नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास असेल, चालणे फिरणे अवघड होऊन बसले असेल तर मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी गुडघेदुखी वर घरगुती उपाय घेणं आलो आहोत.
सांधेदुखी आणि त्यातल्या त्यात गुडघेसुद्धा दुखत असतील तर दैनंदिन कामे करणे कठीण होऊन जाते.
वाढत्या वया सोबतच वाढत जाणारी हि गुडघेदुखी आज काल कमी वयात सुद्धा दिसून येते. गुडघ्याला मार लागल्यामुळे, हाडांची झीज झाल्यामुळे, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अशा कोणत्याही कारणास्तव उद्भवलेली गुडघेदुखी आजच्या उपायाने बरी होऊ शकते.
गुडघेदुखी वर गुणकारी असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त ४ वस्तू आवश्यक आहेत. त्यातील सर्वात पहिला घटक म्हणजे मोहरीचे तेल.
मित्रांनो मोहरीचे तेल बाजारात सहज उपलब्ध होते. सांधेदुखी साठी मोहरीच्या तेलाची हलकी मालिश अत्यंत फायदेशीर ठरते.
मित्रांनो साधारण एक कप मोहरीचे तेल या उपायासाठी घ्यायचे आहे. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मेथीच्या बिया.
वाताच्या सर्व विकारांवर मेथीच्या बिया अत्यंत गुणकारी असतात. यामधील अँटिइम्प्लायमेंटरी गुणधर्म सांधेदुखी कमी करण्याचे कार्य करतात.
आपण साधारण एक चमचा मेथीच्या बिया या तेलामध्ये टाकायच्या आहेत. यानंतरचा तिसरा घटक म्हणजे लसूण.
सांध्याच्या वेदना कमी करण्यासाठी लसूण वेदनाशामक म्हणून कार्य करतो. आपण साधारण 5 ते 6 लसूण पाकळ्या सोलून त्या तेलात टाकायच्या आहेत.
यानंतर चौथा घटक म्हणजे दालचिनी. गरम मसाल्या मधील हा पदार्थ सांधेदुखी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
साधारण हाताच्या अंगठ्याच्या मापाचा तुकडा या उपायासाठी घ्यायचा आहे. दालचिनीचा छोटा तुकडा या मिश्रणात टाकायचा आहे.
आता हे सर्व घटक व्यवस्थित पणे कढवून घ्यायचे आहेत. चांगल्या प्रकारे उकळून घेतल्यानंतर एक दोन तास असेच थंड व्हायला सोडून द्यायचे आहे.
यानंतर हे तेल गाळून घ्यायचे आहे. मित्रांनो तेल न गाळता सुद्धा काचेच्या बाटली मध्ये साठवून ठेवू शकता.
मित्रांनो प्रत्येक वेळी हे तेल वापरताना थोडेसे कोमट करूनच गुडघ्यांवर हलक्या हाताने मालिश करायची आहे. मालिश केल्यानंतर कपड्याने गुडघा बांधून ठेवायचा आहे जेणेकरून हवा लागता कामा नये.
मित्रांनो हा उपाय शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. तुम्हाला पहिल्या दोन ते तीन दिवसातच फरक दिसून येईल.
कमीत कमी एक महिना तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी एक वेळा अवश्य हा उपाय करावा.
मित्रांनो वर दिलेला उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.