नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात त्या आपण आपल्या घराच्या सजावटीसाठी किंवा रोजच्या वापरासाठी ठेवलेल्या असतात. अशा वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते.
तर मित्रांनो अशीच एक काचेची वस्तू आपण बघणार आहोत अशी वस्तू जिच्यातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. अशी वस्तू आपल्याला घरातून ताबडतोब काढून टाकायची आहे.
मित्रांनो अशा प्रकारच्या वस्तू घरात ठेवल्याने तुम्ही कितीही मेहनत केली, कितीही पैसा कमावण्यासाठी धडपड केली तरी तो पैसा घरात टिकत नाही. घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते परिणामी घरात सुख शांती राहत नाही.
मित्रांनो आपण आपल्या घरात काचेची भांडी ठेवतो. त्यात काही काचेच्या शोभेच्या वस्तू असतात, आरसे असतात किंवा कपाटाला देखील आरसा लावलेला असतो. काचेच्या खिडक्या किंवा काचेचे दरवाजे देखील असतात.
मित्रांनो या सर्व काचेच्या वस्तू एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा बाहेर टाकत असतात. म्हणजे आपल्या घरात जी ऊर्जा आहे ती ऊर्जा द्विगुणित करण्याचं काम या काचेच्या वस्तू करत असतात.
कितीतरी पटींनी ऊर्जा वाढवण्याचं काम या काचेच्या वस्तू करत असतात. मित्रांनो तुम्ही पाहिले असेलच कि वास्तुशास्त्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी आरसे लावून वास्तू दोष दूर केला जातो.
परंतु मित्रांनो या काचेच्या वस्तूंपैकी एक जरी वस्तू फुटलेली असेल अनेकवेळा असे होते कि काचेच्या वस्तूंना तडा गेलेला असतो. परंतु ती वस्तू महाग असल्याने आपण ती तशीच वापरतो. ती वस्तू टाकून न देता तसाच आपण तिचा वापर करत असतो.
परंतु मित्रानो अशी काचेची तडा गेलेली वस्तू कितीही महाग असेल तरी सुद्धा तिचा वापर तुम्ही घरामध्ये करू नका. अशा तडा गेलेल्या वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. परिणामी आपल्या वास्तू मध्ये वास्तू दोष निर्माण होतो.
त्यातल्या त्यात हि काचेची वस्तू जर आरसा असेल हे अत्यंत अशुभ मानलं जात. जुन्या काळातील लोकांच्या तोंडी तुम्ही कधी ना कधी ऐकले असेल कि तडा गेलेला आरसा वापरू नये. यामुळे आपल्या घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात.
आपल्या घरातील पैसा मोठ्या प्रमाणात आजारांवर खर्च होत राहतो. कुटुंबातील सदस्यांमद्ये वाद विवाद, भांडणे होतात.त्यांचं एकमेकांवर असणारे प्रेम कमी होत. आणि या सर्व कारणांमुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते.
तर मित्रांनो तुमच्यासुद्धा घरात अशी तुटलेली काचेची वस्तू असेल विशेष करून तडा गेलेला आरसा असेल तर अशा वस्तू लगेचच घराबाहेर टाकून द्या. मग ती वस्तू कितीही महाग असुद्या ती त्वरित घरातून बाहेर काढा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.आणि कमेंट मध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.