नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या अंगणातील तुळस ही देवतेसमान असते, तिचे फक्त हिंदू धर्म शास्त्रातच महत्व नाही, तर आयुर्वेदात सुध्दा अनंत महत्व सांगितले जाते.
मित्रांनो तुलसी माता साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. तुळशीच्या पानांपासून ते खोडापर्यंत सर्वच भाग आपल्यासाठी गुणकारी ठरले आहेत.
लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुळशी मातेची रोज सकाळी लवकर उठून पूजा केल्यास अनेक लाभ होतात. तुळशीचे रोप नसेल तर नक्की आणा आणि कुंडीत लावा व तिचे पूजन करून तुमच्या घरासाठी प्रार्थना करा.
मित्रांनो त्याचबरोबर सायंकाळी तुळशीत दिवा लावून रोज नमस्कार करत जा, असे नित्य केल्याने माता लक्ष्मी व त्यांना प्रिय असणारे भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात त्यामुळे कोणत्याही कामात विघ्न येत नाहीत व घरात वाईट, नकारात्मक ऊर्जा येत नाही.
जवळपास सर्व वृक्ष आपल्याला सूर्यप्रकाश असे पर्यंत ऑ क्सि जन देतात. परंतु तुळस ही अशा दुर्मिळ वृक्षांमध्ये गणली जाते की जे वृक्ष 24 तास मानवाला ऑ क्सि जन पुरवतात.
देवपूजेत आपल्याला अत्यंत सुख, शांती, समाधान मिळते. म्हणून पूर्ण श्रद्धेने देवपूजा करून नंतर तुलसी पूजन नियमितपणे करायला हवे.
मित्रांनो घरात आर्थिक अडचणी आल्या की भांडण, वाद होतात, घरात गरिबी असल्याने सर्वांची चिडचिड होते. यामुळे कुटुंब प्रेम कमी होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी पूजा, प्रार्थना करावी. त्यामुळे मान सि क शांती भेटते, तसेच अनेक समस्यांवर उपाय देखील सापडतात.
मित्रांनो तुळशीजवळ एक अशी वस्तू ठेवा की ज्यामुळे तुळशीसोबतच त्याही गोष्टींचा आशीर्वाद, पुण्य मिळेल व घरात बरकत येईल.
तुळशी सोबत नेहमी शाळीग्राम देवतेची पूजा करावी. भगवान विष्णुच्या पूजा विधी मध्ये नेहमी शाळीग्राम यांचा समावेश असतो. अशी मान्यता आहे की शाळीग्राम नसेल तर भगवान विष्णुची पूजा संपन्न होत नाही.
मित्रांनो शाळीग्राम भगवान विष्णुचाच एक अवतार आहे. शाळीग्राम मध्ये भगवान विष्णुचे दहा अवतार सम्मिलित आहेत.
अशी मान्यता आहे कि ज्या घरात शाळीग्राम असतात ते घर समस्त तीर्थां पेक्षा श्रेष्ठ असते. शाळीग्राम वर भगवान विष्णुच सुदर्शन चक्र बनवलेलं असत.
मित्रांनो तुळशीमाता व शाळीग्राम एकत्र पूजन केल्याने पुण्यच पुण्य भेटते. जसे की तुळशीला हळद कुंकू वाहतो, तसेच शाळीग्रामला चंदनाची पावडर वहा व पूजा करा.
शाळीग्रामची स्थापना शक्यतो शुभ दिनी करा, एकादशी दिवशी केली तरी चालते. तसेच एकादशी दिवशी तुळशीपत्र तोडू नये, त्यामुळे आदल्या दिवशीच हे पत्र तोडून ठेवा.
एकादशी दिवशी या शाळीग्राम ची स्थापना अर्थात साक्षात भगवान विष्णूंची स्थापना करावी. चंदनाचा लेप व तुळशी पत्र अर्पण करून तुमच्या घरातील सर्वांसाठी प्रार्थना करा. तुमच्या सर्व समस्या कमी होतील, करणाऱ्या कामात यश मिळेल व सुख, शांती, समृद्धी मिळेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.