अब हम रुकेंगे नहीं! गेल-पोलार्डला मागे टाकत इशान किशन ठरला अव्वल… जाणून घ्या नेमकं काय केलं इशान ने…

0
404

दुबईत खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2020 ने आता अंतिम टप्पा गाठला आहे.

काल मंगळवारी 3 नोव्हेंबर ला खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यातील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला.

कालच्या या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असला तरी या सामन्यात मुंबईचा युवा आणि टॅलेंटेड फलंदाज इशान किशनने एक खास पराक्रम केला आहे.

त्याने केलेल्या या कारनाम्यामध्ये ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डसारख्या विस्फोटक फलंदाजांनाही पाठीमागे सोडले आहे.

कालच्या सामन्यात टॉस जिंकत हैदराबादने फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि मुंबईला बॅटिंगसाठी आमंत्रित केले होते.

यावेळी प्रथम बॅटिंग करताना मुंबईने आपल्या 8 विकेट्स गमावत 149 रन्स केल्या.

मुंबईची सुरुवात खराब झाली. मुंबईकडून फलंदाजी करताना इशान किशनने चांगली फटकेबाजी करत 30 बॉल्स मध्ये महत्वपूर्ण अशा 33 रन्सचे योगदान दिले. त्याच्या या खेळीने मुंबई इंडियन्स ने एक सन्मानजनक स्कोअर उभा केला. आपल्या या छोट्याशा खेळीत इशान किशन ने एक फोर आणि 2 उत्तुंग सिक्स मारले.

इशान ने ठोकलेल्या या 2 सिक्सर चा त्याला खूप मोठा फायदा झाला. या सिक्सरमुळे त्याने आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपलं नाव समाविष्ट केले.

किशनने आतापर्यंत एकूण 26 सिक्स ठोकले आहेत. कालच्या 2 सिक्स सह त्याने राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज युवा फलंदाज संजू सॅमसनची बरोबरी केली. सॅमसननेही आयपीएल 2020 मध्ये 26 सिक्सर मारले आहेत.

सॅमसन आणि किशन या दोघांव्यतिरिक्त आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत निकोलस पूरन ने 25, इयॉन मॉर्गन ने 24 तसेच ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, केएल राहुल यांनी प्रत्येकी 23 सिक्स ठोकले आहेत.

यांच्यासोबतच मुंबईचा धडाकेबाज कायरन पोलार्ड 22, तर क्विंटन डी कॉक आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 20 सिक्स ठोकले आहेत.

आयपीएल 2020 मध्ये इशान किशनने आतापर्यंत 12 मॅच मध्ये एकूण 428 रन्स केल्या आहेत. आयपीएलच्या या हंगामात 400 धावांचा टप्पा पार करणारा अन कॅप म्हणजेच एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला खेळाडू ठरला आहे.

2020 आयपीएल मध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारे फलंदाज

*इशान किशन 26 सिक्स

संजू सॅमसन 26 सिक्स

निकोलस पूरन 25 सिक्स

इयॉन मॉर्गन 24 सिक्स

ख्रिस गेल 23 सिक्स

एबी डिविलियर्स 23 सिक्स

केएल राहुल 23 सिक्स

कायरन पोलार्ड 22 सिक्स

क्विंटन डी कॉक 20 सिक्स

हार्दिक पंड्या 20 सिक्स

मुंबई इंडियन्स चे फॅन असाल तर युवा टॅलेंटेड इशान किशन साठी एक शेयर नक्की करा.

आयपीएल आणि इतर अनेक मॅच संबंधित अशाच रंजक माहितीसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here