घरात जपमाळ असेल तर ही चूक करू नका. घर बरबाद होईल

0
538

नमस्कार मित्रानो

मित्रानो अनेक देवी देवतांच्या मंत्रांचा जप करण्यासाठी आपल्या घरात आपण जपमाळ ठेवतो. हि जप माळ कधी तुळशीची असते , कधी रुद्राक्षाची असते तर अनेक जण स्फटिकांची जपमाळ सुद्धा वापरतात. मित्रानो जपमाळ कोणतीही असुद्या त्या जपमाळे बद्दल काही नियम कटाक्षाने पाळणे अत्यंत गरजेचे असते.

जर काही नियम पाळले नाही तर फायद्या ऐवजी नुकसान सोसावं लागू शकत. विशिष्ट देवी देवतांचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो. मित्रानो जपमाळे विषयी हिंदू धर्मशास्त्र असं मानत कि दर्भाशिवाय धर्मानुष्ठान , उदक स्पर्शाशिवाय दान व जप माळे शिवाय न मोजता केलेला जप हि सर्व कर्म निष्फळ आहेत.

म्हणजेच कोणत्याही मंत्राचा जप करताना आपण जप माळेचा वापर केला तर त्याच फळ हे कित्येक पटींनी अधिक प्राप्त होत. शक्यतो मंत्रांचा जप हा जपमाळेवरच करावा. मात्र एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी देवतांची जप जपू नयेत. लक्षात घ्या एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी देवतांच्या मंत्रांचा जप करण्यास हिंदी धर्मशास्त्र मनाई करत.

मित्रानो जर तुमची इच्छा असेलच तर आपण एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी देवतांच्या मंत्राचा जप करू शकता मात्र सौम्य आणि उग्र अशा दोन देवतांच्या मंत्रांचा एकत्रित जप आपण एका माळेवर करू नये. काली माता हि उग्र देवता आहे. तर एकाच माळेवर काली मातेचा जप आणि त्याच माळेवर भगवान श्री हरी विष्णूंचा जप करून चालणार नाही.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी जपमाळ आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाती लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. ती कधीच खुंटीला , खिळ्याला लटकवून ठेवू नका. तिच्या खास एखादी डबी किंवा वाटी करू शकता. आपल्या जपमाळेचा चुकूनही कधी अपमान करू नका , अनादर करू नका.

दररोज नित्य नियमाने माळेवर एक फुल अवश्य वहा. आपल्या घरात कितीही माणसे असुद्या एका व्यक्तीने वापरलेली जपमाळ हि दुसऱ्या व्यक्तीने चुकूनही वापरू नये , आणि चुकून जरी तुमच्या जप माळेला दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श झाला तर त्या जपमाळेस पंचगव्याने स्नान घालावं म्हणेज ती शुद्ध होते.

पंचगव्य म्हणजे गायीचे दूध , दही , घी , गोमूत्र आणि गोबर यांना पाण्यात मिक्स करून बनवलेल्या द्रव्याला पंचगव्य म्हणतात. मित्रानो जपमाळेच माहात्म्य फार मोठं आहे. खरतर या जपमाळे मुळे जप किती झाला , आपण किती मंत्र बोललो हे आपल्याला अगदी अचूक कळत.

आपण जेव्हा जप करतो तेव्हा अंगठ्यामध्ये आणि बोटामध्ये जे घर्षण निर्माण होत त्यातून निर्माण होणारी विद्युत शक्ती हि विलक्षण असते. ती आपल्या शरीरातील नसांद्वारे आपले हृदय प्रभावित करते , आपल्या मनाची एकाग्रता वाढवते.

मित्रानो विशेष करून एखाद्या विशिष्ट देवतेची तिथी असेल , एखादा उत्सव काळ असेल त्या काळात केलेला देवतेचा नाम जप हा अत्यंत प्रभावी ठरतो. अनेक जण काही दिवस एक मंत्र जप करतात नंतर मात्र मंत्र बदलतात. तर असे चुकून सुद्धा करू नका.

मित्रानो भक्ती सर्व देवी देवतांची करा ,मात्र ज्या देवतेचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे , ज्या देवतेचा मंत्र जप केल्याने तुम्हाला आनंद वाटतो , एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा तुमच्या अंगी निर्माण होते , काही अध्यात्मिक अनुभव तुम्हाला येतात तोच मंत्र तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट पकडून ठेवा.

शेवटचा श्वास घेताना सुद्धा अगदी तोच मंत्र आपल्या तोंडून बाहेर पडावा. मित्रानो जी व्यक्ती मरतेवेळी आपण आयुष्यभर केलेला मंत्रजप तोंडी आणते त्या व्यक्तीला मुक्ती अगदी सहजासहजी मिळते. वासनेच्या गुंत्यातून ती व्यक्ती बाहेर पडते.

मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरु नका.

वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here