गुरुवारी चुकूनसुद्धा कोणाला या 3 वस्तू देऊ नका… घरात दारिद्र्य आलेच म्हणून समजा…

0
804

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी चुकूनही या 3 वस्तू कोणाला देऊ नका नाहीतर दुर्भाग्य तुमचा पाठलाग सोडणार नाही. बारीक पाहिले तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगला वाईट काळ येत असतो. परंतु बऱ्याच वेळा वाईट काळ आपला पिच्छा सोडत नाही.

तुम्ही कोणतेही काम हाती घ्या ते पूर्ण होत नाही. ते काम करताना त्यात अनेक अडचणी येत राहतात. अशा परिस्थितीत सतत असं वाटत राहत कि आपल्या डोक्यावर दुर्भाग्याच सावट आहे.

मित्रांनो दुर्भाग्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु आज आपण याच विशेष कारण पाहणार आहोत. मित्रांनो गुरुवार हा माता लक्ष्मीचा आणि श्री विष्णूंचा दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णूंची आराधना केल्याने व्यक्तीच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात.

पण मित्रांनो खूपच कमी जणांना माहित असेल कि गुरुवारच्या दिवशी काही वस्तू जर आपण दुसऱ्यांना दिल्या तर आपल्यावर सतत दुर्भाग्याच सावट राहत. आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते.

याच कारण म्हणजे गुरुवारच्या दिवशी या वस्तूंचं दान करण खूपच अशुभ मानलं जात. आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत कोणत्या आहेत त्या 3 वस्तू ज्या गुरुवारच्या दिवशी कोणालाही देऊ नयेत.विशेष करून त्या व्यक्तींना ज्या तुमच्या कुटुंबाचा हिस्सा नाहीत.

1) सोने किंवा चांदी

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी सोने किंवा चांदी पासून बनवलेली कोणतीही वस्तू दुसऱ्यांना देऊ नका. अनेकदा आपण या वस्तू भेट म्हणून देतो. परंतु या वस्तू गुरुवारच्या दिवशी चुकूनही कोणाला भेट म्हणून देऊ नका.

मित्रांनो अनेक महिला आपले दागिने दुसऱ्या महिलांना घालण्यासाठी देतात. परंतु दागिने सुद्धा गुरुवारच्या दिवशी देणे टाळावे. मित्रांनो गुरुवार हा लक्ष्मी नारायणाचा दिवस आहे. यादिवशी सोने चांदी जर दुसऱ्यांना दिलीत तर आपल्या घरातील लक्ष्मी दुसर्यांचा घरी जाते.

2) काळ्या रंगाचे कपडे

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे कोणालाही देऊ नका. या दिवशी कोणालाही काळ्या रंगाचे कपडे देणे अपशकुन मानले जाते. यामुळे देणारा व घेणारा दोघेही दुर्भाग्याचे शिकार बनतात.

त्यामुळे या दिवशी कोणालाही काळ्या रंगाचे कपडे देऊ देखील नका आणि कोणाकडून ते घेऊ सुद्धा नका. नाहीतर तुमची वाईट वेळ सुरु झालीच म्हणून समजा.

3) धान्य

मित्रानो गुरुवारच्या दिवशी कोणालाही आपल्या घरातील धान्य देउ नका. यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकत. जर तुम्हाला कोणाला धान्य देणं आवश्यकच असेल तर दुकानातून धान्य खरेदी करून देऊ शकता. पण लक्षात ठेवा घरातून धान्य देऊ नका.

मित्रांनो या आहेत त्या 3 वस्तू ज्या तुम्ही चुकून सुद्धा दुसऱ्यांना गुरुवारच्या दिवशी दिल्या तर तुमच्या घरी दुर्भाग्य आलेच म्हणून समजा. त्यामुळे मित्रांनो वर दिलेल्या गोष्टी कटाक्षाने टाळा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here