हा एक पदार्थ आणि अर्धशिशी, डोकेदुखी 2 मिनिटात बंद…

0
344

नमस्कार मित्रानो,

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये डोकेदुखी हा सर्वसाधारण आजार झाला आहे. प्रत्येकाला डोके दुखण्याचा त्रास हा कधी ना कधी होतोच.

खास करून आपल्या घरातील स्त्रिया असं म्हणताना आपल्याला दिसतात कि आज माझं डोकं फार दुखतंय. हा त्रास जरी सामान्य वाटत असला तरी तो आपला पूर्ण दिवस खराब करू शकतो.

सततच्या डोकेदुखी मुळे चिडचिड होते आणि त्यामुळे कुठल्याच कामात लक्ष लागत नाही. तर डोकेदुखीची समस्या मुळापासून घालवण्यासाठी खास आपल्यासाठी रामबाण उपाय आम्ही घेऊन आलो आहोत.

चला तर मग जाणून घेऊ काय आहे तो उपाय.

मित्रांनो डोकेदुखीची काही सामान्य कारणे आहेत, जसे कि चिंता केल्याने, मोबाईलचा अति वापर केल्याने, टीव्ही कॉम्पुटर जास्त वापरल्याने, जागरण, खाण्या पिण्याची पद्धत त्यासोबतच पित्त झालेलं असेल, मायग्रेनचा त्रास असेल, सर्दी झालेली असेल तरी सुद्धा डोकेदुखीचा त्रास हा होतो.

यावर खूप साधा सोप्पा उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लसणाच्या 4-5 कांड्या सोलून घ्यायच्या आहेत.

लसणामध्ये श्वास मोकळा करण्याचे गुणधर्म असतात. सोबतच लसणात जे गंधक असत त्या गंधकाचे औषधी गुणधर्म देखील आहेत. लसणात जंतुनाशक घटक हे वेदना शमवण्याचं काम करतात.

लक्षात घ्या लसणाच्या एका काडीचा एका वेळी एकदाच उपयोग करायचा आहे. लसणाची एक पाकळी चमच्याच्या साहाय्याने चांगली ठेचून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला लसणाचा रस निघालेला दिसेल. हा जो रस आहे तो तुम्हाला दुखऱ्या भागावरती म्हणजेच ज्या ठिकाणी तुमचं डोकं दुखतंय किंवा अर्धशिशी झालेली असेल त्या ठिकाणी तो रस चोळायचा आहे.

असे केल्याने पुढच्या 2 ते 3 मिनिटात तुमचं डोकं दुखायचं बंद होऊन पाहिल्यासारखाच आराम पडेल. लसणाच्या एकाच पाकळीच्या उपयोग तुम्हाला एकावेळी करायचा आहे. कारण या उपायाने डोक्याची आग होते आणि 2-3 पाकळ्या एकदम ठेचून लावल्या तर जास्त आग होऊ शकते.

तुम्ही दिवसभर कुठे बाहेर असाल आणि तेव्हा डोके दुखू लागले तर तुम्ही पाकळ्या सोबत ठेवून हा उपाय कधीही कुठेही करू शकता. अगदी दोनच मिनटात अर्धशिशी, डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास आहे तो नाहीसा होईल. जर तुम्ही घरी असाल तर या मध्ये अजून पदार्थ मिक्स करू शकता.

त्यात तुम्ही कापूर मिक्स करू शकता. कापरात जे मेंथॉल असते ते मेंथॉल आपल्या डोक्याच्या समस्यांसाठी अत्यंत उपयोगी असत. आपण पाहतो विक्स, झंडू बाम तुम्ही डोक्याला लावता त्यामध्ये सुद्धा मेंथॉल असत. त्या कापराच्या वडीचा चुरा करून त्या लसणाच्या तेलामध्ये मिक्स करायचा आहे. कापराची पावडर सुद्धा चालेल.

आणि हे मिश्रण मगाशी जसे दुखऱ्या भागावर लावले त्याप्रमाणे लावायचे आहे. ज्यांना कायम डोकेदुखीची समस्या आहे त्यांनी अवश्य एकवेळ हा उपाय करून बघा. फरक तुम्हाला स्वतःला कळून येईल.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here