नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणतेही धान्य असुद्या. मग ते गहू, तांदूळ, मूग, मटकी किंवा इतर कोणतेही धान्य या सर्वात किडे किंवा अळ्या होतात. बहुतेक लोकांच्या धान्याला कीड लागते.
सर्वच जण बऱ्यापैकी धान्य घरात आणून साठवून ठेवतात आणि जेव्हा लागेल तेव्हा त्याचा वापर करतात. जास्त प्रमाणात साठवून ठेवल्यामुळे त्याला किडे लागून ते किडे संपूर्ण धान्य पोखरून टाकतात.
आणि मग हे धान्य खराब झाले कि जेवनापासाठी वापरण्यायोग्य राहत नाही. खासकरून मूग, मटकी आणि सर्व प्रकारचे कडधान्य जर खराब झाली तर ते आपल्याला वापरता येत नाही. किडे धान्याच्या आता जाऊन पूर्ण पणे पोखरून टाकतात.
किडे होऊ नये म्हणून बाजारात विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परिणामी हि औषधे वापरल्याने या धान्यांना वास लागतो. आणि मग खाताना वास आल्याने ते अन्न खावेसे वाटत नाही.
आणि मित्रांनो औषधांमध्ये असलेल्या केमिकलचा आपल्या शरीरावर परिणाम देखील होऊ शकतो. परंतु आज मित्रांनो आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत त्यामुळे तुमच्या धान्यातील कीड पाच मिनिटात बाहेर पडेल.
मित्रांनो तुम्हाला एक न्यूज पेपर घ्यायचा आहे. आणि कुठलेही धान्य बरणीमध्ये किंवा गोणी मध्ये भरत असताना तुम्हाला त्यात पेपरचे बारीक तुकडे करून टाकायचे आहेत.
या पेपरच्या वासामुळे त्यात कुठलाही किडा, सोंड, जाळी होत नाही. मित्रांनो याचा दुसरा फायदा असा कि ज्यावेळेस आपल्याला धान्य लागणार आहे त्यावेळेस हे पेपरचे तुकडे सहज आपल्याला बाजूला करता येतात.
सर्वात महत्वाचं म्हणजे याचा शरीरावर कुठलाही घातक परिणाम होत नाही. पेपरचा कुठल्याही प्रकारचा वास धान्याला लागत नाही. जर तुमच्या धान्याला आधीच कीड लागलेली असेल तर एका मोठ्या भांड्यात ते धान्य पसरवून ठेवायचं आहे.
आणि त्यानंतर न्यूज पेपरचे कैचीने किंवा हाताने तुकडे करून त्यात टाकायचे आहेत. मित्रांनो न्यूज पेपरच वापरायचा आहे. दुसऱ्या कुठला पेपर यासाठी वापरायचा नाहीये.
न्यूज पेपरची जी शाई आहे त्या शाई मुळे हे जे किडे आहेत ते बाहेर पडायला सुरवात होते. पेपरच्या वासामुळे धान्यातील कीड अगदी पाचच मिनिटांत बाहेर पडायला सुरवात होईल.
मित्रानो अगदी साधा आणि सोप्पा उपाय आहे. एकवेळ अवश्य ट्राय करून बघा.मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.