नमस्कार मित्रानो
हस्तरेखाशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा हात बघून त्याच्या भविष्याबद्दल सांगितले जाते. हस्तरेखाशास्त्र असे मानते की एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगत असतात. हातात असलेल्या आडव्या रेषांच्या मदतीने त्याच्या भविष्यात काय होणार आहे ?या विषयाबद्दल बरेच जाणून घेता येते.
आज आपण हस्तरेखाशास्त्रानुसार मुलींच्या हातावर असलेल्या अशा काही रेषांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या मुलींच्या हातात अशा हस्तरेषा असल्यास त्यांची आयुष्यात खूप प्रगती होते.
त्यांना कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही. त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. या मुलींना समाजात खूप आदर आणि प्रतिष्ठा मिळते. त्यांना समाजात खूप प्रसिद्धी मिळते.
ज्योतिषशास्त्र असे सांगते की ज्या व्यक्तींच्या हातात चक्राची चिन्हे असतात असे लोक त्यांच्या आयुष्यात काहीही साध्य करू शकतात. असे मानले जाते की ज्या मुलींच्या बोटांच्या पहिल्या भागात चक्र चिन्ह असते , अशा मुलींना आयुष्यात खूप प्रसिद्धी मिळते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या मुली खूप हुशार असतात. समाजात त्यांचा खूप आदर केला जातो.
हस्तरेखाशास्त्रात मुलींच्या हातावर माशाचे चिन्ह असणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या मुलींच्या हातावर हे चिन्ह आहे ते खूप भाग्यवान असतात.
या मुलींच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येतो. मित्रानो भगवान विष्णूचे प्रतीक मासा आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवन रेषेवर माशाचा आकार तयार झाला असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान समजली जाते.
मातालक्ष्मी एका कमळावर तिचे आसन ग्रहण करते. ज्या मुलींच्या हातावर कमळाचे चिन्ह असते ती खूप भाग्यवान मानली जाते. या मुलींना कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही.
त्यांच्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. जीवन रेषा, भाग्य रेषा, शनि पर्वत, गुरु पर्वतासह शुक्र पर्वतावर कमळाचा आकार तयार झाला असेल तर ती व्यक्ती भाग्यवान असल्याचे प्रतीक मानले गेले आहे.
जर एखाद्या मुलीच्या हातात स्वस्तिक चिन्ह असेल तर ती खूप सद्गुणी आणि धार्मिक व्यक्तिमत्त्वाची असते अशी मान्यता आहे. अशा मुली धार्मिक कार्यांच्या कामात जास्त गुंतलेल्या असतात. या क्षेत्रात त्यांना खूप आदर आणि प्रतिष्ठा मिळते. या मुली स्वतः सोबतच इतरांचे जीवन सुद्धा सकारात्मकतेने भरून टाकतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.