नमस्कार मित्रांनो,
बऱ्याचदा खूप कष्ट करूनही यश येत नाही, कामात सतत अडचणी येतात, अपयश येते, घरात तणाव, वाद वाढतात व आर्थिक कोंडी होते. सर्व काही असूनही कंगाल होतो, अशा वेळी काही दोष असतात ते आपल्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे तुम्ही घरातील हे दोष दूर करण्यासाठी काही उपाय करून पहा. हे उपाय आपल्या शास्त्राने सांगितले आहेत, जसे दोष शास्त्र सांगते तसेच त्यावरती उपाय देखील शास्त्र सांगते. यामुळे हे उपाय नक्कीच फलित होतात.
मित्रांनो हे उपाय देखील अगदी सोपे असतात, सहज करण्यासारखे असतात पण आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने करायला हवेत. आपले घरातील दोष दूर करण्यासाठी दा न करणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो, यामुळे पापातून मुक्ती होते. हा उपाय केल्यास घरातील दोष नक्कीच दूर होतात. अन्नदान जमेल तसं करा, कुणी गरीब दारावरती आला तर त्याला इच्छित दान करा, अन्नदान करा. एखादा किन्नर आला तर त्याचा आशीर्वाद घ्या व त्यालाही दान करा.
घरात पैसे येतात पण अनावश्यक खर्च होतो, नाहक खर्च होतो व त्यामुळे धनप्राप्ती होऊनही काही हाती लागत नाही. लक्ष्मी चे व्रत करा, वैभव लक्ष्मीचे व्रत मनापासून करावे, संकल्प करावा व पूर्ण झाल्यावर इच्छित दान करावे. तसेच रोज श्रीसुक्त पठण करावे, लक्ष्मी स्तोत्र 108 वेळा पठण करा तसेच माता लक्ष्मीची पूजा, तिला लाल रंगाचे फुल वहा. तसेच आपले काम प्रामाणिकपणे करावे, गरजूंना मदत करावी.
मित्रांनो यासोबतच घरात स्वच्छता राखावी, रोज पहाटे सडा रांगोळी करावी. यामुळे वातावरण प्रसन्न राहते व घरात व आसपास सकारात्मक ऊर्जा राहते. हा एक असा उपाय आहे जो केल्याने अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात, त्यामुळे घरात सुख, समृद्धी, शांती निर्माण होते व दोष निघून जातात. तसेच हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा ठेवून करावा.
रोज सायंकाळी आपल्या मुख्य दरवाजाजवळ राईच्या तेलाचा म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिवा जेव्हा विझेल तेव्हा त्यातील तेल हे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खोडावर टाकावे. पिंपळाच्या वृक्षात साक्षात भगवान विष्णू वास करतात. अनेक मोठं मोठे दोष निवारण्याची ताकद यामध्ये असते.
पिंपळाच्या वृक्षाची प्रार्थना करावी, हे उर्वरित तेल त्याच्या खोडावर टाकून तिथे एक दिवा प्रज्वलीत करा व मागे न पाहता सरळ घरी यावे. त्यामुळे घरी आनंदीआनंद येईल, धनप्राप्तीचे खूप योग येतील, पैसा इतका येईल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.