या 10 खुणा सांगतात कि तुमचा पुनर्जन्म झाला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

0
297

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही गोष्टी ज्या आपल्या मागील जन्मातील खुणा आहेत आणि त्यावरून आपल्या लक्षात येते की आपला पुनर्जन्म झाला आहे.

बहुतेक वेळा काही गोष्टी , काही वागणे असे असते की ते घरात इतर कोणा सारखे नसते. त्यावरून हा प्रकार आपल्या मागील जन्माशी संबंधित आहे हे लक्षात येते. चला तर जाणून घेऊ या अशा बाबी ज्या मागील जन्माच्या खुणा आहेत.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जन्म खूण. बहुतेक बालके जन्मल्यानंतर त्यांच्या अंगावर लाल अथवा काळसर रंगाचा डाग असतो तर कधी जन्मत:च अंगावरती तीळ असतो. शरीरावरील अशा खुणा या आपल्या मागील जन्मातील एखाद्या घटनेशी संबंधित असतात.

मागच्या जन्मी मृत्यू वेळी आपल्याला लागले असेल , जखमी झाला असाल तर तेच या जन्मात आपल्याला जन्म खूण म्हणून दिसते. घरातील सर्व व्यक्ती नीट बोलत असतील आणि एखादी व्यक्ती अडखळत किंवा बोबडे बोलत असेल तर हे सुद्धा मागच्या जन्माच्या कर्माची फळ असतात.

एखाद्या व्यक्तीला उंच ठिकाणाची , वाहत्या पाण्याची, डोंगर कड्यांची भीती वाटत असेल तर अशा व्यक्तींचा मागील जन्मी मृत्यू हा उंच डोंगरावरून अथवा पाण्यात बुडून झालेला असतो. या गोष्टीमुळे त्यांना सध्याच्या जन्मी भीती वाटत असते.

अनेक व्यक्तींना आपण प्रथम बघत असलो तरी देखील फार जुनी ओळख आहे असे जाणवते. ही व्यक्ती तुमच्या मागील जन्माशी संबंधित असू शकते. विनाकारणच एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मन आपल्याला दूर राहण्यास सांगत असते. ते याच कारणामुळे, मागील जन्मी त्या व्यक्तीसोबत अप्रिय घटना घडलेली असू शकते.

रक्ताची नाती सोडून कधीकधी आपले नातेसंबंध अशा काही व्यक्तींसोबत घट्ट जोडले जाते ज्यांच्याशी आपले काही देणेघेणे नसते. आपण ज्या व्यक्तीचा विचार देखील करत नाही अशी व्यक्ती आपला जोडीदार होणे याचा अर्थ मागील जन्मांच्या संबंधाशी आहे.

कधीकधी आपल्याला काही अशा घटना आठवतात ज्यांचा आपल्या जीवनाशी अजिबात संबंध नसतो. हे मागच्या जन्मात घडलेल्या घटना या जन्मी आठवत असतात.

नवीन ठिकाणी जाऊन सुद्धा ती जागा परिचयाची वाटते. अथवा आपण न पाहिलेल्या जागा आपल्या स्वप्नात येतात. हे मागील जन्माशी संबंधित ठिकाणे असतात. बऱ्याच जणांना पुढे काय घडणार आहे याबद्दल अंदाज येतात.

थोडक्यात काय तर भविष्यात घडणाऱ्या घटनांची झलक त्यांना आधीच दिसते. असे जास्त करून मकर व कुंभ राशीच्या व्यक्ती सोबत घडते. त्याशिवाय काही लहान मुलांना कमी वयात देखील खूप ज्ञान असते. त्याला आपण दैवी देणगी मानतो. परंतु हे सर्व त्यांच्या मागील जन्माच्या कर्माचे फळ असते.

काही व्यक्ती आपले विनाकारणच वाईट चिंततात त्यांचा आपल्याशी संबंध देखील नसतो. मागील जन्मी आपण त्यांचे काहीतरी घेऊन वाईट वागलो असतो व ते परत केले नसते.

त्यामुळे तोच राग या जन्मात ते लोक काढत असतात. काही लोक विनाकारणच आपले शत्रू होतात. परंतु हे मागील जन्मीचे शत्रुत्व या जन्मात देखील मागे येते. या काही गोष्टींमुळे आपल्याला लक्षात येईल काही घटना मागील जन्माशी निगडित आहेत..!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here