नमस्कार मित्रांनो,
बहुतेक धर्मामध्ये मासिक पाळी आली कि स्त्रियांना अपवित्र समजले जाते. या काळात स्त्रियांना मंदिरात जाणे किंवा घरातील देवघरात सुद्धा प्रवेश करू दिला जात नाही.
मग आपल्या मनात असा प्रश्न येतो कि जर या स्त्रियांना देवपूजा करता येत नसेल तरीही मासिक पाळी दरम्यान काही स्त्रिया या उपवास कसा काय करतात. त्यांनी केलेल्या या उपवासाचे पुण्य फळ त्यांना मिळते का, हे शास्त्रात मान्य आहे का.
हे शास्त्रात मान्य असेल तर त्यामागे कोणते कारण आहे. आज आपण महिलांना येणाऱ्या मासिक पाळी संबंधित काही प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
भागवत पुराणात दिल्या नुसार मासिक पाळी दरम्यान स्त्रिया या ब्रह्म हत्ये सारख्या दिव्यातून जात असतात. भागवत पुराणात या विषयी एक कथा सांगितली जाते.
मित्रांनो या कथेनुसार इंद्र देवांनी गुरु बृहस्पती यांचा काहीतरी कारणाने अपमान केला. त्यांच्या या अपमानजनक वागणुकीमुळे गुरु बृहस्पती हे नाराज झाले. आणि ते इंद्र लोकांतून निघून गेले.
हि गोष्ट जेव्हा असुरांना समजली त्यावेळी त्यांनी इंद्र लोकावर आक्रमण केले. ज्यामध्ये देवराज इंद्र यांचा पराभव झाला. व त्यांना आपले सिंहासन सोडून तिथून पळून जावे लागले. त्यानंतर इंद्र देव त्याहून ब्रह्म देवांकडे गेले. व त्यांच्याकडे मदतीची याचना केली.
त्यावेळी ब्रह्म देवांनी त्यांना सांगितले कि यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला एका ब्रह्मज्ञानी व्यक्तीची सेवा करावी लागेल. जर ते ब्रह्मज्ञानी व्यक्ती तुमच्या सेवेमुळे प्रसन्न झाले, तर तुमचे राजसिंहासन परत मिळेल.
त्यानंतर ब्रह्मदेवांनी सांगितल्यानुसार इंद्रदेव एका ब्रह्मज्ञानीची सेवा करू लागले. पण इंद्र देवांना हे माहित नव्हते कि ज्या व्यक्तीची ते सेवा करत आहेत त्यांची आई हि एक दानव कुळातील आहे. आणि त्यामुळे त्या ब्रह्म ज्ञानी व्यक्तीला असुरांबद्दल जास्त प्रेम होते.
असुरांवरील प्रेमामुळे तो व्यक्ती सर्व हवन सामग्री देवतां ऐवजी असुरांना देऊन टाकत असे. ज्यावेळी देवराज इंद्र यांनी हि गोष्ट माहित पडली त्यावेळी त्यांनी क्रोधात येऊन त्या ब्रह्मज्ञानी ची ह त्या केली.
नंतर त्यांचा क्रोध शांत झाल्यावर जेव्हा त्यांच्या लक्षात आले कि त्यांच्या हातून एका ब्रह्म ज्ञानी ची ह त्या झाली आहे तेव्हा ते घाबरून एका फुलात जाऊन लपले. तेथूनच ते श्रीहरी विष्णू यांचे ध्यान व पूजन करू लागले. काही काळाने इंद्रदेव यांच्या पूजेमुळे श्री हरी विष्णू प्रसन्न झाले. व तेथे प्रकट झाले.
श्री हरी विष्णू हे इंद्रदेवांना म्हणाले कि ब्रह्म ह त्ये सारख्या पापातून जर तुला मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला त्या पापाचे ४ भाग करून झाड, जमीन, पाणी आणि स्त्री यांना ते थोडे थोडे वाटून द्यावे लागेल. त्या बरोबरच या सर्वांना एकेक वर सुद्धा द्यावा लागेल.
