तुमची इच्छा असेल तर एक एक रुपयाचं नाणं तुम्ही मांडू शकता. या ११ सुपार्या मांडताना पहिली सुपारी गणपती बापाच्या नावाने म्हणजेच श्री गणेशाच्या नावाने ठेवा.

दुसरी सुपारी आपल्या कुलदेवतेच्या नावाने ठेवा. तुम्हाला तुमची कुलदेवता माहित नाही. फक्त कुलदेवतेच्या नावाने ठेवायची आहे. जी काही तुमची कुलदेवता असेल तीच सुपारी ठेवताना नाव माहित असणे गरजेचे नाही.

तिसरी सुपारी कुलपुरुषाच्या नावे , चौथी सुपारी वास्तू पुरुषाच्या नावे , पाचवी सुपारी वास्तू देवतेच्या नावे आणि उरलेल्या ज्या सहा सुपारी आहेत त्या तुम्ही कुलदेवतेच्या नावे ठेवायच्या आहेत.

मित्रानो या प्रकारे मांडणी केल्या नंतर या प्रत्येक सुपारीला आपण हळदी कुंकू वाहायचं आहे. तसेच नैवैद्य म्हणून गोड आणि खार असे दोन्ही प्रकारचे नैवेद्य आपण ठेवायचे आहेत.

काही कुलदेवताना गोड नैवेद्य असतो तर काही कुलदेवतांना मांसाचा म्हणजेच ज्याला आपण खार म्हणतो तिखटाचा नैवेद्य ठेवला जातो. आता आपल्याला आपली कुलदेवता माहित नसल्याने आपण दोन्ही प्रकारचे नैवैद्य ठेवणार आहोत.

गोडाचा नैवेद्य म्हणून साखर , गोड शिरा , पुरणपोळी जे शक्य असेल ते ठेवा आणि तिखटाचा नैवेद्य म्हणून उपमा ठेवू शकता. सोबत एक अत्यंत महत्वाची गोष्ट प्रत्येक ठिकाणी तांबूल म्हणजेच पानाचा विडा सुद्धा आपण या ठिकाणी ठेवायचा आहे.

कारण आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर तांबुलाचा महत्व हे फार मोठं आहे. तर पहिल्या शुक्रवारी आपण अशी पूजा करायची आहे.

त्यानंतर प्रार्थना करायची आहे कि आमची जी कोणी कुलदेवता असेल ती आम्हाला माहिती होऊदेत. तर पहिल्या शुक्रवारी असे पूजन केल्या नंतर तुम्हाला दिसून येईल कि कुलाचारांचं पालन न केल्यामुळे जे काही त्रास तुम्हाला होत होते हे त्रास पहिल्याच आठवड्यात कमी होतील.

दुसऱ्या शुक्रवारी आपण एखाद्या सुवासिनी स्त्रीला आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे. तिची प्रेम भावनेने ओटी भरायची आहे. तिला दूध साखर द्यायचं आहे. खणा नारळाने तिची ओटी भरायची आहे. तिला आपली कुलदेवता समजून नमस्कार करायचा आहे.

हे सर्व करण्यापूर्वी अर्थातच ११ पाने , ११ सुपार्या ठेवून ज्या प्रकारे पहिल्या शुक्रवारी पूजन केले होते तसेच करायचे आहे. आता तिसरा जो शुक्रवार असेल अंतिम शुक्रवार या शुक्रवारी तुमच्या आडनावाची , तुमच्या भावकिची माणसं यांना आमंत्रित करायचं आहे.

जास्तीत जास्त भावकीला आमंत्रित करायचं आहे. जे पूजन सांगितले आहे ११ पानांचे ते सुद्धा या शुक्रवारी करायचं आहे. त्यानंतर ज्या भावकीला , लोकांना आपण आमंत्रित केले आहे त्यांना आपण जेवू खाऊ घालायचं आहे.

याला कुलाचार पाळणं असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे ३ शुक्रवार आपण या गोष्टी केल्या तर तुमची जी कुलदेवता आहे ती आपोआप प्रसन्न होते. ती कोण आहे ? कशी आहे ? हे माहित करून घेण्याची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही.

तुम्ही कुलदेवी , कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल. फक्त तीन शुक्रवार हे उपाय आपण करत चला. जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा तेव्हा आपण असे तीन शुक्रवार करू शकता. कुलदेवता तुमच्यावर कधीच रुष्ट होणार नाही.

त्यासोबतच मित्रानो आयुष्य जगत असताना आपली कर्म चांगली ठेवा. कारण कर्म चांगली असतील तर देवी देवता आपल्या घरावर नेहमीच खुश राहतात आणि आपल्याला कशाची म्हणून कमी पडू देत नाहीत. धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here