नमस्कार मित्रानो
मित्रानो शिक्षण पूर्ण झाल्यावर बहुतेक लोकांचे सर्वात मोठे ध्येय असते ते म्हणजे चांगली नोकरी मिळवणे. नोकरी मिळवण्यासाठी तरुण वर्ग खूप अभ्यास करतो, मेहनत करतो जेणेकरून चांगली नोकरी मिळेल. नोकरी करून अनेकांना जीवनात यशस्वी व्हायचे असते. ज्यांना घराची जबाबदारी अल्पवयातच घ्यावी लागते त्यांच्यासाठी नोकरी करणे खूप महत्वाचे असते.
परंतु आपल्या आयुष्यात अनेकदा असे होते कि आपल्याला कोणतीही चांगली नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळाली तरी नोकरीतून मिळालेल्या पगारात आपले घर चालत नाही. असे मानले जाते की ग्रह नक्षत्रांमुळे देखील आपल्याला चांगली नोकरी मिळण्यास विलंब होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रे देखील नोकरी न मिळण्या मागचे एक कारण आहे. म्हणूनच, जर तुम्हाला कठीण परिश्रम घेऊन देखील चांगली नोकरी मिळत नसेल, तर ज्योतिषशास्त्रात यावर काही उपाय सांगितले गेले आहेत, चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय.
ज्योतिष शास्त्रानुसार, सकाळी लवकर उठून पक्ष्यांना दाणे किंवा काही खाद्य रोज खाऊ घातले तर मनाप्रमाणे नोकरी मिळण्यास मदत होते. असे केल्याने नोकरी मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होतात. यासाठी , दररोज सकाळी उठल्यावर पक्ष्यांना सात प्रकारचे धान्य खायला द्यावे. असे मानले जाते की असे केल्याने नोकरीत येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीला नोकरी मिळवण्यात अडचणी येत आहेत अशा व्यक्तीने रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्ष परिधान केल्याने नोकरी मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. सोबतच नोकरीत बढती व्हावी यासाठी सूर्य देवाला दररोज पाणी अर्पण करावे.
नोकरी मिळत नसेल तर नित्य नियमाने शनि आणि काळभैरवाची पूजा करावी. शनी आणि कालभैरव यांची सेवा भक्ती केल्याने हे दोन्ही देव त्वरित नोकरी संबधी अडचणी दूर करतात. विशेष करून शनिदेवाना प्रसन्न करण्यासाठी कावळ्याला रोज सकाळी अन्न पदार्थ खायला द्यावे.
जन्म कुंडलीत 10 वे घर करिअर, यश आणि आर्थिक स्थितीचे असते. दहाव्या किंवा सहाव्या घरात जो ग्रह बसला असेल त्याची विधिवत शांती , पूजा करून घ्यावी. किमान 43 सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाणी आणि दूध अर्पण करा. तसेच 21 गोमती चक्र अर्पण करा.
पिंपळाच्या झाडाला दररोज जल अर्पण करा. यामुळे भगवान शिव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतील. मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करा आणि हाताच्या उजव्या बोटावर लाल टिळक घ्या आणि कारकिर्दीतील यशासाठी कपाळावर टिळक लावा.
गुरुवारी गायीला केळी खाऊ घाला. हा उपाय केल्याने तुमच्या नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळेल. पगार वाढवण्यासाठी सोमवारी आणि बुधवारी माशांना गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खायला द्याव्या. महिन्यातून एकदा अपंगांना कपडे आणि अन्न दान करा.
जर इच्छित नोकरी मिळण्यात अडचण येत असेल तर गणपती आणि देवी दुर्गा यांची पूजा करा. पक्ष्यांना सात धान्य खायला द्या. हा उपाय तुमच्या कारकीर्दीचे आणि नोकरीचे सर्व संकट दूर करेल. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सूर्याला पाणी अर्पण करा. सलग 11 दिवस 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील लेख हा सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.