आज शुक्रवारी पाकिटात ठेवा ही एक वस्तू… माता लक्ष्मी ची होईल कृपा… पडेल पैशाचा पाऊस…

0
413

नमस्कार मित्रांनो,

आजकाल फॅशन म्हणून मोबाईल व पैशांसोबत पर्समध्ये अनेक वस्तू ठेवल्या जातात ज्याचा थेट परिणाम पैशांवर होतो व सर्व पैसे संपून फक्त वस्तूच शिल्लक राहतात. पैसे टिकत नाहीत.

मित्रांनो ही खास 1 वस्तू  तुम्ही तुमच्या पाकिटात, पर्स मध्ये ठेवली तर तुम्हाला धन कधीही कमी पडणार नाही. तसेच कितीही खर्च झाले तरी तुमच्या पर्स मध्ये पैसे राहतीलच.

मित्रांनो या उपायामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने पैशांचा ओघ तुमच्याकडे येईलच, हा उपाय आपल्याकडे धन नेहमी राखून, टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. या उपायाने तुमचं पाकीट अथवा पर्स कधीही रिकामे होणार नाही.

आपल्या हिंदू धर्म शास्त्रात बऱ्याच अशा शास्त्रीय गोष्टी आहेत ज्यांचं आपण पालन केले, त्या पूर्ण श्रद्धेने मान्य केल्या तर त्याचा अगणित लाभ आपल्याला होतो. पण जर तुम्हाला मान्य नसेल तर उपाय करू नये कारण त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होत असतो.

मित्रांनो अशी मान्यता आहे की किन्नरांना दिलेले दान हे खूप भाग्यशाली ठरते, त्यांचा आशीर्वाद आपल्या अडचणी दूर करतो, त्यामुळे तुम्ही जेव्हा दान कराल तेंव्हा त्यांच्या कडून 1 रुपया आशीर्वाद म्हणून मागून घ्या.

जर त्यांनी स्वखुशीने दिला तर तो रुपया न खर्च करता जपून ठेवा, तुमच्या आयुष्यात भरपूर सुख येईल.

तांदूळ हा शुक्र ग्रहाशी निगडित आहे व शुक्र ग्रह राजयोग निर्माण करतो, त्यासाठी घरातील एक मूठभर तांदूळ घेऊन ते घरी माता लक्ष्मीच्या पुजेत शुक्रवारी अर्पण करा.

पूजा झाल्यावर त्यातील 11 पूर्ण तांदूळ घेऊन छोट्या पुडीत बांधून प्रार्थना करून पर्स अथवा पाकिटात ठेवा ज्यामुळे पाकिटात कधीही पैशांची चणचण भासणार नाही.

मित्रांनो पाकिटात कोर्टाचे कागद, इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तू विनाकारण ठेवू नये यामुळे पाकिटात नकारात्मक ऊर्जा वाढते व पैसे भरभर संपतात.

धनाची देवी माता लक्ष्मी तिचा वर शुक्रवार, प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा यथाविधी करावी, घरातील धन दौलत आठवड्यातून एकवेळ स्वच्छ करावे.

तसेच मित्रांनो तुमच्या पाकिटात अथवा पर्स मध्ये एक छोटे पिंपळाचे पान स्वच्छ धुवून त्यावरती केसराने श्री असे लिहून कोणाच्या दृष्टीस पडणार नाही असे ठेवा.

माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू हे नेहमी एकत्र असतात व पिंपळाच्या पानामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास असतो त्यामुळे पाकिटात हे एक पिंपळाचे पान शुक्रवारी ठेवा, हे पान वरचेवर बदलत रहा.

आपले पाकीट कधीही रिकामे घेऊन फिरू नका अथवा कुठेही ठेवू नका जेणेकरून तुमचं पाकीट खूप काळासाठी रिकामे राहील अथवा बचत होणार नाही, त्यासाठी थोडे कधीच न खर्च करण्यासाठी 5 तिथे 50 रुपये एक कप्प्यात ठेवत रहा.

पाकिटात तुमच्या गुरूंचा फोटो नेहमी ठेवा, तुमच्या अडचणी नक्कीच संपतील, तसेच माता लक्ष्मी चा फोटो, गोमती चक्र व चांदीची नाणी ठेवा. यामुळे नेहमी बरकत राहील.

मित्रांनो घरात समृद्धी, सुख, भरभराट येण्यासाठी पाकिटात माता लक्ष्मीचे यंत्र त्याची प्रतिमा किंवा फोटो पाकिटात ठेवा. तसेच माता लक्ष्मीच्या आवडत्या कवड्या तुम्ही मातेला अर्पण करून पाकिटात ठेवा.

पाकीट कपड्याचे असेल तरच हे उपाय करा, कारण काहीजण चामड्याचे पाकीट वापरतात त्यात या पवित्र वस्तू ठेवल्यास त्यांची अवहेलना होईल म्हणून ठेवू नये.

अशा प्रकारे जीवनात सुख समृद्धी धन संचय वाढवण्यासाठी हे उपाय कराल तर त्याचे लाभदायी परिणाम थोड्याच दिवसात तुम्हाला दिसून येईल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here