घरात एकही झुरळ दिसणार नाही… 100 टक्के खात्रीशीर उपाय…

0
625

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक घरामध्ये आपल्याला छोट्या मोठ्या आकाराचे झुरळ दिसत असतात. घरातील महिला या झुरळांना पुरत्या वैतागलेल्या असतात. हे झुरळ घालवण्यासाठी आपण मार्केट मधून वेगवेगळ्या कंपन्यांचे स्प्रे घेऊन येत असतो.

परंतु मित्रांनो या स्प्रेच्या वापराने झुरळ काही दिवसांसाठी जातात पण ते पुन्हा नव्याने आपल्या घरात येत असतात. मित्रांनो जर आपल्या घरात लहान मुले असतील तर या स्प्रेचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर साईड इफेक्ट होऊ शकतो.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत जो उपाय केल्याने आपल्या घरात झुरळ नावाला सुद्धा उरणार नाही. तर चला मग जाणून घेऊ कसा करायचा आहे उपाय.

मित्रांनो यासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहेत. पहिला घटक म्हणजे अगरबत्ती आणि दुसरा घटक म्हणजे कापूर. हे दोन्ही घटक प्रत्येकाच्या देवघरात सहज उपलब्ध होत असतात.

या दोंन्ही घटकांच्या मदतीने आपण आपल्या घरातील झुरळ कायमचे नाहीसे करणार आहोत. यासाठी मित्रांनो सर्वप्रथम 7 ते 8 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि दोन अगरबत्ती घ्यायची आहे.

दोन्ही अगरबत्तीच्या वरचा भाग काढून त्याचा चुरा करायचा आहे. आणि सोबतच कापूर देखील तसाच कुस्करून घ्यायचा आहे. दोन्ही घटकांची पावडर मिक्स करून घ्यायची आहे.

आता पुढे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यात हि पावडर टाकायची आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. 10 मिनिट थांबून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे.

त्यानंतर हे मिश्रण एका बाटलीत टाकून त्या बाटलीला स्प्रे असणारे झाकण लावायचे आहे. प्लास्टिकच्या वस्तू मिळतात अशा दुकानात स्प्रे असणारे झाकण किंवा बॉटल सहज उपलब्ध होते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर न्हाव्याच्या दुकानात जो स्प्रे असतो तास स्प्रे.

मित्रांनो अगरबदत्तीच्या वासाने झुरळ चटकन बाहेर येतात व जो आपण त्यात कापूर वापरलेला आहे तो कापूर अत्यंत उपयुक्त असा सर्वगुणसंपन्न आणि सुवासिक देखील आहे. त्याचा झुरळांवर 100 टक्के परिणाम होतो.

मित्रांनो या उपायाने तुमच्या घरातील झुरळ 100 टक्के नाहीसे होणार आहेत. ज्या ठिकाणाहून तुमच्या घरातील झुरळ बाहेर येतात त्या त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे मारून ठेवायचा आहे. अगदी खात्रीशीर झुरळांचा नाश होतो.

मित्रांनो अगदी साधा सोप्पा उपाय आहे. घरातील लहान मुलांवर सुद्धा याचा काहीच साईड इफेक्ट नाहीये. तर मित्रांनो नक्की हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्या सोबत कमेंट मध्ये शेयर करा. धन्यवाद.

मित्रांनो अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here