नमस्कार मित्रानो,
आजचा उपाय अत्यंत साधा आहे जो केल्याने आपली जी काही अडलेली कामे असतील, आपल्या ज्या काही समस्या असतील, काही इच्छा असतील त्या त्वरित पूर्ण व्हायला लागतील. आजचा उपाय हा खूपच विशिष्ट असा आहे जो किन्नर व्यक्तीशी संबंधित आहे. मित्रांनो सामान्यतः किन्नर हा शब्द ऐकताच लोक थोडे भयभीत होऊन जातात. किन्नर व्यक्तींचे एक वेगळे असे आयुष्य असते.
मित्रानो किन्नर लोक समाजातील टोमणे सहन करत करत जीवन जगत असतात. परंतु या किन्नर व्यक्तींच्या आवाजामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये एक विलक्षण प्रकारची शक्ती असते असे मानले जाते. कारण यांना जीवनातील प्रत्येक प्रकारचे विघ्न, दुःख माहित असते. मित्रांनो जेव्हा या व्यक्ती एखाद्याला आशीर्वाद देतात तेव्हा तो आशीर्वाद इतरांच्या तुलनेत शंभर पटीने अधिक प्रभावशाली असतो.
मित्रांनो सामान्यतः आपण कोणत्याही किन्नर व्यक्तीशी बोललो तरी ते आपल्याला आशीर्वाद देतातच पण अशा अनामिकपणे मिळालेल्या आशीर्वादाचा आपल्याला काही फायदा होत नाही. यासाठी एक उपाय आहे. मित्रांनो समजा आपण कर्जामध्ये बुडून गेलेलो आहोत किंवा आपण कर्ज घेऊ शकत नसाल, घेतले असेल तर ते फेडू शकत नसाल यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होत आहेत. थोडक्यात सांगायचं तर या उपायाने धनाशी संबंधित सर्व कामांवर लाभ होतो.
मित्रानो हा उपाय फारच खास आणि उच्च कोटींचा मानला जातो. या उपायाचा फायदा असाही आहे कि उपाय केल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना, आयडीया यायला सुरवात होते. केव्हा, कधी, का, कोणाशी कसे बोलायचे याचे देखील ज्ञान आपल्याला यायला लागते व आपली प्रगती होत जाते. लोक आपल्याकडे प्रभावित व्हायला लागतात. आपला मान, सन्मान, समाजात प्रतिष्ठा वाढते.
मित्रानो बुधवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बुधवारी सकाळी उठल्यानंतर स्नानविधी झाल्यानंतर कपडे परिधान करून आपण आपल्या घरातील एखादया खोलीमध्ये उभे राहायचे आहे. त्यानंतर आपल्या शर्ट किंवा पॅन्टच्या खिशातून एखादी नोट आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. नोट कोणतीही असली तरी चालेल, जसे कि 10, 20, 50, 500, 2000. आणि हि नोट आपल्या वरून 11 वेळा उतरवून घ्यायची आहे.
लक्षात घ्या नोट उतरवून घेताना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने उतरवायची आहे. डोक्यावरून उतरवून झाल्यानंतर शक्य असल्यास तिजोरीवरून, हिशोबाच्या वहीवरुन, देवघरावरून, दुकानातील पैशांच्या गल्ल्यावरून 11 वेळेला तशाच पद्धतीने उतरवून घ्यावी. उतरवून झाल्यानंतर ती नोट दोन्ही हातांच्या ओंजळीत धरून त्यानंतर डोळे मिटून एक मंत्र जपायचा आहे. मंत्र असा आहे. || ॐ क्लीं पातु श्रीं रक्षा कुरु कुरु श्रीं नमः ||
हा जप आपण योग्य वाटेल तसा करू शकता. म्हणजे कि उभे राहून करू शकता किंवा बसून देखील करू शकता. तुम्ही मंत्र जप 11 वेळा करू शकता किंवा 111 वेळा करू शकता. पण कमीत कमी 11 वेळेस तरी हा मंत्र जप करावा. त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला फळाचे दान करायचे आहे. आणि त्यानंतर ती नोट आपण आपल्या पाकिटात ठेवायची आहे.
पुढे जेव्हा तुम्ही बुधवारी घराबाहेर पडाल तेव्हा तुम्हाला जिथे कुठे किन्नर दिसेल त्या किन्नरला ती विधी केलेली नोट दान म्हणून द्यायची आहे. हे लक्षात ठेवा कि हा उपाय तुम्हाला फक्त बुधवारी करायचा आहे. इतर दिवशी सुद्धा तुम्ही किन्नरांना पैशाची मदत करू शकता पण बुधवारी हि विधी केलेली नोट दान म्हणून द्यायची आहे. मित्रांनो बुधवारी किन्नर लोक सहसा दिसत नाहीत. पण जर आपणस दिसले तर समजून जा नशिबाची गाडी लवकरच वेगाने धावणार आहे.
मित्रांनो हा उपाय केल्यानंतर आपल्याला मानसिक शांती मिळते व त्यानंतर आपला चांगला काळ यायला वेळ लागत नाही. मित्रांनो किन्नरांविषयी आपल्या मानत नेहमी चांगले भाग असायला हवेत. त्यांच्या बद्दल चेष्टा, वाईट बोलू नये. असे केले तर त्यांची घृणा आपले नुकसान करू शकते. वर सांगितलेला उपाय आपल्याला फक्त एकदाच करायचा आहे. उपाय छोटा असला तरी परिणामकारक आहे. एकवेळ अवश्य करून बघा नक्कीच याचा लाभ होईल.
मित्रांनो पैसा प्राप्तीसाठी आजवर तुम्ही अनेक उपाय केले असतील. बरेच जण पैसे प्राप्तीसाठी हातात वेगवेगळे रत्न, वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या घालतात. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही सुद्धा एकदा करून बघा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.