नमस्कार मित्रांनो,
आज मंगळवारचा दिवस 27 एप्रिल, आजच्या या दिवशी आलेली आहे चैत्र शुक्ल पौर्णिमा. मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रात चैत्र शुक्ल पौर्णिमेचे मोठं महत्व सांगितलेलं आहे.
मित्रांनो प्रत्येक वर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेला आपण हनुमान जन्मोत्सव चा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. मित्रांनो याच दिवशी प्रभू हनुमान यांचा जन्म झाला होता.
हनुमान हे अमर आहेत आणि आजच्या या कलीयुगात सुद्धा हनुमान या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत असं मानलं जातं. हिमालयाच्या पर्वत रांगेत आजही हनुमान हे अनेक साधू संतांना दर्शन देतात.
हनुमान यांना प्रसन्न करणं अत्यंत सोपं मानलं जातं. अगदी साध्या सोप्या उपायाने सुद्धा हनुमानाला प्रसन्न करता येतं.
मित्रांनो आज हनुमान जयंतीच्या या शुभ दिवशी केलेली छोटीशी पूजा देखील प्रभू हनुमानाला प्रसन्न करते.
ज्या लोकांच्या जीवनात गरिबी आहे, पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही अशा लोकांनी या दिवशी प्रभू हनुमंताला जरूर प्रसन्न केलं पाहिजे.
मित्रांनो याच्या बरोबर ज्या लोकांच्या घरी सतत आजा रपण असतं, एका मागोमाग अनेक व्यक्ती आ जारी पडतात, अनेक प्रकारचे वैद्य कीय उपचार करून पण जर काही फरक पडत नसेल तर आपण आजचा हा एक अत्यंत साधा सोपा उपाय करू शकता.
मित्रांनो प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते पण चैत्र शुक्ल पौर्णिमा जी हिंदू नव वर्षातील पहिली पौर्णिमा समजली जाते तिचं महात्म्य खूप मोठे आहे.
आजचा आपला जो उपाय आहे तो आपल्या घरातील आ जारपण दूर करतो. ज्या लोकांच्या जीवनात आजा रपण आहे, वैद्य कीय उपचार करून पण आजार जात नसतील, किंवा त्यांच्या जीवनात खूप मोठ्या समस्या आहेत त्या सर्वांच्या साठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्या घरावर संकटं येतात, घरातील लोकांचे वारंवार अपघात होत असतात, राहू चे दोष, केतू चे दोष, शनी दोष, शनीची साडे साती आहे, अशा लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हा छोटासा उपाय अवश्य केलाच पाहिजे.
मित्रांनो या कोरो ना महामारीच्या काळात सगळीकडे सर्व मंदिरे बंद आहेत याची आपल्याला कल्पना आहेच.
पण मित्रांनो जर तुमच्या घराजवळ कोणतं मंदिर उघडे असेल तर तुम्ही त्या मंदिरात जाऊन हा उपाय करू शकता. पण जर मंदिर बंद असेल तर काळजी करू नका, आणि शासकीय नियम पाळा.
आणि हा उपाय आपण आपल्या घरातच मारुती रायांची मूर्ती, तसबीर किंवा फोटो ठेऊन करू शकतो.
मित्रांनो हा उपाय करताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि आस्था ठेवा. अगदी मनापासून हा उपाय करा.
मित्रांनो हनुमान यांची पूजा करताना हनुमानांच्या मूर्तीचे किंवा फोटोचे तोंड हे दक्षिणेकडे असावे. म्हणजेच हनुमान दक्षिणेकडे पाहत आहेत असा फोटो किंवा मूर्ती ठेवावी.
दक्षिणेकडे तोंड करून ठेवल्यानंतर आपल्याला हनुमानाची पूजा करायची आहे.
मित्रांनो आपण दिवसभरात ही पूजा कधीही करू शकता. अगदी रात्री केली तरी सुद्धा चालेल. रात्री केली तर अतिशय उत्तम आहे. विशेष करून रात्री 11:30 नंतर 12:30 पर्यंतचा काळ सर्वोत्तम मानला जातो.
प्रभू हनुमानाची पूजा करताना फार मोठी पूजा करायची गरज नसते, प्रभू हनुमानाला ज्या वस्तू प्रिय असतात त्या वापरा. हनुमानाला प्रिय असणारी लाल फुले, जास्वंदीचे फुल, गुलाबाचे फुल वापरा.
मित्रांनो प्रभू हनुमानाला गूळ आणि भाजलेले हरभरे किंवा फुटाणे यांचा प्रसाद अत्यंत प्रिय असतो. तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही हरभरे किंवा चणे भाजून घेऊ शकता.
असा हा गूळ आणि फुटाण्याचा प्रसाद आपल्याला हनुमानाच्या चरणी वाहायचा आहे. त्या सोबतच एक ते दोन लवंग सुद्धा आपल्याला मोठ्या श्रद्धेने हनुमानाच्या चरणी ठेवायच्या आहेत.
मित्रांनो या लवंगा पूर्ण साबूत असाव्यात म्हणजेच फुल असलेल्या व न तु टलेल्या फु टलेल्या असतील याची अवश्य काळजी घ्या.
मित्रांनो हनुमानाला जाई म्हणजेच चमेलीचे तेल अत्यंत प्रिय असते. हे तेल आपल्याला बाजारात मिळेल. तर त्या तेलाचा दिवा लावावा. पण जर जाईचं तेल नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल.
आपण जो दिवा लावणार आहोत त्या दिव्याची वात ही लाल रंगाची असावी. आपल्या घरात जी वात असेल त्या वातीला कुंकू च्या पाण्यात बुडवून लाल रंग देऊ शकता.
अशा प्रकारे दिवा लावा, गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे.
त्यानंतर हनुमानाच्या समोर हात जोडायचे आहेत आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की आपल्या घरावर जे संकट आलेलं आहे, जे आजारपण आलेलं आहे ते लवकर दूर व्हावं. अडचणीतून आपल्याला मुक्त करावं.
मित्रांनो प्रार्थना करून झाल्यानंतर हनुमान चालीसाचा अकरा वेळा आपण पाठ करायचा आहे.
हनुमान चालीसाचा एक पाठ करण्यासाठी 5 ते 7 मिनिटे पुरेशी असतात. अकरा वेळा हनुमान चालीसा चा पाठ केल्यानंतर जय श्री राम या मंत्राचा अकरा वेळा जाप करायचा आहे.
मित्रांनो जय श्री राम या मंत्राने हनुमान खूप लवकर प्रसन्न होतात अशी हिंदू धर्म शास्त्रात मान्यता आहे.
अकरा वेळा हनुमान चालीसा आणि जय श्री राम या मंत्रांचा जप केल्यानंतर आपण हनुमानाची आरती करायची आहे.
मित्रांनो तुम्हाला आरतीच्या पुस्तकात हनुमानाची आरती नक्की मिळेल, नसेल तर आपण गुगल वरून आरती पाहून करू शकता.
अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आरती करून झाल्यावर आपलं कपाळ हनुमानाच्या चरणी कपाळ टेकवा. आणि आपल्या इच्छा, मनोकामना बोलून दाखवा.
मित्रांनो हनुमान जयंती आहे, हा वर्षातील सर्वश्रेष्ठ दिवस मानला जातो. प्रभू हनुमान आपल्यावर नक्की प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.