नमस्कार मित्रांनो,
उद्यापासून हिंदू नवीन वर्ष सुरू होईल. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होते. येणारे नवीन वर्ष हे आपल्याला सुख, समाधानकारक जावे यासाठी आपल्याला काही खबरदारी, काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
आज आपण पाहणार आहोत की या नवीन वर्षामध्ये आपल्या घरातील कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही देऊ नयेत. या वस्तूंसोबत आपलं भाग्य जोडलेलं असतं. या वस्तू जर तुम्ही दुसऱ्यांना दिल्यात तर या वस्तूंसोबत तुम्ही तुमचं भाग्य सुद्धा दुसऱ्यांना देत असता.
त्यामुळे या वस्तू जर तुम्ही कोणाला दिल्या तर तुम्ही तुमचं नशीब सुद्धा देत असता. त्यामुळे त्यानंतर तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुमच्या घरी पैसा येत नाही. तुमच्या घरी भांडण, क्लेश होऊ शकतो. तुमचं येणारे वर्ष हे दुःख मय बनेल.
मित्रांनो उद्या 13 एप्रिल 2021 ला गुढीपाडवा आहे. मंगळवारच्या दिवस आहे. माता लक्ष्मी चा वार आहे. या दिवशी तुम्ही मिठाई किंवा एखादा गोड पदार्थ अवश्य खरेदी करा आणि त्याचा नैवेद्य माता लक्ष्मी ला दाखवा. त्यानंतर ही मिठाई आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी खा. असं केल्याने पूर्ण वर्षभर तुमच्या घरी भांडणं नाही होणार.
मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका. काळा रंग तसाही अशुभ समजला जातो. काळ्या रंगाचे कपडे शुभ प्रसंगी, मंगलप्रसंगी, सणासुदीला घालू नयेत. काळ्या रंगा ऐवजी लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. त्यामुळे आपल्याला शुभ फलप्राप्ती होते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 13 एप्रिल 2021 या दिवशी आपण आपल्या घरात लख्ख प्रकाश करावा. घरामध्ये अंधार असू नये.
त्याचप्रमाणे तुट लेल्या फूट लेल्या ज्या वस्तू असतील त्या घरातून बाहेर काढाव्यात. या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. ही नकारात्मक ऊर्जा घरातील सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास करते त्यामुळे तूट लेल्या, फूट लेल्या वस्तू घरातून बाहेर काढा.
तुमच्या घरातील तिजोरी, कपात, कॅश बॉक्स, ड्रॉवर उघडे ठेऊ नका. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तिला आपल्या कपाटातच ठेवा. गरजेपुरते आपण दार उघडू शकतो. पण ती सताड उघडी ठेऊ नका.
मित्रांनो नवीन वर्षी आपल्या पाकिटात, पर्स मध्ये नवीन कोऱ्या करकरीत नोटा नक्की ठेवा. आपल्या पाकिटात नवीन नोटा ठेवल्याने आपल्याला येणाऱ्या पूर्ण वर्षात पैशाची कमी नाही होणार. आपलं पाकीट नेहमी पैशाने भरलेलं राहील.
या दिवशी उधारीचे व्यवहार करू नका. उधारीचे व्यवहार करूच नका. कोणाला उधार देऊ सुद्धा नका आणि घेऊ सुद्धा नका. तुम्ही जे पैसे उधार द्याल ते परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आणि जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले तर ते पैसे तुम्ही कितीही फेडायचे म्हटलं तरी फेडता नाही येणार.
मित्रांनो या दिवशी नकारात्मक विचार अजिबात करू नका. नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक काम करू नका, कोणाचा अपमान करू नका.
कोणाला कर्ज देणे किंवा कोणाकडून कर्ज घेणे अशी कामं करू नका. या दिवशी घेतलेलं कर्ज फेडलं जाणार नाही. त्यामुळे कर्जाचे व्यवहार करू नका.
या दिवशी नॉन व्हेज खाऊ नये. नवीन वर्षाची सुरुवात मांसाहार करून करू नका.
मित्रांनो तुमच्या घरी कोळ्याचे जाळे असतील तर ते सुद्धा काढून टाका. कोळ्याचे जाळे असतील तर ते आपल्या घरातील पैसे कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे घरात स्वच्छता राखा. कुठे कोळ्याचं जाळं दिसलं तर ते काढून टाका.
पहिला दिवस आहे या दिवशी आपल्या घरी शांततेचं वातावरणात ठेवा. या दिवशी घरी शांततेचं वातावरण ठेवलं तर पूर्ण वर्ष भर आपल्या घरी शांतता राहील. कोणत्याही परिस्थितीत घरी भांडणं होणार नाही. वाद होणार नाहीत.
माता लक्ष्मी चंचल आहे. तुम्ही कितीही पैसे कमवा, पण माता लक्ष्मी कधी तुमची साथ सोडून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून या पहिल्या दिवशी माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्याचं वातावरण बनवावं. कोणाशी वाद, भांडण, अपमान करू नका.
मित्रांनो पुढील चार वस्तू कोणालाही देऊ नका. फक्त नवीन वर्षात नाही तर पुढे कधी सुद्धा या वस्तू कोणाला देऊ नका.
दही
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दही कोणालाही देऊ नका. दही मागणारी व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरी दही देऊ नका.
मीठ
मित्रांनो मीठ कधीही कोणाला देऊ नका. मीठ ही अशी वस्तू आहे जी उसनी पासनी करू नये.
तांदूळ
वेगवेगळे उपाय, तोटके करताना तांदूळ वापरले जातात. आपण खूप प्रयत्न करतो तरी आपल्या घरी पैसा येत नसेल. तर तुम्ही तांदूळ सुद्धा कोणालाही देऊ नका.
1 रुपयांचा सिक्का
मित्रांनो तुम्ही जो धंदा, व्यवसाय करत असाल त्यामधून रोज सकाळी जो पहिला व्यवहार होईल त्यातील एक रुपया कधीही कोणाला देऊ नका. ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाचा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.