नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो ज्योतिषशास्त्रा मध्ये हळदीचा वापर बऱ्याच वेळा केला जातो. शास्त्रा मध्ये हळद हि खूपच शुभ मानली गेली आहे. त्यामुळे ज्यावेळी कुठलीही पूजा असेल, लग्न समारंभ असेल किंवा एखादे शुभ कार्य असेल त्यामध्ये हळदीचा वापर अवश्य केला जातो.
हळदी मध्ये दैवीय गुण देखील आहेत. तर अश्या या सर्वगुण संपन्न हळदीपासून केला जाणारा उपाय आज आपण पाहणार आहोत.
जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा संतान सुख हवे असेल, धन प्राप्ती होत नसेल, धन प्राप्तीचे योग जर जुळून येत नसतील आणि ते जर जुळून आणायचे असतील, करियर संबंधी काही समस्या असतील तर त्याच्या निवारणासाठी तुम्ही देखील हा उपाय करू शकता.
मित्रांनो प्रत्येक घरामध्ये हळद हि उपलब्ध असतेच. एखाद्या प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हळद ठेवलेली असेल. या हळदीच्या डब्यामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे.
असे केल्यामुळे जर कोणी तुमच्यावर जादूटोणा, करणी वगैरे केली असेल तर त्यापासून तुम्ही सुरक्षित राहाल. ज्या व्यक्तीने करणी वगैरे केली असेल ती त्याच व्यक्तीवर उलटेल.
बऱ्याचदा असे होते कि आपले जे शत्रू असतात ज्या लोकांना आपलं चांगलं झालेलं पाहावत नाही असे जे लोक असतात ते वाईट शक्तींचा वापर आपल्यावर करत असतात.
तर या पासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. मित्रांनो हा उपाय अगदी सोप्पा आहे. ज्या डब्यात तुम्ही हळद भरून ठेवता त्यात तुम्हाला लाल रंगाच्या चार ते पाच मिरच्या ठेवायच्या आहेत.
या मिरच्या सुकलेल्या असाव्यात. ताज्या मिरच्या शक्यतो ठेवू नका. सुकलेल्या चार ते पाच मिरच्या तुम्हाला हळदीच्या डब्यात नेहमी ठेवायच्या आहेत. काही दिवसांनी तुम्ही या मिरच्या जेवणामध्ये वापरू शकता.
पण त्या मिरच्या सतत बदलत राहायच्या आहेत. आणि पुन्हा हळदीच्या डब्यामध्ये सतत ठेवायच्या आहेत. असं केल्याने कोणी करणी केली असेल, तुमच्या परिवारावर कोणाची वाईट शक्ती असेल त्यापासून तुमचे आणि परिवाराचे संरक्षण होईल.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी कुठलाही खर्च नाहीये. मिरच्या आणि हळद सर्वांच्या घरी असतात. खूप सोप्पा परंतु खूपच प्रभावशाली हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.