नमस्कार मित्रानो
किन्नर समाज हे दैवी रचनेचे एक अनोखे रूप आहे. कोणत्याही कार्यात यांचा आशीर्वाद लाभणे म्हणजे खूपच भाग्याची गोष्ट समजली जाते. भारतीय धर्मग्रंथांमध्ये किन्नर समाजाला महत्त्वाचे स्थान आहे. जर लग्न किंवा जन्माचा प्रसंग असेल किंवा घरात कोणत्याही शुभ कार्याचे आयोजन केले गेले असेल तर यांना निश्चितपणे आमंत्रित केले जाते, किंबहुना तज्ञांच्या मते यांची उपस्थिती अत्यंत शुभ मानली जाते.
ज्योतिष आचार्य यांच्या मते, किन्नरांनी दिलेले आशीर्वाद एखाद्या व्यक्तीचे आयुष्य पालटून टाकते.या उलट यांनी दिलेला तळतळाट देखील मनुष्याची जीवन उध्वस्त करू शकतो. से म्हटले जाते की किन्नरांचा आशीर्वाद असो किंवा किंवा कोणताही कठोर शब्द असो, तो फार लवकर पूर्ण होतो.
अशा परिस्थितीत प्रत्येकजण प्रयत्न करतो की किन्नर समाज त्यांच्यावर कधीही रागावू नये आणि त्यांच्याकडून फक्त आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाव्यात. ही एक श्रद्धा आहे की किन्नरांचे आशीर्वाद जीवनात सुख आणि समृद्धी आणतात आणि त्यांना दान केल्याने जीवनात यश मिळते. म्हणूनच लोक किन्नर समाजाला विविध प्रकारच्या वस्तू दान करतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात.
किन्नर समुदायाला दान केल्याने अनपेक्षित फायदे होतात, परंतु ते दान करण्यापूर्वी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा नफा होण्याऐवजी तोटाच होतो. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या वस्तू दान नाही केल्या पाहिजेत हे आता आपण जाणून घेऊया.
झाडू
असे मानले जाते की झाडू लक्ष्मीला प्रिय आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू देखील खरेदी केली जाते. अशा स्थितीत जर एखाद्या किन्नराला जर आपण झाडू दान म्हणून दिला तर आई लक्ष्मी क्रोधित होते. म्हणून किन्नरांना कधीच झाडू दान म्हणून देऊ नये. याने घरातील लक्ष्मी निघून जाते आणि कुलक्ष्मी घरात स्थान प्राप्त करते.
प्लास्टिकच्या वस्तू
असे म्हटले जाते की किन्नरांच्या आशीर्वादाने कुटुंबात समृद्धी येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. परंतु असे मानले जाते की जर प्लास्टिकपासून बनवलेली कोणतीही वस्तू किन्नरांना दान केली तर घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि कधीकधी काम पूर्ण होणार तेवढ्यात शेवटच्या क्षणी बिघडून जाते.घरातील सुख -शांती विस्कळीत होते आणि गरिबी येते. ज्योतिष शास्त्रानुसार आपण कधीही प्लास्टिकपासून बनवलेली कोणतीही वस्तू एका किन्नरांना दान करू नये.
जुने कपडे
मित्रानो बऱ्याचदा जेव्हा आपण दान करतो तेव्हा त्यात अन्नपदार्थ असतात आणि कपडेही असतात. ज्योतिषशास्त्र असे सांगते की किन्नरांना कपडे दान करताना विशेष काळजी घ्यावी की ते कपडे चुकूनही जुने नसावेत. ते कपडे नवीन असावेत. किन्नरांना जुने कपडे दान केल्याने आपण आपल्या जीवनात समस्यांना आमंत्रण देतो आणि आपण आपली प्रगती आपल्याच हाताने थांबवतो. जुने कपडे किन्नरांना दान केल्याने अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
तेल
किन्नरांना कधीही कोणत्याही स्निग्ध पदार्थाचे दान करू नये, विशेषतः तेल. अशी मान्यता आहे की किन्नरांना तेल दान केल्याने घरावर संकटाचे सावट येते आणि सर्वत्र समस्या निर्माण होतात किंवा कुटुंबातील सदस्यांवर काही मोठी आपत्ती येण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून किन्नरांना तेल दान करणे अशुभ मानले जाते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.