नमस्कार मित्रानो
मित्रानो आज असा एक घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या उपायात आपल्याच परिसरातील एका वनस्पतीच पान वापरायचं आहे. या पानाचा सात दिवस जर तुम्ही सतत वापर केला तर गुडघेदुखी ,सांधेदुखी , मणका दुखी , पाठ दुखी यांसारख्या समस्यांपासून कायमचे दूर राहणार आहात.
मित्रानो आज काल १०० पैकी ७० टक्के लोक सांधेदुखी , कंबर दुखी , गुडघेदुखी सारख्या आजाराने त्रस्त आहे. केवळ वृद्धच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा सांध्यांच्या दुखण्याचे प्रमाण वाढलेले आढळून येत आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे या सारख्या समस्या उदभवत असतात.
सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी बाजारात बरीच औषध , गोळ्या आहेत. पण कित्येक लोकांना गोळी घेतली कि बरे वाटते पण नंतर येरे माझ्या मागल्या सुरूच राहते. मित्रानो गोळ्यांमुळे वेदना जास्त काळ थांबत नाहीत. त्या पुन्हा पुन्हा असर कमी झाल्यावर उदभवतातच.
याचा समूळ नायनाट करायचा असेल तर आयुर्वेद सोडून दुसरा कोणता पर्याय आपल्याकडे नाहीये. मंडळी या आयुर्वेदाने या निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेले आहे. फक्त त्याची माहिती आपल्याला नसते. आज जी वनस्पती आम्ही सांगणार आहोत ती वनस्पती आपल्या परिसरात अनेक ठिकाणी आढळते.
मित्रानो आम्ही ज्या पानाबद्दल बोल्त आहोत ज्या वनस्पती बद्दल बोल्त आहोत ती म्हणजे रुई. होय मित्रानो रुईचे झाड. मित्रानो हि वनस्पती काही दुर्मिळ नाहीये. हि वनस्पती शेतामध्ये , रस्त्याच्या कडेला , डोंगरावर अगदी सहज उपलब्ध होऊन जाते.
मित्रानो सांधेदुखी आपल्याला मुळापासून गायब करायची असेल तर या वनस्पतीचा एक एक भाग आपल्याला खूपच महत्वाचा आहे. याचे फुल , पान , फांदी या सर्वांचा उपयोग आपण करू शकतो. आजच्या उपायासाठी मित्रानो आपण रुईचे पान वापरणार आहोत.
तर मित्रानो उपायासाठी रुईची दोन पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर ती कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची आहेत. त्यांनतर मित्रानो आपल्याला मोहरीचे तेल लागणार आहे. मोहरीचे एक चमचा तेल पानाच्या वरच्या बाजूला लावून घ्यायचे आहे. खालच्या बाजूला लावायचे नाहीये.
दोन्ही पानांवर मोहरीचे तेल लावल्यानंतर तव्यावर हि दोन्ही पाने गरम करायची आहेत. पाने अगदी काळी पडतील अशा पद्धतीने गरम करायची नाहीयेत. साधारण गरम होतील या प्रकारे गरम करून घ्यायची आहेत.
गरम करून झाल्यावर लगेचच ती पाने गुडघ्यावर लावायची आहेत. फक्त गुडघाच नाही तर शरीरावरील जो भाग दुखत आहे हात , पाय , कंबर , मान , पाठ कुठेही या पानांचा वापर करू शकता. अर्थात पाठ दुखत असेल तर पाने थोडी जास्त घ्यावी लागतील.
तर मित्रानो गुडघ्याला किंवा इतर ठिकाणी लावताना तेल लावलेला भाग शरीराला लागला पाहिजे अशा पद्धतीने ती पाने घ्यायची आहेत आणि त्यानंतर रुमालाचा सहाय्याने ती जागा बांधून घ्यायची आहे. जेणेकरून ती पाने आजू बाजूला सरकणार नाहीत.
मित्रानो हा उपाय तुम्हला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. जेणेकरून हि पाने रात्रभर गुडघ्यावर किंवा सांध्यांवर राहतील. सकाळी उठल्यानंतर हि पाने आपल्याला काढून टाकायची आहेत. आणि पाय स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहेत.
मित्रानो हा घरगुती उपाय तुम्ही दिवसातून दोन वेळा देखील करू शकता. तुम्हाला हा उपाय फक्त ७ दिवस करायचा आहे. रुईची पाने सांधेदुखीवर अत्यंत परिणामकारक ठरतात. शरीरातील कोणताही सांधा तुमचा दुखत असेल त्यावर हा उपाय केल्याने सर्व दुखणे दूर पळून जाईल.
मित्रानो रुईच्या पानाच जे दूध आहे ते दूध सुद्धा सांधेदुखीवर रामबाण काम करत असत. अशा प्रकारे हा घरगुती उपाय करून सांधेदुखी पासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता.
मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा जेणेकरून गरजवंतांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि इंटरनेट व सर्वसामान्य माहितीवर आधारती असून आम्ही याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.