घरातून बाहेर पडताना तोंडात ठेवा फक्त ही एक वस्तू… नशीब फळफळेल…

0
783

नमस्कार मित्रांनो,

आपण कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना उजवा पाय टाकावा की डावा पाय टाकावा असा प्रश्न अनेकांना पडतो.

आज आम्ही अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणार आहोत की, कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना कोणता पाय आधी बाहेर टाकावा. ज्यामुळे आपले ते काम यशस्वी होईल आणि आपल्याला त्या कामामध्ये यश मिळेल.

मित्रांनो अनेक वेळेला आपल्या सर्व कामात अडचणी येत असतात, बाधा येतात आणि या साठी आपली घरातील अनेक प्रकारचे दोष किंवा आपल्या जीवनातील दोष कारणीभूत असतात.

कधी कधी वास्तू दोष असतो, पितृ दोष असू शकतो. किंवा आपल्या कुंडलीतील काही दोष असतात.

दोष कोणताही असो मित्रांनो आज आपण जो उपाय करणार आहोत, त्यानंतर आपण कोणतंही काम करायला जा त्या कामात यशाची खात्री नक्की बाळगा.

मित्रांनो घरातून बाहेर जाताना पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल, तेव्हा तेव्हा तुम्ही हे पहा की तुमच्या नाकाची कोणती नाकपुडी सुरू आहे.

आपल्या नाकाची जी नाकपुडी सुरू असेल तोच पाय आपण घराबाहेर आधी टाकायचा आहे. उजवा शुभ आणि डावा अशुभ अशी मान्यता आहे मात्र आपल्याला अयशस्वी होणाऱ्या कामात यश मिळवायचे आहे.

आपल्याला आपल्या कामातील बाधा दूर करायच्या आहेत तर सर्वोत्तम उपाय हाच आहे की, जी नाकपुडी सुरू असेल तोच पाय आपण सर्वात आधी घराच्या बाहेर टाकायचा आहे.

त्यापूर्वी आपण एक गुळाचा छोटा खडा आपल्या तोंडात ठेवावा आणि मग काम करण्यासाठी घराबाहेर पडा.

मित्रांनो गुळ हा सूर्य देवांना अत्यंत प्रिय आहे आणि कोणत्या ही कामात यश प्राप्त करण्यासाठी, आपल्या कुंडलीतील सूर्य मजबूत असल्याचे मानले जाते.

अगदी प्रचंड धन प्राप्तीसाठी गुरू ग्रह अगदी माजबुत असणं मानल जात अगदी त्याच प्रकारे, कोणत्याही कार्यात यश संपादित करण्यासाठी हा सूर्य अतिशय महत्वाचा मानला जातो.

आणि म्हणूनच गुळ जो सूर्य देवांशी संबंधित आहे त्या गुळाचा एक छोटा खडा तोंडात टाकून बाहेर पडा.

मित्रांनो त्यानंतर अगदी छोटासा मात्र अत्यंत प्रभावी असा उपाय आपण दररोज सकाळी आपण सुर्यदेवांना एक तांब्याभर जल अर्पण करावे.

जर दररोज शक्य नसेल तर फक्त रविवारी सूर्य देवांना तांब्याभर जल अर्पण करत चला.

मित्रांनो सुर्यदेवांना हे जल अर्पण करताना त्यात गुळाचा एक तुकडा टाकणं विसरू नका.

गुळाचा खडा टाका आणि त्यानंतर सुर्यादेवांच्या मंत्रांचा जप करा आणि त्यांना जल अर्पण करा.

जल अर्पण केल्या नंतर मनोभावे प्रार्थना करावी की आपल्या जीवनात ज्या काही बाधा येत आहेत त्या दूर व्हाव्यात.

मित्रांनो घरी दररोज गायत्री मंत्राची कॅ सेट तुम्ही लावू शकता. जर रोज लावणं शक्य नसेल तर किमान 11 वेळा गायत्री मंत्राचा जप करा.

हे उपाय एवढे सोपे आहेत पण ते तितकेच प्रभावी आहेत. यातला कोणताही उपाय केलात तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन तुमचं कार्य मार्गी लागेल.

अनेक जण बुधवारी एक उपाय करतात. तोच उपाय आपण करा. बुधवारी गणपती बाप्पांची पूजा करा. पूजा करताना गणपती बाप्पाना 21 दुर्वा अर्पण करा. तुमच्या सएव इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो आपण कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करा त्यात तुम्हाला यश निश्चित मिळेल. तुम्हाला कोणी गरीब व्यक्ती दिसला तर त्याला ऐपतीप्रमाणे मदत करा. देव कोणत्याही रुपात येऊ शकतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here