नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की नशीबवान मुलं ही कोणत्या दिवशी जन्म घेतात. चला तर जास्त वेळ न घालवता जाणून घेऊया.
रविवार
सुरुवात करूया रविवार पासून. मित्रांनो ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सुर्यदेवांची कृपा असते. रविवारी जन्माला येणाऱ्या व्यक्ती सुर्या समान तेजस्वी असतात.
रविवारी जन्माला येणाऱ्या व्यक्ती नशीबवान असतात, भाग्यशाली असतात आणि त्यांना दीर्घायुष्य लाभतं. या व्यक्तींचा स्वभाव हा मुळातच शांत असतो.
रविवारी जन्मलेल्या व्यक्ती कधीही कोणाच्या कामात नाक खुपसत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या कामात कोणी नाक खुपसलेलं त्यांना आवडत नाही. ज्या व्यक्ती यांच्या कामात अडथळा आणतात त्यांचा यांना प्रचंड राग येतो.
सोमवार
सोमवारी जन्म झालेल्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात. या व्यक्ती खूप गोड बोलतात, यांचा स्वभाव हसमुख असतो. यांचा चेहरा सतत हसरा असतो. या व्यक्ती सतत खुश राहतात. या व्यक्ती कधीही नाराज दिसणार नाहीत.
मात्र मित्रांनो या व्यक्तींचा स्वभाव चंचल असतो. चंचल असल्यामुळे या व्यक्ती कधीच ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत. यांचे निर्णय सतत बदलत राहतात.
सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती अत्यंत चांगली असते मात्र यांना योग्य तो निर्णय घेता येत नाही. या व्यक्ती आपल्या आई वर खूप प्रेम करतात.
मंगळवार
मित्रांनो ज्या व्यक्तींचा जन्म मंगळवारी होतो, त्या व्यक्तींवर श्री हनुमानाची कृपा आढळते. मित्रांनो हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात. स्वभावाने चांगले असले तरी यांच्यात हट्टी पणा खूप असतो.
या व्यक्तींना एखादी गोष्ट मनापासून आवडली तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात.
मित्रांनो मंगळवारी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात. हे लोक कोणत्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता दुसऱ्यांची मदत करतात.
या व्यक्तींना ऐशो आरामाचे जीवन जगणे पसंत असतं. असं असलं तरी कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार हे लोक कधीच करत नाहीत. हे लोक दुसऱ्यांप्रती सतत इमानदारी ने वागतात.
बुधवार
ज्या व्यक्तींचा जन्म बुधवारी झालेला आहे अशा व्यक्तीला धार्मिक कार्याची प्रचंड आवड असते. हे लोक धार्मिक कार्य खूप करतात, देव देव करतात. यांची बुद्धी तेजस्वी असते. अत्यंत बुद्धीमान असे हे लोक असतात.
गुरुवार
मित्रांनो आता पाहूया गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तींविषयी. गुरुवारी जन्माला आलेल्या वव्यक्तींचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या समोर कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यावर मात कशी करायची हे यांना चांगलं जमतं.
कितीही कठीण प्रसंग असला तरी त्या प्रसंगातुन हे लोक अलगद बाहेर पडतात. मित्रांनो दुसऱ्यांवर छाप कशी सोडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या व्यक्तींच्या कडून शिकावं. या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी स्वतःचा ठसा उमटवतात.
गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तींवर, त्यांच्या वागण्यावर आणि बोलण्यावर समोरच्या व्यक्ती आपोआप प्रभावित होतात. समोरच्या व्यक्तीवर आपला प्रचंड चांगला ठसा, प्रभाव पाडण्याची ताकत या गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तींमध्ये असते.
शुक्रवार
मित्रांनो ज्यांचा जन्म शुक्रवारच्या दिवशी होतो, त्या व्यक्ती अतिशय बुद्धीमान असतात. यांचा स्वभाव छान असतो, या व्यक्ती सहनशील असतात.
शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तीला आपण कितीही त्रास दिला, अपमान केला तरी या व्यक्ती तो सगळा त्रास सहन करतात. त्या तुमचं मन कधीही दुखावणार नाहीत.
शुक्रवारी जन्माला आलेल्या व्यक्ती अत्यंत भावुक असतात. भावनेला यांच्या जीवनात खूप मोठं स्थान असतं. तुम्ही यांची चेष्टा मस्करी करा, हे लोक कधीही दुखावले जाणार नाहीत.
या दिवशी जन्माला आलेल्या व्यक्ती अत्यंत जिंदादिल असतात. या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती विचाराने स्थिर असतात. यांच्या मनात काय सुरू आहे हे समोरच्या व्यक्तींना लवकर कळत नाही.
आपल्या मनातील गोष्ट या व्यक्ती कधीही दुसऱ्याला सांगत नाहीत.
शनिवार
मित्रांनो ज्या व्यक्ती शनिवारी जन्माला येतात, त्यांच्या वर शनी महाराजांची कृपा असते. यांच्या वर शनिदेवाची कृपा असते. शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव यांच्यावर असतो.
या व्यक्ती स्वतः मध्ये मस्त राहतात. अगदी मन मौजी पणे या व्यक्ती आपलं जीवन जगतात. एखाद्याला एखादं वचन किंवा शब्द दिला तर ते वचन किंवा शब्द हे लोक कधीही तोडत नाहीत. त्यामुळे या व्यक्ती दुसऱ्याचं मन सहज जिंकून घेतात.
या व्यक्ती हसमुख असतात. एक प्रकारचे चैतन्य यांच्यामुळे वातावरणात निर्माण होतं. या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात तिथल्याच होऊन जातात. या व्यक्ती ज्या वातावरणात जातात तिथे सहज मिसळून जातात. त्यांच्या या स्वभावामुळे लोक यांच्या वर प्रेम करतात.
मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राचा जन्मवार माहित असेल तर त्यांच्यासोबत ही माहिती शेयर करा. त्यांना कमेंट मध्ये टॅग करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.