हे सर्व ऐकून इंद्रदेव सर्वात आधी झाडाकडे गेले. त्याला आपल्या ब्रह्म ह त्येतील काही भाग घेण्याची विनंती केली. झाडाने त्या पापात चौथा हिस्सा आपल्याकडे घेतला. इंद्रदेवानी त्याला आशीर्वाद दिला कि तुला जरी कापून टाकले तरी तुझी इच्छा असेल तर कापलेल्या लाकडातून तू नवीन रोप निर्माण करून जिवंत राहू शकतोस. किंवा बियांपासून नवीन रोपांची निर्मिती करू शकतोस. म्हणजेच तू कधीही मरणार नाहीस.
इंद्रदेवानी झाडाला असा वर दिला कि तू कोणत्या ना कोणत्या रूपाने नेहमी जिवंत राहशील. नंतर इंद्रदेव नदीकडे गेले.
इंद्रदेवानी नदीला आपल्या पापातील काही भाग घ्यावा अशी विनंती केली. तिनेही त्यातला एक भाग स्वतःकडे घेतला. त्यानंतर इंद्र देवांनी नदीला असा आशीर्वाद दिला कि तुझ्याकडे कोणती अपवित्र वस्तू अथवा व्यक्ती आली तर तुझ्या जलाने ती व्यक्ती पवित्र होईल.
त्यानंतर इंद्रदेव धरणी मातेकडे गेले. धरणी मातेने सुद्धा त्यातला एक भाग स्वतःकडे घेतला. म्हणून इंद्र देवांनी धरणी मातेला असा आशीर्वाद दिला कि जमिनीवर कितीही खड्डे, खाच खळगे झाले तरीही ते आपोआप भरून येतील.
त्यानंतर इंद्रदेव सर्वात शेवटी स्त्री कडे गेले. स्त्रीने सुद्धा ब्रह्म ह त्ये चा उरलेला सर्व भाग स्वतः कडे ठेऊन घेतला. तर इंद्र देवांनी स्त्री ला असा आशीर्वाद दिला कि पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कामजीवनाचा जास्त आनंद घेऊ शकतील.
आणि असं म्हटलं जातं कि तेव्हापासून स्त्रिया या मासिक पाळीच्या रूपात ब्रह्म ह त्ये चे पाप झेलत आहेत.
आपण पहिले कि ज्यावेळी इंद्र देवांनी ब्र ह्म ह त्येचं पाप केले होते तेव्हा ते एका फुलात बसून श्री हरी विष्णू यांची उपासना करत होते. त्यावेळी त्यांच्या समोर श्री हरी विष्णू यांची प्रतिमा किंवा फोटो काहीही नव्हतं. किंवा ते कोणत्याही मंदिरात गेले नव्हते.
अगदी त्याच प्रमाणे मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रिया या व्रत, उपवास करू शकतात पण मंदिरात जाऊ शकत नाहीत. किंवा भगवंताच्या मूर्तीला स्पर्श करत नाहीत. आणि जर या दरम्यान त्यांनी असं काही कृत्य केले तर त्या पापाच्या भागीदार बनतात.
मासिक पाळी दरम्यान देवपूजा न करणे, मंदिरात न जाणे याचे वैज्ञानिक कारण हे देखील आहे कि या काळात स्त्रियांना ओटीपोटात दुखते, त्यांना त्रास होतो त्यामुळे त्यांचे मन एकाग्र होत नाही.
आणि देवपूजा करण्यासाठी मन एकाग्र व्हावे लागते. जर मन एकाग्र होत नसेल तर देवपूजा करून, पूजन, दर्शन करून काहीही फायदा होत नाही. म्हणून या दरम्यान स्त्रियांनी शक्यतो आराम करावा व स्वतःचे आरोग्य सांभाळावे.
स्त्रियांना मासिक पाली हि देवाकडून मिळालेली मातृत्वा साठीची भेट आहे. म्हणून मासिक पाली दरम्यान स्त्रियांना कमी लेखून त्यांचा अनादर न करता त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करावा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.