खुश कसे राहायचे… गौतम बुद्धांनी दिले खूप छान उत्तर…

0
478

नमस्कार मित्रांनो,

भारतामध्ये अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यातील एक महत्वाचे संत म्हणजे भगवान गौतम बुद्ध होय. भगवान गौतम बुद्ध यांनी संसाराचा त्याग केला होता. त्यांच्याकडे ज्ञानाचे प्रचंड भांडार होते.

अनेक लोक त्यांच्याकडे आपली समस्या घेऊन जात होते. ते कधीच कोणाला नाराज करत नसत. सर्वांच्या प्रत्येक समस्येचे निदान करत असत.

एकदा एका व्यक्तीने त्यांच्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला की सुख म्हणजे काय? नेहमी सुखी कसे राहायचे? त्यावर भगवान बुद्धांनी खुप छान उत्तर दिले.

त्यावर भगवान गौतमबुद्ध त्याला म्हणाले की तुला याचे निरसन, समाधान उद्या देतो. उद्या सकाळी लवकर जंगलात फिरायला जाताना त्या व्यक्तीला बोलावले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान गौतम बुद्ध जंगलात फेरफटका मारायला निघाले तेव्हा तो व्यक्ती वेळे आधीच हजर होता तो मनुष्य आणि भगवान गौतम बुद्ध सोबत चालु लागले.

भगवान बुद्ध शांतपणे चालत होते पण त्या माणसच्या मनात मात्र विचार चालू होते. तेव्हा भगवान बुद्धांनी त्या माणसाला वाटेतील एक जड दगड त्याच्या हातात दिला आणि ते शांत चालु लागले आणि ठराविक अंतराने भगवान बुद्ध परतीच्या मार्गाला लागले, तरी ते काय बोलले नाहीत यावरून त्या माणसाला तो दगड जड होऊ लागला. त्यामुळे त्या मनुष्याची चिडचिड होऊ लागली. त्याचा संयम संपू लागला.

भगवान हा दगड आता खाली ठेऊ का? त्या माणसाने विचारले. त्यावर भगवान हसत म्हणाले की तुझ्या हातात तो दगड आहे तो मी विसरून गेलो.

तुला जर या दगडाचे एवढे ओझं होत होते तर ठेऊन द्यायचा नाही का? माझ्या सांगण्याची काय वाट बघत होतास तू? त्यावर तो व्यक्ती म्हणाला की भगवान मी तुमच्या आज्ञेची वाट पाहत होतो. त्यावर ते म्हणाले की पण त्यामुळे तुला दगडाचे ओझे होत होते त्याच काय!

यातून हीच शिकवण मिळते की आपण आयुष्यभर असेच अनेक समस्यांचे ओझ घेऊन जगत असतो. त्याचा त्रास आपल्याला होतो दुसर्यांना नव्हे!

त्यामुळे दुसऱ्याच्या सांगण्याची वाट बघत बसायची गरज नाही. आपण एखाद्याच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा त्रास झाला याबद्दल त्याला साधी माहीतीही नसते. तरीही का त्रास करून घ्यायचा?

जसे खडकाच्या रस्त्यावर बुट खालुन आपण चालु शकतो पण जर बुटात एक खडा असला तरी आपल्याला एक पाऊल पण चालायचे होत नाही. तसेच माणुस बाहेरच्या आव्हानाने नाही तर त्याच्या आतल्या कमजोरीने त्रस्त होतो.

मित्रांनो कथा आवडली असेल तर आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.

अशाच सुंदर कथा, माहिती रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here