नमस्कार मित्रांनो,
हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. दोन दिवस साजरा केला जाणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धूलिवंदन म्हणजे अर्थात होळी खेळली जाते.
होळीच्या दिवशीच भगवान श्री हरी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली जाते. मित्रांनो होळीची रात्र हि विशेष मानली जाते कारण याच दिवशी पौर्णिमा असते.
वर्षभरामध्ये काही विशेष तिथी काही विशेष दिवस असतात त्यामधील एक दिवस म्हणजे होळीचा दिवस. मित्रांनो या वर्षी 28 मार्च रविवारी होळीचा सण आलेला आहे. मित्रांनो या दिवशी होळी पेटवली जाते.
होळीच्या पवित्र अग्निमध्ये आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकटे जळून राख व्हावीत आणि आपल्या आयुष्यात आनंदी आनंद यावा यासाठी या विशेष तिथीला अनेक उपाय केले जातात.
जर घरात आर्थिक समस्या असतील अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी देखील या दिवशी विशेष उपाय केले जातात. मित्रांनो असं म्हटलं जात कि माता लक्ष्मी हि चंचल आहे म्हणजेच एकाच ठिकाणी ती जास्त दिवस राहत नाही.
आपल्याला असं वाटत असेल माता लक्ष्मीने आपल्या घरातून कधीच बाहेर जाऊ नये म्हणजेच आपल्या घरातील धन, पैसा कधीच आपल्याला कमी पडू नये यासाठी होळीच्या दिवशी एक विशेष उपाय आपल्याला करायचा आहे.
मित्रानो होळीच्या दिवशी होळी प्रजवलीत केल्या नंतर पूरन पोळीचा नैवैद्य दाखवला जातो. सोबतच होळीला जल अर्पण करून प्रदक्षिणा देखील घातल्या जातात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाच, सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता.
होळीची पूजा करून नैवैद्य अर्पण केल्या नंतर आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे. उपाय अगदी सोपा आहे. यासाठी तुम्हाला दोन लवंग, दोन विड्याची पाने आणि थोडेसे देशी गाईचे तूप लागणार आहे.
मित्रांनो आपल्याला दोन्ही लवंगा देशी गाईच्या तुपात बुडवून विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत. विड्याची पाने एकावर एक ठेवायची आहेत त्यानंतर त्यावर तुपात बुडवलेली लवंग ठेवायची आहे.
मित्रांनो होळी प्रजवलीत केल्यानंतर हे विड्याचं पान लवंगासकट आपल्याला होळीत अर्पण आहे. आणि त्यानंतर आपल्याला मनात जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती मनातल्या मनात बोलून देवाला प्रार्थना करायची आहे माझी मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी.
सोबतच तुम्हाला घरात सुख समृद्धी हवी असेल तर एक नारळ तुम्ही या होळी मध्ये अर्पण करायचा आहे. यामुळे आपल्या घरातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढते. घरात सुख समृद्धी आणि शांती येते.
जर तुम्हाला नोकरी संबधी काही समस्या असतील तर काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन आपल्याला ते होळी मध्ये अर्पण करायचे आहेत. पण हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे. कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे.
तर मित्रांनो तुमच्या जीवनात देखील अशा काही समस्या असतील तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी होळीच्या विशेष तिथीला वरील उपाय अवश्य करा. नक्कीच तुम्हाला याचा सकारात्मक लाभ होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.