नमस्कार मित्रांनो,
सध्याच्या काळात स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक काळ पाहत राहने तसेच चुकीचा आणि अवेळी आहार, व्यायामाचा अभाव, त णाव, जागरण यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळेच अनेक लोकांना चष्मा लागत आहे.
मित्रांनो येथे चष्मा कायमस्वरूपी घालवण्यासाठी उपयुक्त असा घरगुती उपाय आपल्या आयुर्वेदात सांगितला आहे. या उपायामुळे डोळ्याचा नंबर कमी होऊन तुमचा चष्मा कायमचा निघून जाण्यासाठी मदत होईल.
डोळ्यांच्या काही समस्या असतील जसे की डोळे दुखणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे व व्यवस्थित न दिसणे आणि डोळ्यांच्या समस्या दुर होण्यास मदत होते. यामुळे डोळे निरोगी राहतील तसेच डोळ्याच्या नसांना ताकत मिळते. दृष्टी सुधारण्यास मदत होते.
जर वारंवार डोळे लाल होत असतील किंवा डोळ्यांची आग होत असेल त्यासाठी गाईचे तुप उपयुक्त ठरते. हे गाईचे तुप रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांना लावायचे आहे आणि दोन्ही तळपायांना तुपाने मसाज करून, ते तूप नाभीमध्ये सोडायचे आहे. यामुळे डोळ्यांची ताकद वाढण्यास मदत होते.
मित्रांनो दोन चमचे दही घेऊन त्यात 4 ते 5 काळ्यामिऱ्या मिश्रण करायचे आहे. त्यानंतर एक चमचा कच्ची बडीशेप आणि खडीसाखर घ्यायची आहे. ही खडीसाखर बारीक करून घेतल्यावर ती दहीमध्ये मिक्स करायची आहे.
जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तूम्ही एक वाटी दूध घेऊ शकता. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळी चहा प्यायच्या वेळेस घ्या. हे मिश्रण दिवसातून फक्त एकच वेळी घ्या. त्यावेळेस हे मिश्रण पुर्ण खाऊन घ्या.
दोन्ही उपाय तुम्ही काही दिवस केल्यास तुमच्या डोळ्याच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत होते. जसे की डोळे लाल होणे तसेच तीन महिन्यात तुमचा चष्मा देखील निघून जाईल. अगदी साधा सोपा आणि घरगुती उपाय हिवाळ्याच्या दिवसात दुधाचा वापर तुम्ही करू शकता. तसेच सतत अत्याधुनिक गॅ जे ट्सचा वापर मर्यादित करावा.
थोड्या-थोडया वेळाने डोळ्यांना विश्रांती द्यावी. त्यामुळे डोळ्यांवर येणारा ता ण कमी होण्यास मदत होते. डोळ्यांचे काही काही व्यायाम देखील करावेत. डोळ्यांसाठी उपयुक्त प्रथिने असणारी फळे व भाज्या खाव्यात. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच काही आसने, योगा करावेत ज्यामुळे डोळ्यातील नसांना आराम मिळेल. डोळे वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावेत. काम करताना अधून मधून डोळ्यांवर अलगद हात फिरवावा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.